बटाटे खाण्याबाबत अनेक समज गैरसमज आहेत. बटाटे खाल्ल्याने वजन वाढते किंवा हृदयाच्या संबंधित समस्या निर्माण होतात अशा अनेक चर्चा होताना दिसतात. मात्र तुम्हाला माहित आहे का, खरं तर बटाटे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ते कसे? तर जाणून घेऊया. जर तुम्ही बटाटा तळून किंवा भाजी करून खाल्लात तर नक्कीच याने समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र जर तुम्ही बटाटा उकडून किंवा बेक केलेले बटाटे मर्यादित प्रमाणात खाल्लात तर त्याचे अनेक फायदे आहेत.

हृदयाच्या चांगल्या आरोग्यसाठी बटाटा फायदेशीर कसा ते जाणून घ्या…

रक्तदाब कमी होतो

बटाट्यामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते, जे रक्तदाब कमी करण्यास मदत करते. बटाट्यामध्ये असलेले पोटॅशियम हे हृदयाच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या खनिजांपैकी एक आहे. हे हृदयाला शरीरातून रक्त पंप करण्यास मदत करते आणि हृदयाचे कार्य संतुलित ठेवते. बटाटे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी करतात.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Benefits of lemon water Is Warm Lemon Water On An Empty Stomach Good for You? Expert Says This know more
Lemon water:सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे वाचून व्हाल थक्क
Alcohol Addiction and Treatment in marathi
अभिनेत्री पूजा भट्टप्रमाणे तुम्हालाही दारूचं व्यसन सोडवायचंय? डॉक्टरांचे ‘हे’ उपाय करून पाहा, पुन्हा दारूकडे ढुंकूनही बघणार नाही
Nano Fertilisers loksatta marathi news
लोकशिवार : नॅनो खते; पिकांच्या अन्नद्रव्य व्यवस्थापनातील आविष्कार
Consume nutritious snacks to keep weight under control
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक स्नॅक्सचे करा सेवन; आहारतज्ज्ञांनी सांगितले बेस्ट ऑप्शन
minister nitesh rane put on onion garland by the farmer
नाशिक : नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ; शेतकरी ताब्यात
Winter healthy recipe in marathi olya toorichya danyanchi bhaji recipe in marathi
चटकदार व झणझणीत विदर्भ स्पेशल ओल्या तुरीच्या दाण्यांची भाजी; हिवाळ्यातली अतिशय पौष्टीक रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

( हे ही वाचा: Uric Acid: युरिक अॅसिडने बॉर्डर लाइन पार केलीय? तर आजच खायचे सोडा ‘हे’ ५ पदार्थ)

खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते

बटाट्यामध्ये द्रव्यशील फायबर देखील भरलेले असते, जे हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करते असे अनेक संशोधनातून दिसून आले आहे. बर्‍याच अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की द्रव्यशील फायबर असलेले पदार्थ खराब कोलेस्टेरॉल म्हणून ओळखल्या जाणार्‍या एलडीएलची पातळी कमी करण्यास मदत करतात. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

हृदय आणि रक्तवाहिन्याशी संबधित समस्या सोडवते

बटाट्यामध्ये पोषक घटक देखील असतात ज्यामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यास चालना मिळते, ज्यामध्ये मॅग्नेशियम, नियासिन, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी ६ यांचा समावेश आहे. त्यामुळे जर तुम्ही बटाट्यांचा योग्यरित्या आणि मर्यादित प्रमाणात सेवन करत असाल, तर त्याचा आरोग्यसाठी चांगला फायदा होतो.

Story img Loader