इस्त्रायल आणि हमास यांच्यात चालू असलेल्या भीषण युद्धाच्या बातम्या हादरून टाकणाऱ्या आहेत. तिथली सीसीटीवी कॅमेऱ्याची दृश्यं हृदय हेलावणारी आहेत. सामान्य नागरिकांना अकस्मात गोळ्या झाडणारी दृश्यं, भल्यामोठ्या इमारती क्षेपणास्त्राच्या एका तडाख्यात जमीनदोस्त होतानाची दृश्यं, लहान निरागस मुलांना जीवे मारून जाळल्याचे व्हिडीओ, जनसामान्यांचा ह्रदयाला चिरून काढेल असा आक्रोश, हे सगळे मानवतेला काळिमा फासणारे तर आहेच पण या शिवाय या सगळ्याचे दूरगामी मनावर होणारे परिणाम ही तितकेच भयंकर भासणारे आणि त्रासदायक आहेत.

असा कुठल्याही प्रकारचा ट्रॉमा किंवा आघात होऊन किंवा कुठून तरी अशा आघाताचं ज्ञान झाल्यास जी मानसिक लक्षण निर्माण होतात त्याला पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर (PTSD) असे म्हणतात . मग ही आपत्ती नैसर्गिक (भूकंप, स्तुनामी , प्रेमाच्या माणसाला गमावणे) असो की मानवी (धर्मवादातून निर्माण होणारी दंगल, गर्दी किंवा अचानक धोक्याची सूचना आल्यावर होणारी चेंगराचेंगरी, बलात्कार), पण मन तर मन आहे. त्यावर होणारे आघात खोलवर अंतर्मनात जाऊन बसतात.

philosophers exploring the good life
तत्त्व-विवेक : सरधोपट जगण्याच्या अल्याडपल्याड…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
loksatta representative shriram oak conversation with dr sujala watve
आठवड्याची मुलाखत : मानसिक आजारांसाठी मदतीचा हात देणारी ‘हेल्पलाइन’
State orders inspection of hospitals registered under Nursing Home Act
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप! आरोग्य विभागाकडून राज्यभरात तपासणी मोहीम; जिल्हास्तरावर पथकांची नियुक्ती
Santosh Deshmukh murder case, Devendra Fadnavis ,
“आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला तरी…”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
Savitribai Phule Pune University rule challenged in High Court
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नियमाला उच्च न्यायालयात आव्हान
maharashtra Health Department launches leprosy and tuberculosis detection campaign in 2025
आरोग्य विभागाची नववर्षात कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहीम! साडेआठ कोटींपेक्षा अधिक नागरिकांचे होणार सर्वेक्षण…
Role of Ayurveda in management of oral health
Health Special : तोंडाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावं? 

हेही वाचा… Health Special: मासिक पाळी आणि मानसिक समस्या

“कोविड संकटानंतर आयसीयूतून बाहेर आपल्या वडिलांचे शव आणताना इतर अनेक शव बघितले आणि आता अगदी रात्रीसुद्धा मला तशीच स्वप्नं येतात आणि दचकून जाग येऊन मी सैरभैर घरात पळतो “ असे लक्षण PTSD चे आहे. ही लक्षणं अशा विध्वंसक घटनेनंतर लगेचच किंवा एक ते दोन आठवड्यात सुरू होतात आणि एक ते सहा महिने किंवा त्यापेक्षा ही जास्त काळ राहू शकतात. अशा घटनेनंतर १०० पैकी ७-८ लोक PTSD अनुभवतात. या आजारात भावनांबरोबर त्या प्रसंगाची काही चित्रं डोक्यात कैद होतात ते एक imagery बनतात आणि त्याची अनैच्छिक आठवण तयार होते , त्याबरोबरच खराब स्वप्नं पडतात . त्याला flashback म्हणतात. थंडी वाजून येणे, भीती वाटणे , डोकेदुखी अशी लक्षणे प्रामुख्याने दिसतात.

काहींना त्या घटनांबद्दल ऐकलं तरी त्रास होतो आणि त्यासाठी ते अशा गोष्टी किंवा जागा टाळतात ज्यामुळे त्यांना त्या प्रसंगाची आठवण होईल. अतिसतर्कता आणि उत्तेजना म्हणजे खूप पटकन दचकणे , शांत झोप न येणे , चिडचिड्पणा , तीव्र राग येणे , एकाग्रतेत कमी होणे ही लक्षणे यात दिसतात. भावनिकदृष्टया खचल्याने सुख किंवा दुःखाच्या क्षणी त्या भावना इतरांसारख्या त्यांना अनुभवणे कठीण जाते. आधी ज्या गोष्टीत रस वाटायचा ते तसे वाटणे ही कमी होऊ शकते. काही लोक यातून घटनेनंतर आठवड्यात हळूहळू सावरायला लागतात पण काहींना महिने किंवा वर्ष लागतात. त्यातच पॅनिक अटॅक , उदासीनता , आत्महत्येचे विचार येणे , मादक पदार्थांचे सेवन अशीही लक्षणे येऊन रोजच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होतात . PTSD चे वेळेत निदान आणि उपचार होणे अतिशय आवश्यक आहे.

हेही वाचा… Health Special: ‘वरी’ चिंता दूर करी

कुटुंबीय आणि मित्रांची मदत अशावेळी अतिशय महत्वाची ठरते. ग्रुप थेरपी जिथे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लोक आपले अनुभव, भावना आणि समस्या व्यक्त करतात तेही चांगले आहे. कोणी अशा त्रासातून जात असेल तर त्याच्या बरोबर राहून धीर देणे, आता ती परिस्थिती संपली आहे याची हळुवारपणे जाणीव करून देणे, त्रासातील व्यक्तीला शांतपणे ऐकून घेणे, त्यांना पूर्ववत आयुष्य नव्याने सुरू होण्यास मदत करणे आवश्यक आहे. अध्यात्मिक गोष्टींनी अशावेळी मन हलके होते. एकत्रित योग, प्राणायाम, प्रार्थना करणे चांगले ठरते. तरीही आजाराची लक्षणे दिसल्यास मानसोपचार तज्ञांकडून मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

Story img Loader