प्रसूतीनंतरचा कालावधी पहिल्यांदा आई झालेल्या मातांसाठी एक अवघड आणि कठीण काळ असतो. या काळात मातांनी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. कारण या काळात मातांना नैराश्य, चिंता अशा अनेक मानसिक तसेच शारीरिक समस्यांचा सामना करावा लागत असतो. अशा स्थितीत शरीरातील ऊर्जा पातळी राखण्यासाठी पोषक आहार महत्त्वाचा असतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गरोदरपणात मातेच्या शरीरात अनेक भावनिक आणि शारीरिक बदल होतात. बाळाला जन्म दिल्यानंतरही तिच्या शरीरात एक विशिष्ट कमजोरी येते, ज्यातून तिला बरे होण्यासाठी वेळ लागतो. याच विषयावर नोएडा फोर्टिस हॉस्पिटलच्या संचालक आणि एचओडी तसेच प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अंजना सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

प्रसूती नॉर्मल असो किंवा सिझेरियन असो, आईने यातून नीट बरे होत बाळाच्या स्तनपानाच्या गरजांकडे लक्ष देणे फार गरजेचे असते. त्यामुळे आईने स्वत:चा आणि बाळाचा विचार करून पोषणयुक्त आहाराची निवड केली पाहिजे, असे डॉ. सिंग म्हणाल्या.

डॉ. सिंह यांच्या मते, या काळात मातांनी आपल्या आहाराकडे विशेष लक्ष देणे फार महत्त्वाचे असते. यात दररोज अतिरिक्त ५०० कॅलरीजयुक्त आहार, म्हणजे १८०० ते २२०० kcal प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम आणि द्रवपदार्थ, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, भाज्या, फळे आणि हाय फायबर कार्बोहायड्रेट्स आणि गॅलॅक्टॅगॉग्स असा संतुलित आहार घ्यावा.

दरम्यान, पोषणतज्ज्ञ महिमा सेठिया यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे प्रसूतीनंतरच्या आहारात भाज्यांचा समावेश करण्याचा सल्ला दिला. हिरव्या भाज्यांमध्ये कॅलरीज कमी असतात, तसेच हृदयासाठी आरोग्यदायी अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे गर्भधारणेनंतरचे वजन कमी करण्यास मदत करतात, असा सल्ला तिने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिला आहे.

प्रसूतीनंतर शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी दोडका ही सर्वोत्तम भाजी मानली जाते. दोडका यकृताचे कार्य मजबूत करते, रक्त शुद्ध करते आणि रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित करते. फायबरने समृद्ध हे सुपरफूड प्रसूतीनंतर वजन नियंत्रणात ठेवण्यासदेखील मदत करते, असे आहारतज्ज्ञ सेठियाने तिच्या पोस्टमध्ये नमूद केले.

बऱ्याचदा पहिल्यांदा आई झालेल्या मातांना असे वाटते की, प्रसूतीनंतर वजन कमी करण्यासाठी त्यांना कर्बोहायड्रेटयुक्त आहार टाळला पाहिजे. परंतु, यावर डॉ. सिंग म्हणाले की, हा सकारात्मक दृष्टिकोन नाही. पहिल्यांदा आई झालेल्या मातांना कार्बोहायड्रेट्सची आवश्यक असते. केवळ दुधाच्या उत्पादनासाठीच नाही, तर मानसिक आरोग्य, हार्मोन नियमनसाठीही आवश्यक आहे.

या कालावधीत स्त्रियांना अनेकदा डिहायड्रेशनचा त्रास होतो, अशावेळी त्यांनी विविध द्रवपदार्थांचे सेवन केले पाहिजे. यात हर्बल टी आणि नारळाचे पाणी पचनास मदत करण्याबरोबरच अतिरिक्त पोषक आणि हायड्रेशनदेखील देऊ शकतात, असे रोझवॉक हेल्थकेअरचे वरिष्ठ सल्लागार, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पायल चौधरी म्हणाल्या.

डॉ. सिंह यांनी सांगितले की, पहिल्यांदा आई झालेल्या मातांनी भरपूर पाणी प्यावे आणि द्रवपदार्थांचे सेवन करावे. जसे की सूप, ज्यूस आणि नारळाचे पाणी आणि किमान चार ग्लास दूध पिऊन तुम्ही शरीरास हायड्रेट ठेवण्याची गरज आहे. स्तनदा मातांनी दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी पाण्यात ओवा किंवा मेथी (मेथी) आणि बडीशेप मिसळून पाणी पिऊ शकतात.

पहिल्यांदा आई झालेल्या मातांना शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी सुकामेवादेखील फायदेशीर मानला जातो. याशिवाय आईच्या दुधाचे प्रमाण सुधारण्यासाठी हे उपयुक्त असते. पण, प्रसूतीनंतर अल्कोहोल आणि कॅफिन टाळले पाहिजे, असा सल्ला डॉ. सिंग यांनी दिला.

नोएडामधील यथर्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एक्स्टेंशनमधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या सल्लागार, डॉ. रोली बंथिया यांनी पहिल्यांदा आई झालेल्या मातांनी आहारामध्ये काय बदल केले पाहिजे, याविषयी सल्ला दिला आहे.

१) लीन प्रोटीन : कोंबडी, मासे, लीन मीट, अंडी आणि शेंगा यांसारख्या स्त्रोतांचा समावेश करा, ज्यामुळे उतकांची दुरुस्ती आणि स्नायूंच्या मजबूतीसाठी मदत होईल.

२) फळे आणि भाज्या : अत्यावश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असलेले पदार्थ अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर प्रदान करतात, जे संपूर्ण आरोग्य आणि पचनास समर्थन देतात.

३)तृणधान्य : ऊर्जेची पातळी वाढवण्यासाठी आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी मदत करण्यासाठी ब्राउन राइस, क्विनोआ आणि ओट्ससारख्या संपूर्ण धान्यांची निवड करा.

४) हेल्दी फॅट : मेंदूचे आरोग्य आणि हार्मोन्सच्या संतुलनासाठी ॲव्होकॅडो, नट आणि ऑलिव्ह ऑइलसारख्या पदार्थांचा समावेश करा.

५) हायड्रेशन : शरीरात हायड्रेशन राखण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. विशेषत: स्तनपान करताना दररोज किमान ८-१० ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य ठेवा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Postpartum diet new mothers keep these nutritional points in mind after giving birth sjr
Show comments