आई होणं हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असलं तरी काही वेळा काही कारणांमुळे महिलांना गर्भधारणा टाळावी लागते. इच्छा नसतानाही बहुतांश महिला गर्भधारणा टाळण्यासाठी गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करतात. तसेच महिला गर्भनिरोधक गोळ्यांव्यतिरिक्त गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचाही वापर करतात. पण का गर्भधारणा टाळण्यासाठी तुम्ही गर्भनिरोधक गोळी घेत असाल, तर तुम्हाला कंडोम वापरण्याची गरज नाही का…? हा प्रश्न बहुतांश लोकांना पडला असेलच, याच प्रश्नाचे उत्तर बंगळुरूच्या मदरहूड हॉस्पिटलच्या प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नागवेणी आर यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलतांना दिला आहे. चला तर जाणून घेऊया तज्ज्ञांची माहिती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तज्ज्ञ सांगतात, असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांना आळा घालण्यात कंडोमने मोठी भूमिका बजावली आहे. तर गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्त्रियांना पहिल्यांदा खऱ्या अर्थाने गर्भनिरोधासाठीचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला. या गोळीमुळे गर्भधारणेची भीती नसते. सेक्सनंतर ही गोळी घेतली जाते. या गोळ्या घेतल्यामुळे महिलांना अनसेफ सेक्स सेक्सची भीती राहत नाही. याशिवाय गर्भधारणेचे टेन्शन रहात नाही. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार एखाद्या मेडिकल मधून या गोळ्या खरेदी कराव्यात. पण गर्भनिरोधक गोळ्या गर्भधारणेविरूद्ध ९९ टक्के प्रभावी असतात. मात्र, त्या लैंगिक संबंधांनी संक्रमित होणारे रोग (STD) किंवा इतर कोणत्याही संसर्गापासून संरक्षण देत नाहीत, असेही स्त्रीरोगतज्ज्ञ सांगतात.

(हे ही वाचा : मधुमेहाचा तुमच्या किडनीवर परिणाम होत आहे की नाही, हे कसं ओळखाल? कोणते पदार्थ खाणे टाळावेत? डाॅक्टर सांगतात…)

तर दुसरीकडे, गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. सध्याच्या काळात पुरुष सेक्स करताना विविध लैंगिक आजारापासून बचाव करण्यासाठी आणि अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर करणं पसंत करतात. याआधीच्या काळात कंडोमचा फारसा वापर केला जात नसल्यानं अनेक लोक हे नसबंदीचा पर्याय निवडायचे. बरेच लोक घाईगडबडीत कंडोम वापरतात. पण त्याचा योग्य वापर होतोय की नाही याकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता निर्माण होते. म्हणूनच त्याचा योग्य वापर करणे महत्त्वाचे आहे.

कंडोममुळे गर्भधारणा, संसर्ग यांना आळा घालता येतो. कंडोम लिंगाभोवती आवरण तयार करते. त्यामुळे त्यातून निघालेले वीर्य योनित प्रवेश करत नाही. परिणामी गर्भधारणा आणि संसर्ग टाळण्यास मदत होते. गोळ्यांचा परिणाम दिसण्यासाठी काही काळ लागू शकतो त्यामुळे तोपर्यंत कंडोमचा वापर करणे फायद्याचे ठरते, असेही तज्ज्ञ सांगतात.

तज्ज्ञ म्हणतात की, नको असलेल्या गर्भधारणेपासून संरक्षण करण्यासाठी कंडोम व गर्भनिरोधक गोळ्या दोन्ही प्रभावी पर्याय आहेत. मात्र, STD किंवा STI पासून म्हणजेच लैंगिक रोगांपासून संरक्षण हवे असल्यास कंडोम वापरण्याचा सल्ला दिला जातो. जर एखाद्याला संभोगामुळे एचआयव्ही सारखा संसर्ग झाला असेल तर गोळ्या काम करत नाहीत. नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे कंडोम, जे केवळ गर्भधारणा रोखत नाही तर अनेक लैंगिक संक्रमित रोगांपासून संरक्षण देखील करते. 

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prevent pregnancy should you stop using a condom if your partner takes birth control pills pdb
Show comments