Surviving a heart attack: हल्ली ह्रदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढताना दिसतेय. पूर्वी फक्त वृद्धांना ह्रदयविकाराचा झटका यायचा, पण आता तरुणांसह अगदी १० वर्षांच्या मुलांमध्येही ही समस्या दिसून येते. यामागे कारणं वेगळी असली तरी हे प्रमाण दिवसेंदिवस वाढतेय. अशा परिस्थितीत अनेक रुग्ण ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर औषधोपचार घेऊन बरे होतात. पण, यावेळी अनेक रुग्ण डॉक्टरांना नेहमी दोन प्रश्न विचारतात ते म्हणजे, हृदयविकाराच्या झटक्यातून बरे झाल्यानंतर ते पूर्वीप्रमाणे त्यांचे नेहमीचे आयुष्य नॉर्मल जगू शकतात का? याचा पुढील आयुष्यावर काही परिमाण तर होणार नाही ना? याच प्रश्नांची उत्तरं बंगळुरूमधील मणिपाल हॉस्पिटलचे इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी आणि हार्ट फेल्युअरचे प्रमुख डॉ. कार्तिक वासुदेवन यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली आहे.
डॉ. कार्तिक वासुदेवन सांगतात की, हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीचे भविष्य त्यांच्या हातात असते. पण त्यांना योग्य औषधोपचार, फॉलोअप्स, निरोगी जीवनशैली आणि व्यायाम करणे गरजेचे आहे. सर्व काळजी घेतल्यानंतरही तुमच्या हृदयाची कार्यक्षमता ही तुम्ही त्याचे किती चांगले निरीक्षण करता आणि जाणवणाऱ्या लक्षणांकडे कशाप्रकारे बघता यावर अवलंबून असते.
चहा पिणे पूर्णपणे बंद केल्यास वजन होते कमी? डॉक्टर काय सांगतात, वाचा
ह्रदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाच्या शरीरात काय बदल होतात?
लीड्स विद्यापीठातील संशोधकांना असे आढळून आले की, हृदयविकाराच्या झटक्यातून वाचलेल्या लोकांमध्ये सामान्य लोकांपेक्षा खूप जास्त पटीने परिस्थिती विकसित होत असल्याचे आढळून आले, जे फार विशेष आहे. या संशोधनात सहभागी लोकांपैकी एक तृतीयांश रुग्णांचे हृदय किंवा मूत्रपिंड निकामी झाले होते, सात टक्के रुग्णांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला होता. तब्बल नऊ वर्षांच्या संशोधन कालावधीत ३८ टक्के लोकांचा इतर कारणांमुळे मृत्यू झाला होता. खूप मोठ्या पातळीवर हे संशोधन करण्यात आले. संशोधकांनी यूकेमधील रुग्णालयात दाखल होणाऱ्या १४५ दशलक्षाहून अधिक प्रौढ रुग्णांच्या नोंदींचे विश्लेषण केले.
पूर्वीपेक्षा जास्त लोक हृदयविकाराच्या झटक्यापासून आता वाचतात. पण बहुतेक अंदाजानुसार, रुग्णांना ९० टक्क्यांपर्यंत दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात. हृदयविकाराचा झटका आल्याच्या पहिल्या ३० ते ६० मिनिटांत रुग्णाची काळजी घेतली नाही, तर हृदयाच्या उतींना कधीही भरून न येणारे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे त्यांना हृदय निकामी होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच अशी कोणताही स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
जोखीम घटक ओळखा
हृदयविकाराच्या झटक्यातून वाचलेल्या व्यक्तीने हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, तीव्र मूत्रपिंडाचा आजार (CKD), खराब कोलेस्ट्रॉल किंवा तणाव यांसारख्या जोखीम घटकांमुळे हा झटका आला आहे.
