Priyanka Chopra desi immunity boosting drink idea : अभिनेत्री प्रियांका चोप्राने बॉलीवूडपासून हॉलीवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. बॉलीवूडची देसी गर्ल म्हणून ओळखली जाणारी ही अभिनेत्री तिचे देशी जुगाड (घरगुती उपाय) चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. अलीकडेच अभिनेत्रीने रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी (immunity boosting) आणखीन एक घरगुती उपाय सांगितला आहे.

वोग इंडियाला (Vogue India) दिलेल्या एका मुलाखतीत प्रियांका चोप्राने तिचा देशी जुगाड सांगितला आहे. दररोज शूट असते आणि त्यामुळे सारखे आजारी पडून चालणार नाही. कारण- त्यामुळे दैनंदिन वेळापत्रक विस्कळित होऊ शकते. त्यामुळे प्रियांका चोप्रा रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी (immunity boosting) सकाळी गरम पाण्यात आले, हळद, लिंबू व मध घालून पिते. हा घरगुती उपाय खरोखर आरोग्यासाठी उपयोगी ठरेल का? हे जाणून घेण्यासाठी दी इंडियन एस्क्प्रेसने आहारतज्ज्ञांशी चर्चा केली.

drinking tea is beneficial to health?
चहाची तलफ आलेय, काय करावं?
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
water intake
पाणी कसे व किती प्यावे?
GBS Pune, GBS, bacteria , private tankers, pune,
पुणे : १५ ठिकाणी खासगी टँकरच्या पाण्यातच जीवाणू असल्याचे उघड !
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
is alcohol good for health
दारू प्यावी का? आयुर्वेद काय सांगतं?
khadakwasla water, khadakwasla ,
‘खडकवासल्या’तील पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष
pune Municipal Corporation, water ,
‘त्या’ गावातील ११ सोसायट्यांना टँकरने पाणी, काय आहे कारण ?

नोएडा येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख आहारतज्ज्ञ सुहानी सेठ अग्रवाल यांच्या मते, हा उपाय रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. पण, हा उपाय सर्व समस्यांसाठी योग्य ठरू शकत नाही.

हेही वाचा…Joint Pain : सांधेदुखी असेल, तर कोबीच्या पानांचा असा करा वापर; सूज, वेदना होईल कमी; वाचा तज्ज्ञांचा ‘हा’ उपाय…

‘या’ घरगुती उपायाचे फायदे :

आल्यामध्ये दाहकविरोधी अँटिऑक्सिडंट्स गुणधर्म असतात; जे जळजळ, ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याव्यतिरिक्त आले पचन व रक्ताभिसरणासाठी मदत करते; जे संपूर्ण आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. हळदीमध्ये कर्क्युमिन (curcumin) समृद्ध घटक आणि शक्तिशाली विरोधी दाहक गुणधर्म असतात. कर्क्युमिनचे अँटिऑक्सिडंट्स रोगप्रतिकार शक्ती (immunity boosting) सुधारण्यास मदत करतात; ज्यामुळे ते या पेयाचा एक मौल्यवान घटक ठरतात, असे आहारतज्ज्ञ सुहानी सेठ अग्रवाल यांनी स्पष्ट केले.

तसेच लिंबामध्ये असणारे क जीवनसत्त्व शरीरातील पांढऱ्या रक्तपेशींच्या वाढीसाठी मदत करते. शरीराच्या संरक्षणासाठी पांढऱ्या रक्तपेशी महत्त्वाची भूमिका बजावतात. पांढऱ्या रक्तपेशी संसर्गाच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. तर मध हा त्याच्यातील नैसर्गिक प्रतिजैविक गुणधर्मांमुळे शरीराचे एखाद्या संसर्गाची बाधा होण्यापासून संरक्षण तर करतोच; पण घशाचे खवखवणेदेखील शांत करतो.

हा जुगाड खरंच रोगप्रतिकार शक्ती वाढवतो का?

हे पेय संतुलित आहार किंवा वैद्यकीय उपचारांचा पर्याय म्हणून घेतले जाऊ शकत नाही. पण, याचे फायदेही चांगले आहेत. त्यामुळेो निरोगी दिनचर्येचा एक भाग म्हणून नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते. याचा अर्थ असा की, प्रियांका चोप्रा रोज सकाळी जे पेय पितात, ते सामान्य आरोग्यासाठी योगदान देऊ शकते. पण, गंभीर आरोग्य समस्यांसाठी हा उपाय योग्य ठरू शकत नाही. हे पेय तुमच्या दिनचर्येत दीर्घकाळासाठी समाविष्ट केल्याने हळूहळू रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते.

Story img Loader