Steamed Potatoes Raise Blood Sugar: मधुमेहाची समस्या जगभरात महामारीसारखी पसरत आहे. गेल्या काही दशकांमध्ये हा आजार झपाट्याने पसरला असून, सर्व वयोगटांतील लोक त्याला बळी पडत आहेत. भारतातील अनेक जण मधुमेहग्रस्त आहेत. मधुमेह हा जीवनशैलीमुळे झपाट्यानं वाढणारा आजार आहे. दुर्दैवानं यावर कोणताही इलाज नाही. एकदा का मधुमेहाची लागण झाली की, तुम्हाला त्याच्यासोबतच जगावं लागतं.

मधुमेह असलेल्या लोकांना विशेषत: रक्तातील साखरेच्या उच्च किंवा कमी प्रमाणाचा सामना करावा लागतो. त्यामुळे कालांतराने हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड व नसा यांचं गंभीर नुकसान होतं. मधुमेह ही जीवनशैलीशी संबंधित समस्या आहे. त्यामुळे आजच्या काळात जवळजवळ प्रत्येक घरात मधुमेहाचा रुग्ण आढळून येतो. मधुमेहादरम्यान खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. कारण- थोडासा निष्काळजीपणा आपल्या रक्तातील साखर वाढवू शकतं; पण भाजलेल्या, वाफवलेल्या बटाट्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते का, याच विषयावर डाॅ. व्ही. मोहन यांनी माहिती दिल्याचं वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

Sugar factory workers warn of strike Government announces committee for wage hike Mumbai news
साखर कारखाना कामगारांचा संपाचा इशारा; वेतनवाढीसाठी सरकारकडून समितीची घोषणा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण

डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार, “बटाटा हा भारतीय खाद्यसंस्कृतीमधला एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या रोजच्या आहारात विविध प्रकारच्या बटाट्यांचा समावेश असतो. बटाटा ही एक अशी कंदभाजी आहे, जी बाजारात १२ महिने उपलब्ध असते. घरात इतर कोणतीही भाजी आणली गेली नसेल, तर बटाटे घरात असतातच. मग त्यांचाच भाजी बनविण्यासाठी विचार केला जातो. बटाटा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा भाग आहे. बटाट्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच डॉक्टर मधुमेहाच्या रुग्णांना बटाटे खाण्यास मनाई करतात. आपण जर आहारामधून बटाट्याचे जास्त प्रमाणात सेवन केले, तर आपल्या रक्तातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. बटाट्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्तशर्करेला वाढविणारी कर्बोदकं असतात. बटाट्याचा ग्लायसेमिक इंडेक्सही जास्त असतो, जो रक्तशर्करा वाढण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे मधुमेहींना बटाटा खाण्याआधी फार विचार करावा लागतो,” असे ते सांगतात.

(हे ही वाचा: करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसू यांच्या लेकीला हृदयाला दोन छिद्रे; सर्जरीनंतर पालकांनी कोणती काळजी घ्यावी? डाॅक्टरांनी सुचविले उपाय )

बटाटा रक्तशर्करा वाढविणारा असला तरी त्यात मॅग्नेशियम, पोटॅशिअम, फॉस्फरस, आयर्न व झिंक यांसारखे बरेचसे पोषक घटक आणि अँटीऑक्सिडंट्सही असतात; जे शरीरासाठी फायदेशीर असतात. बटाट्यांमध्ये सामान्यतः उच्च जीआय असतो; परंतु तो स्वयंपाक पद्धतीनुसार बदलतो. उदाहरणार्थ- बटाट्याच्या उकडलेल्या किंवा भाजलेल्या पदार्थांमध्ये तळलेल्या पदार्थांपेक्षा कमी GI असतो.

म्हणजे तुम्ही उकडलेल्या बटाट्याचा वापर करीत आहात, तर ते तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरु शकते.  बटाट्यांमध्ये जीवनसत्त्वे व खनिजेही असतात. ते पोटॅशियमनेही समृद्ध आहेत. जीवनसत्त्व बी ६, फोलेट व फायबरमुळे बटाटा हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतो. पण मधुमेहींनी बटाट्याचे योग्य प्रकारे सेवन केले, तर त्यांच्यासाठी तो साह्यभूत ठरू शकतो. उकडलेले बटाटे पोटॅशियमने समृद्ध असतात, जे हृदयाच्या आरोग्यास, व्हिटॅमिन बी ६, फोलेट आणि फायबरला समर्थन देतात आणि म्हणूनच ते मधुमेह असलेल्यांसाठी महत्त्वपूर्ण आहेत.

भाजणं आणि वाफवणं या प्रक्रियांनी बनवलेले बटाट्याचे पदार्थ उत्तम ठरू शकतात. अशा प्रकारे बनवलेल्या बटाट्यात प्रतिरोधक स्टार्च असतो, जो आहारात तंतूंसारखे कार्य करतो. रक्तातील साखरेची पातळी सुधारण्याव्यतिरिक्त ते कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास देखील ते मदत करतात.

बटाट्याच्या फ्रेंच फ्राईज आणि बटाटा चिप्स यांसारखे तळलेले पदार्थ मधुमेहींसाठी अनेक धोके निर्माण करतात. या पदार्थांमधील उच्च चरबीयुक्त सामग्रीमुळे वजन वाढू शकतं आणि त्यामुळे रक्तातील साखरेचं व्यवस्थापनही गुंतागुंतीचं होतं. खरं तर योग्य स्वयंपाक करण्याच्या पद्धतींचा अवलंब केल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहील आणि दीर्घकालीन निरोगी आरोग्य राहण्यासही मदत होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Story img Loader