Powder Milk Side Effect For Children : बाळाच्या जन्मानंतर आईला दूध व्यवस्थित येत नसल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, डबाबंद दूध पावडर पाजली जाते. सध्या भारतात अशा प्रकारच्या दूध पावडरचे अनेक ब्रॅण्ड्स बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही हॉस्पिटलमधील नवजात बाळांच्या वॉर्डमध्ये गेलात, तर तुम्हाला अनेक बेड्सजवळ असे दूध पावडरचे डबे दिसतील. नवजात बाळाचे पोट भरण्यासाठी या प्रकारचे दूध त्याला दिले जाते. हे पावडर दूध बाळासाठी पौष्टिक अन्न म्हणून दिले जाते.

पावडर दूध बनवायला सोपे, परवडणारे आणि त्याची शेल्फ लाइफ जास्त असते. परंतु, असे पावडरचे दूध लहान मुलांच्या आरोग्यासाठी खरेच योग्य असते का? अशा प्रकारच्या दुधाच्या सेवानाचे फायदे -तोटे, तसेच याच्या दीर्घकालीन सेवनामुळे मधुमेहाचा धोका वाढतो का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने होलिस्टिक हेल्थ कोच ईशा लाल यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा यांनी या विषयावर सविस्तर माहिती दिली, जी आपण जाणून घेऊ…

Prenatal diagnosis of well developed fetus in fetu
महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटात बाळ!.. काय आहे ‘फिट्स इन फिटू’ हा दुर्मिळ प्रकार?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Different types of oils and their uses in marathi
Oils for Health: बाळंतपण, मासिक पाळी ते स्थूलपणा कमी करण्यासाठी एकच उपाय; घरगुती तेलं कशी ठरत आहेत फायदेशीर?
Loksatta explained Why and how much did milk collection increase
विश्लेषण :राज्यात दुधाचा महापूर?
buldhana after multiple checks woman had baby in her womb and another in baby s stomach
धक्कादायक! गर्भवतीच्या पोटात बाळ आणि… बाळाच्या पोटातही ‘बाळ ‘!! अतिदुर्मिळ प्रकार
cow milk health benefits
गायीच्या दुधाला पृथ्वीवरील अमृत का म्हटलं जातं?
milk adulterants, Maharashtra , milk samples, milk,
राज्यभरातून एका दिवसांत ११०० दुधाचे नमुने जप्त, अन्न आणि औषध प्रशासन दूध भेसळखोरांविरोधात आक्रमक
Record daily collection of 1 crore 71 lakh liters of milk in the financial year
राज्यात दुधाचा ‘महापूर’; गत आर्थिक वर्षात १ कोटी ७१ लाख लिटरचे दैनंदिन विक्रमी संकलन

पावडर दूध म्हणजे काय आणि ते मुलांसाठी कितपत सुरक्षित?

होलिस्टिक हेल्थ कोच ईशा लाल यांनी स्पष्ट केले की, पावडर दूध हे मुळात नियमित दुधासारखेच असते; पण ते प्रक्रिया करून, पावडर स्वरूपात बनवले जाते. त्यात कॅल्शियम, प्रथिने यांसारखे अनेक पोषक घटक असतात. पण, ताज्या दुधात नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या चरबीचे विघटन करण्यास मदत करणारे लिपेजसारखे काही एन्झाइम्स यात नसतात.

काही अभ्यासकांच्या मते, दुधावर केलेल्या प्रक्रियेमुळे ऑक्सिडाइज्ड कोलेस्ट्रॉल तयार होऊ शकते, ज्यामुळे भविष्यात जळजळ व हृदयरोगाशी संबंधित जोखीम वाढू शकते. पावडर दूध नवजात बाळासाठी हानिकारक नसते; परंतु ते ताज्या दुधासारखे शुद्ध आणि परिपूर्ण नसते.

पावडर दुधामुळे मधुमेहाचा धोका वाढतो का?

