Pratik Gandhi Reveals Secret Behind His Six Pack Abs : ‘स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी’ या वेब सीरिजने सर्वांची मने जिंकली. या सीरिजमध्ये हर्षद मेहताची भूमिका साकारणाऱ्या प्रतीक गांधीचे बरेच कौतुक करण्यात आले. त्यानंतर कुणाल खेमूच्या ‘मडगाव एक्स्प्रेस’मध्ये प्रतीक गांधी दिसला आणि आता यामी गौतमसह ‘धूम धाम’ या नवीन नेटफ्लिक्सवरील चित्रपटासह तो छोट्या पडद्यावर परतला आहे. तर ‘बॉलीवूड हंगामा’शी (Bollywood Hungama) अलीकडील संवादात, प्रतीक गांधींने सांगितले की, ‘धूम धाम’ या नवीन नेटफ्लिक्सवरील चित्रपटात त्याचे वॉशबोर्ड ॲब्स दिसत आहेत. पण, चित्रपटातील त्याच्या चायसेल्ड लूक (chiseled look)च्या पथ्यांसंबंधीच्या बाबी त्याने संवादात नमूद केल्या आहेत.
“प्रतीक गांधीने या लूकसाठी भरपूर प्रथिने खाल्ले, कठोर परिश्रम घेऊन अगदी क्वचितच झोप घेतली. तसेच, यादरम्यान त्याने खूप कमी पाणी पिऊन पेटकेसुद्धा सहन केले (endured cramps) आदी सर्व गोष्टी त्याने फक्त या शरीरासाठी सहन केल्या. तसेच शूटच्या चार दिवस आधी तो दिवसातून फक्त एक लिटर पाणी प्यायचा; ज्यामध्ये चहा आणि कॉफीसारख्या सर्व द्रवपदार्थांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे त्याने कार्बोहायड्रेट आणि मीठदेखील खाणे बंद केले होते. जेव्हा तुम्ही कर्बोदकांचे सेवन करीत नाही, तेव्हा थोडे चिडचिडेपणा येतो. त्यामुळे अभिनेता फक्त सीकवेन्स (sequence) संपण्याची वाट पाहत होता; जेणेकरून तो पुन्हा पाणी पिऊ शकेल, असे त्याने ‘बॉलीवूड हंगामा’शी बोलताना सांगितले.
तर फक्त एक लिटर पाणी प्यायल्याने वजन कमी करण्याच्या उद्दिष्टांवर आणि एकूणच आरोग्यावर काय परिणाम होतो हे समजून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने Fitelo येथील क्लिनिकल आहारतज्ज्ञ उमंग मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली.
ही प्रॅक्टिस अनेकदा व्यावसायिक शरीरसौष्ठवामध्ये दिसून येते. पाण्याचे सेवन कमी करून स्नायू वाढविण्यासाठी ते डिझाइन करण्यात आले आहे. मानवी शरीरात सुमारे ७० टक्के पाणी असते. ते इंट्रासेल्युलर फ्लुईड (ICF) आणि एक्स्ट्रासेल्युलर फ्लुईड (ECF) मध्ये वितरित केले जाते. शरीरातील एकूण पाण्यापैकी जवळपास दोन-तृतियांश पाणी इंट्रासेल्युलर फ्लुईड (ICF) मध्ये असते आणि ते सेल्युलर फंक्शनसाठी महत्त्वपूर्ण आहे. तर ECF (रक्त प्लाझ्मा आणि इंटरस्टिशियल फ्लुईडसह) पोषक द्रव्ये ट्रान्स्पोर्ट करण्यास आणि कचरा काढून टाकण्यास मदत करतात.
जेव्हा तुम्ही दिवसातून फक्त एक लिटर पाणी पिता तेव्हा शरीरात कोणते बदल होतात?
१. एक्स्ट्रासेल्युलर फ्लुईड व्हॉल्यूममध्ये घट (Reduction in ECF Volume) – पाण्याचे कमी सेवन केल्याने बाह्य द्रवपदार्थात घट होते, ज्यामुळे त्वचा घट्ट दिसते आणि स्नायू अधिक स्पष्ट दिसू लागतात. हा एक तात्पुरता प्रभाव आहे. बहुतेकदा शरीरसौष्ठवपटू आणि अभिनेते फोटोशूट किंवा स्पर्धांपूर्वी या स्थितीचा उपयोग करून घेतात.
२. इंट्रासेल्युलर फ्लुईड संकोचन आणि सेल्युलर स्ट्रेस (ताण) – दीर्घकाळापर्यंत निर्जलीकरणामुळे पेशींमधील पाणी कमी होते आणि चयापचय कार्य, स्नायूंच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.
३. इलेक्ट्रोलाईटचे असंतुलन (Electrolyte Imbalance) – सोडियम, पोटॅशियम आणि इतर इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन विस्कळित होते, ज्यामुळे स्नायूंमध्ये पेटके, कमकुवतपणा, चक्कर येणे व हृदयाशी संबंधित अनेक आजार उद्भवू शकतात.
४. कॉम्प्रोमाइज्ड हायड्रेशन लेव्हल्स (Compromised Hydration Levels) – शरीर व्हॅसोप्रेसिनसारख्या संप्रेरकांद्वारे हायड्रेशनचे नियमन करते, जे द्रव पातळी कमी असताना पाण्याची पातळी वाढवतात. तर क्रॉनिक डिहायड्रेशनमुळे मूत्रपिंडावर ताण येऊ शकतो आणि दीर्घकालीन आरोग्य समस्या उद्भवू शकतात.
कमी पाण्याचे सेवन केल्यामुळे वॉटर रिटेन्शन कमी होते आणि वजन तात्पुरते कमी होऊ शकते. पण, ते चरबी कमी होण्यास हातभार लावत नाही. कमी झालेले वजन प्रामुख्याने पाण्याचे वजन असते, जे सामान्य हायड्रेशन पातळी पुनर्संचयित केल्यावर परत वाढू शकते असे, मल्होत्रा म्हणाले. तसेच ते असेही म्हणाले की, निर्जलीकरण चयापचय मंद करू शकते आणि चरबीचे ऑक्सिडेशन खराब होऊ शकते, ज्यामुळे दीर्घकालीन वजन कमी करणे अधिक कठीण होते.
प्रतीक गांधींचा कॅमेरा-रेडी सौंदर्यशास्त्रासाठी हा अल्पकालीन उपाय होता; तो शिफारस केलेला फिटनेस सराव नव्हता. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी आणि स्नायूंसाठी तज्ज्ञ योग्य हायड्रेशन, संतुलित आहार व सातत्यपूर्ण व्यायामाची शिफारस करतात.