वैभवी वाळिंबे

मागच्या लेखात आपण प्रीहॅबिलिटेशनची उद्दिष्टे बघितली, प्रमुख उद्दिष्टे म्हणजे रुग्णाच्या मनातील शस्त्रक्रियेची भीती कमी करण, ज्या सांध्याची शस्त्रक्रिया कराची आहे तिथल्या आजूबाजूच्या संबंधित स्नायूंची ताकद राखून ठेवणं, रुग्णाच्या इतर निरोगी सांधे आणि स्नायूंचे ताकद राखून ठेवणं आणि योग्य प्रमाणात हालचाल सुरू ठेवणं आणि रुग्णाच्या फुप्फुसांची आणि हृदयाची क्षमता राखून ठेवणं. या उद्दिष्टांबरोबरच पुढील काही उद्दिष्टांवर प्री-हबिलीटेशन मध्ये काम केल जातं. शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत आटोक्यात ठेवणं. शस्त्रक्रियेनंतर घ्यायची काळजी, पाळावी लागणारी पथ्यं याबद्दल माहिती देणं.

Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
pukar seva pratishthan ngo for destitute elderly homeless
रस्त्यावरील निराधार वृद्ध रुग्णांवर उपचार करणारा ‘सेवाव्रती’!
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन
health experts advise drummers for relief from permanent pain due to drumming
Pain From Drumming : ढोल-ताशावादनामुळे जडतेय कायमचे दुखणे! आरोग्यतज्ज्ञांचा वादकांना काळजी घेण्याचा सल्ला

शस्त्रक्रियेनंतरची गुंतागुंत आटोक्यात ठेवणं

शस्त्रक्रियेनंतर जखमेची घ्यायची काळजी, स्वच्छता याबद्दल रूग्णाला आधीच संपूर्ण माहिती दिली जाते त्यामुळे इन्फेकशनचा धोका कमी होतो. फुप्फुसांची क्षमता वाढवणारे व्यायाम शिकवल्यामुळे फुप्फुसांशी संबंधित आजार होण्याची शक्यता नाहीशी होते, शस्त्रक्रियेनंतर कोणते व्यायाम प्रकार सरसकट केले जाऊ शकतात, कोणते व्यायाम प्रकार योग्य ती काळजी घेऊन मर्यादित स्वरुपात केले जाऊ शकतात आणि कोणते व्यायाम प्रकार करणं धोकादायक ठरू शकत हे प्रात्यक्षिकासहित दाखवलं जातं, शस्त्रक्रियेनंतर कोणता आणि कसा आहार घ्यायला हवा याची माहिती आधीच दिली जाते. ज्यामुळे शस्त्रक्रियेदरम्यान झालेली झीज पटकन भरून निघते.

आणखी वाचा-Health Special : चिडचिड होणं हे पित्तप्रकोपाचं लक्षण आहे?

शस्त्रक्रियेनंतर घ्यायची काळजी, पाळावी लागणारी पथ्यं याबद्दल माहिती देणं

प्रत्येक शस्त्रक्रियेनुसार हालचालीच्या पद्धती बदलतात, पायाच्या वेगवेगळ्या शस्त्रक्रियांमध्ये वजन घेण्याची मुभा वेगवेगळी असते, बेड ट्रान्सफर्सच्या पद्धती बदलतात, इतकच नाही तर ऑपरेटेड भाग कोणत्या स्थितीत ठेवायचा हे ही ठरलेलं असतं. इतकी सगळी माहिती एकदम शस्त्रक्रियेनंतर अचानक दिली गेली तर रूग्णाला ती त्रासदायक वाटू शकते, वेदना होत असल्यामुळे रुग्ण ही सगळी माहिती लक्षपूर्वक एकूण आचरणात आणू शकतातच असं नाही. शस्त्रक्रियेच्या आधी ही सगळी माहिती रूग्णाला समजेल अशा भाषेत सांगितली तर जातेच शिवाय याची प्रात्यक्षिकंही करून दाखविली जातात त्यामुळे रुग्णाच्या डोक्यात शस्त्रक्रियेनंतरचं वास्तविक पण आशादायी चित्र तयार होतं. उदाहरणार्थ गुडघे बदलण्याच्या शस्त्रक्रियेनंतर रूग्णाला बहुतकेवेळा दुसर्‍या दिवशी वॉकर घेऊन चालवलं जातं. याची माहिती रूग्णाला आधी नसेल तर त्याच्यासाठी ही गोष्ट भीतीदायक ठरू शकते (गुडघा बदलल्यानंतर दुसर्‍या दिवशी चालण्याचे फायदे डॉक्टरना माहिती असले तरीही ते रूग्णाला समजावून देणे देखील तेवढंच आवश्यक आहे).

आणखी वाचा-Health Special : उजेड सहन न होणं हे पित्तप्रकोपाचं लक्षण आहे का?

प्री-हॅबिलिटेशन टीम

प्री-हॅबिलिटेशन ही संकल्पना रुग्णाच्या शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही अंगांवर काम करते त्यामुळे यात अनेक डॉक्टरांचा सहभाग असणं अपेक्षित आहे. थोडक्यात multidisciplinary अप्रोचची इथे गरज असते. यामध्ये ऑर्थोपेडिक डॉक्टर, फिजिओथेरेपीस्ट्स, डाएटीशीअन, पेन मेडिसिन स्पेशालिस्ट, सायकोलॉजिस्ट, नर्सिंग स्टाफ आणि सगळ्यात महत्वाचं रुग्णाची काळजी घेणारे नातेवाईक (ज्याला आपण ‘सिग्निफिकंट अदर्स’) असं म्हणतो. या सगळ्यांचा महत्वाचा वाटा असतो.

अर्थात यात एक महत्वाची लक्षात घेण्यसारखी गोष्ट म्हणजे प्री-हॅबिलिटेशन हे इलेक्टिव म्हणजेच ठरवून केल्या जाणार्‍या शस्त्रक्रियांना लागू आहे. अपघात पूर्ण म्हणजेच इमरजन्सी शस्त्रक्रियांना हे लागू होत नाही कारण साहजिकच तेवढा वेळ नसतो. अधिकाअधिक रुग्णकेंद्रित होण्याचा आरोग्यसेवेचा ध्यास आहे त्यात प्री-हॅबिलिटेशन सारखी संकल्पना ही शस्त्रक्रियेसाठी जाणार्‍या रुग्णाचं मनोधैर्य, शारीरिक क्षमता आणि आयुष्याची गुणवत्ता वाढवणारी आहे.