PresVu Eye Drop Drug regulator suspends licence : दृष्टीदोष दूर करणारं व चष्म्यापासून कायमची मुक्ती देणारं औषध मुंबईस्थित औषधनिर्मिती करणाऱ्या कंपनीने विकसित केल्याचा दावा केला होता. मुंबईस्थित ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या औषधाला मान्यता देखील दिली होती. ‘प्रेस्वू आयड्रॉप’ (PresVu Eye Drop) असं या औषधाचं नाव आहे. गेले दोन दिवस या आयड्रॉपची बरीच चर्चा झाली. मात्र हे औषध भारतीय बाजरात उपलब्ध होण्याआधीच त्यावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने (CDSCO) मायोपिया व हायपरमेट्रोपिया दूर करण्याचा दावा करणाऱ्या आय ड्रॉपच्या विक्रीचा परवाना पुढील नोटिशीपर्यंत निलंबित करण्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in