लाल यांनी नमूद केले की, विविध अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, बाळाला जन्मापासून ज्या आहाराच्या सवयी आहेत. त्याचे दीर्घकालीन परिणाम त्याच्यावर होऊ शकतात, ज्यामध्ये टाईप २ मधुमेहासारखे आजार वाढण्याचा धोका आहे. पावडर दुधात अनेकदा साखरेचा समावेश केला जातो, अनेक कंपन्या विशेषत: मुलांना आवडणाऱ्या चवीचे प्रकार लक्षात घेत, त्या पद्धतीने ही पावडर बनवतात. अगदी लहान वयापासून साखरेचे सेवन करण्यास सुरुवात केल्यास इन्सुलिन रेजिस्टन्स होते, ज्यामुळे नंतर टाईप-२ मधुमेह होण्याचा धोका वाढतो.

आठवड्यातून एक दिवस मद्यप्राशन करणाऱ्यांचे यकृत आतून कसे दिसते? पाहा फोटो , डॉक्टर म्हणाले…

पावडर दुधामुळे ताज्या दुधाच्या तुलनेत रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढू शकते, तसेच पावडर दुधाचे वारंवार सेवन केल्यास लहान बाळांच्या विकसित स्वादुपिंडावर ताण येऊ शकतो. पावडर दुधामुळेच मधुमेह होतोच, असे नाही; परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास, ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते.

पावडर दुधाऐवजी कोणता पर्याय निवडू शकता?

जर तुम्ही लहान मुलांना पावडर दूध देऊ इच्छित नसाल, तर असे काही पर्याय आहेत. ज्याच्या मदतीने तुम्ही बाळाची दुधाची तहान कमी करू शकता.

१) ताजे दूध (शक्य असल्यास सेंद्रिय)

ताजे दूध द्या. त्यांच्या नैसर्गिक स्वरूपात हेल्दी फॅट्स, प्रोटीन व कॅल्शियम यांसह अनेक पोषक घटक असतात. शक्य असल्यास A2 सेंद्रिय दुधाची निवड करा. कारण- त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे प्रमाण जास्त असते; ज्यामुळे शरीरास हेल्दी फॅट्स मिळतात.

२) वनस्पतींवर आधारित दूध

अतिशय संवेदनशील असलेल्या लहान बाळांना बदाम, ओट्स किंवा नारळाचे दूध यांसारखे वनस्पतींवर आधारित दुधाचे पर्याय फायदेशीर ठरू शकतात. जर तुम्ही बाळांना असे दूध पाजत असाल, तर त्यात गाईच्या दुधाप्रमाणे कॅल्शियम आणि ड जीवनसत्त्व आहे की नाही याची खात्री करा. अशा प्रकारचे दूध विकत घेत असाल, तर त्यात साखरेचे प्रमाण किती आहे ते एकदा तपासून घ्या. पण, असे दूध विकत घेण्यापेक्षा ते घरीच तयार करणे सोईचे आणि आरोग्यासाठी उत्तम ठरू शकते.

३) पारंपरिक भारतीय पर्याय

आयुर्वेदात लहान बाळांसाठी घरगुती बदामाचे दूध किंवा नाचणी सत्त्व हे दोन उत्कृष्ट पर्याय सांगितले आहेत. बदामाचे दूध बनविणे सोपे आहे. यासाठी बदाम स्वच्छ धुऊन रात्रभर भिजवत ठेवा. त्यानंतर त्याची चांगली बारीक पेस्ट बनवा व पाण्यात मिसळा आणि गाळून घ्या. अशा प्रकारे बदामाचे दूध तयार आहे. या दुधामध्ये हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन्स असतात. तर नाचणी सत्त्वामध्येही (फिंगर बाजरी) कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. तुम्ही ते स्वादिष्ट लापशी किंवा पेय म्हणून बनवल्यास लहान मुले आवडीने खातील.

Story img Loader