PresVu Eye Drop Drug regulator suspends licence : दृष्टीदोष दूर करणारं व चष्म्यापासून कायमची मुक्ती देणारं औषध मुंबईस्थित औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीने विकसित केल्याचा दावा केला होता. मुंबईस्थित ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या औषधाला मान्यता देखील दिली होती. ‘प्रेस्वू आयड्रॉप’ (PresVu Eye Drop) असं या औषधाचं नाव आहे. गेले दोन दिवस या आयड्रॉपची बरीच चर्चा झाली. मात्र हे औषध भारतीय बाजरात उपलब्ध होण्याआधीच त्यावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) मायोपिया व हायपरमेट्रोपिया दूर करण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना पुढील नोटिशीपर्यंत निलंबित करण्यात आला आहे.

“हा आयड्रॉप प्रेस्बायोपियाने बाधित व्यक्तींसाठी चष्म्यावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी विशेषतः विकसित केला गेला आहे,” असं कंपनीने म्हटलं होतं. मुंबईस्थित एंटॉड फार्मास्युटिकल्सने मायोपिया व हायपरमेट्रोपियावरील उपचारांसाठी प्रेसव्हू (PresVu) नावाचे आय ड्रॉप्स विकसित केल्याचा दावा केला होता. या आयड्रॉप्सचा नियमित वापर केल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारून चष्म्यापासून मुक्ती मिळू शकते, असं कंपनीने म्हटलं होतं.

congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
semiconductor technology to china
चिप-चरित्र: चिनी धोरणसातत्याची फळे!
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Solapur district bank scam
सोलापूर जिल्हा बँक घोटाळ्याची ३२ तत्कालीन संचालकांवर जबाबदारी, ११०३ कोटी रुपये गैरव्यवहार प्रकरण, ऐन निवडणुकीत निर्णयाने खळबळ
deputy cm devendra fadnavis open up about late Rajendra Patni son dnyayak patni in karanja
फडणवीस म्हणाले, “पाटणी पुत्राची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण…”
Afghan national behind Iran's plot to assassinate Donald Trump
ट्रम्प यांच्या हत्येचा कट इराणनेच रचला होता? या संदर्भात अटक झालेला फरहाद शकेरी कोण आहे?

हे ही वाचा >> तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनच्या (सीडीएससीओ) सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने या उत्पादनाची शिफारस केल्यानंतर एंटॉड फार्मास्युटिकल्सला भारतात ड्रग कंट्रोलर जनरलकडून (जीसीजीआय) मान्यता देखील मिळाली होती. मात्र, सीडीएससीओनेच आता या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना निलंबित केला आहे.

हे ही वाचा >> तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..

ऑक्टोबरपासून हे औषध मेडिकल्समध्ये उपलब्ध होणार

प्रसारमाध्यमं व समाजमाध्यमांवर चुकीचा प्रचार केल्यामुळे या आयड्रॉपच्या विक्रीचा परवाना निलंबित केला आहे. या आयड्रॉपच्या जाहिरातींनी चष्मा असलेल्या लोकांचं लक्ष वेधलं होतं. या आयड्रॉपच्या असुरक्षित वापराबाबत व लोकांच्या सुरक्षेचा विचार करून सीडीएससीओने पुढील नोटिशीपर्यंत या औषधाच्या विक्रीचा परवाना निलंबित केला आहे. कारण, हे औषध प्रिस्क्रिप्शनवरच खरेदी करता येऊ शकतं. हे ऑषध डोळ्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेता येईल. मात्र प्रत्येकजण चष्मा घालवण्यासाठी हे औषध खरेदी करेल आणि त्यातून नव्या समस्या निर्माण होऊ शकतात. तशाच पद्धतीच्या बातम्या माध्यमांवर पाहायला मिळत होत्या. कंपनीनेही तशी जाहिरात केली होती. मात्र ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर हे औषध ३५० रुपये किंमतीत मेडिकलमधून खरेदी करता येईल.