तात्काळ आरोग्य समस्यांबाबत काळजी घ्या, परंतु यासाठी बराच वेळ लागतो. पॅरामीटर्स सुरक्षित पातळीपर्यंत खाली आल्यावर वर्षानुवर्षे ते तिथेच ठेवावे लागतात.
तुम्हाला मधुमेह नसला तरीही रक्तातील साखरेची पातळी तपासा
हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान तुम्हाला मधुमेह नसला तरीही तो वाढत्या वयाबरोबर विकसित होऊ शकतो. यामुळे मायक्रोव्हस्कुलर डिसफंक्शन होऊ शकते. जेथे हृदयाच्या स्नायूंना अन्न देणाऱ्या लहान रक्तवाहिन्या, मूत्रपिंड आणि डोळ्यातील पडदा प्रभावित होतात. कालांतराने ते मोठ्या समस्या म्हणून बाहेर येते. कधीकधी सायलेंट डायबिटीज हा मॅक्रोव्हस्कुलर गुंतागुंतीचे कारण ठरते. मोठ्या धमन्यांवर परिणाम होतो आणि परिणामी हृदय, मेंदू आणि हातापायांमध्ये प्लेक्स तयार होतात. म्हणूनच रुग्णाने एकदा अटॅक आल्यानंतर मधुमेह होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे, कारण यामुळे दुसऱ्यांदा ह्दयविकाराचा झटका येऊ शकतो.
कार्डियाक रिहॅबसाठी जा
ह्रदयाच्या रिकव्हरीकडे दुर्लक्ष करू नका, यात डॉक्टर रुग्णास काही व्यायाम सांगतात, जे डॉक्टरांच्या देखरेखीखाली तीन महिन्यांत आठवड्यातून तीन सत्रात घेतले जातात. एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, हृदयाच्या रिकव्हरीमुळे पुन्हा हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ४७ टक्क्यांनी कमी झाली आहे. हृदयविकाराच्या झटक्यातून बरे झालेल्या रिकव्हरीतील रुग्णाची सरासरी आठ वर्षांच्या आत मृत्यूची शक्यता ४२ टक्क्यांनी कमी होत असल्याचे एका प्रकरणात आढळले.
आहारात बदल करा
फळे, भाज्या, पालेभाज्या, शेंगा, संपूर्ण धान्य, नट, मासे आणि मटण, चिकण यांसारख्या गोष्टींचा आहारात समावेश करा. ट्रान्स फॅटयुक्त पदार्थ खाणे बंद करा. हायड्रोजनेटेड तेल असलेले स्नॅक्स खाणं टाळा.
धूम्रपान, मद्यपान करणे टाळा
तुम्ही धूम्रपान करणे बंद केल्यास तुम्हाला दुसऱ्यांदा हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निम्म्याने कमी होऊ शकतो. कारण अल्कोहोल तुमचे रक्तदाब, रक्तातील साखर आणि ट्रायग्लिसराइड पातळी वाढवते.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घ्या
तुमचे हृदय, कोलेस्ट्रॉल (स्टॅटिन्स) आणि रक्तदाबाची औषधे तुमच्या बाऊंसिंग बॅक रूटीनचा एक महत्त्वाचा भाग आहेत. जर तुम्हाला जास्त धोका असेल आणि तुमचे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करणे कठीण असेल, तर तुम्हाला PCSK9 इनहिबिटर नावाची औषधे दिली जाऊ शकतात.
शरीराचे वजन नियंत्रणात ठेवा
जास्त वजनामुळे दुसऱ्या हृदयविकाराचा धोका वाढतो. तुमचा BMI (बॉडी मास इंडेक्स) १८.५ ते २४.९ दरम्यान असावा.
फॉलोअप चुकवू नका
तुमच्या स्थितीवर आणि रिकव्हरीवर लक्ष ठेवणे हा तात्पुरता नसून आयुष्यभराचा व्यायाम आहे. त्यामुळे वेळोवेळी तुमच्या कार्डिओलॉजिस्टचा सल्ला घ्या.