Protecting heart health : रुग्णाचे हेल्दी हार्ट सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भविष्यात येणारा हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक टाळण्यासाठी बऱ्याच काळापासून ॲस्पिरिनचा वापर केला जात आहे. पण, नुकत्याच झालेल्या संशोधनात असे दिसून आले की, ज्या रुग्णांना आधी हार्ट अटॅक आला आहे किंवा ज्यांचे स्टेंटिंग किंवा बायपास झाली त्यांच्यासाठी हे अत्यंत आवश्यक औषध आहे. ज्या लोकांना पूर्वी कधी हार्ट अटॅक आलेला नाही किंवा एथेरोस्क्लेरोसिस (प्लेक जमा होणे) झालेला नाही त्यांच्या हार्टच्या सुरक्षेसाठी ॲस्पिरिन मर्यादित प्रमाणात उपयुक्त ठरू शकते. खरे तर, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक टाळण्यासाठी ॲस्पिरिन वापरण्याचे घातक दुष्परिणाम आहेत जसे की, रक्तस्राव होणे. म्हणूनच हे लक्षात घेऊन हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक टाळण्यासाठी प्रिस्क्रिप्शनशिवाय मिळणारे ॲस्पिरिन औषध म्हणून डॉक्टरंच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.

वृद्ध व्यक्तींच्या मोठ्या वैद्यकीय चाचण्यांच्या डेटाचा अभ्यास केल्यानंतर समोर आलेला निष्कर्ष JAMA नेटवर्कमध्ये प्रकाशित झाला होता. या अभ्यासानुसार ज्यांनी दररोज ॲस्पिरिनचे कमी डोस घेतले त्यांच्यामध्ये मेंदूतील रक्तस्रावाचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले आणि स्ट्रोक टाळण्यासाठी कोणतेही महत्त्वपूर्ण संरक्षण मिळत नसल्याचे दिसून आले.

daily habits, cardiovascular health
हृदयासंबंधित आजार उद्भवू नयेत यासाठी तज्ज्ञांनी सांगितले दैनंदिन दिनचर्येतील सहा महत्त्वाचे बदल; घ्या जाणून…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
which food should not eat with curd
दह्याबरोबर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा आरोग्याला विपरीत परिणामांचा धोका
Hair identifier spray
शेव्हिंग करण्यापूर्वी हेअर आयडेंटिफायर स्प्रेचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
heartburn acidity
हार्टबर्नचा त्रास टाळण्यासाठी काय करावं?
Ramphal health benefits In Marathi
Ramphal : रोज रामफळ खाल्ल्याने शरीराला नेमका काय फायदा मिळू शकतो? डॉक्टरांची माहिती वाचून व्हाल खूश
penaut oil for diabetis patients?
शेंगदाण्याचं तेल डायबेटिस असणाऱ्यांनी वापरावं का?
Donald Trump signs order withdrawing from World Health Organization
आरोग्याच्या मुळावर शेखचिल्लीची कुऱ्हाड!

ॲस्पिरिनच्या कमी प्रमाणातील डोसला बेबी ॲस्पिरिन म्हणून ओळखले जाते; जे प्लेटलेट्सच्या गोठवण्याची क्रिया कमी करते, रक्त पातळ करते. त्यामुळे दुखापतींदरम्यान समस्या निर्माण होऊ शकतात. वृद्ध लोक, ज्यांना हार्ट किंवा स्ट्रोकची कोणतीही चिंताजनक लक्षणे दिसून येत नाहीत, त्यांनी विशेषतः ॲस्पिरिन घेण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण- अभ्यासानुसार, त्यांच्यावर अॅस्पिरिनचा अधिक दुष्परिणाम होण्याची आणि रक्तस्राव होण्याची अधिक शक्यता असते आणि जर ते कोणत्याही प्रकारची औषधे घेत असतील, तर हे दुष्परिणाम आणखी वाढू शकतात. ६० पेक्षा जास्त वय असलेल्या गटातील लोकांना ॲस्पिरिनच्या वापरामुळे मिळणाऱ्या फायद्यांच्या तुलनेत त्याचे दुष्परिणाम खूप जास्त आहेत.

हेही वाचा – योनी बंद होते म्हणजे काय? प्रजनन क्षमतेवर कसा होतो परिणाम?तज्ज्ञांकडून जाणून घ्या

नवीन विश्लेषणामध्ये ‘ॲस्पिरिन इन रिड्युसिंग इव्हेंट्स इन द एल्डरली’ किंवा ASPREE नावाच्या अभ्यासातील डेटाचा वापर केला गेला आहे. या अभ्यासामध्ये ऑस्ट्रेलिया आणि यूएसमध्ये राहणाऱ्या लोकांना दररोज ॲस्पिरिनचा कमी डोस देऊन त्यांची रँडमाइस्ड कंट्रोल ट्रायल (randomised control trial) घेण्यात आली. या अभ्यासामध्ये सहभागी झालेल्या १९,११४ व्यक्तींचे वय ७० पेक्षा जास्त होते; ज्यांना हार्ट संबंधित आजाराची कोणतीही लक्षणे नव्हती. आधीपासूनच स्ट्रोक किंवा हार्ट अटॅक असलेल्या व्यक्तीला या अभ्यासातून वगळण्यात आले होते. स्ट्रोक किंवा रक्त गोठण्याचा धोका कमी करण्यासाठी ॲस्पिरिनचा कोणताही विशेष प्रभाव दिसून त्यांच्यावर आला नाही; परंतु त्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव (intracranial bleeding ) होण्याचा धोका ३८ टक्क्यांनी त्यांच्यामध्ये वाढला.

म्हणूनच ‘यूएस टास्क फोर्स’ने सांगितले की, ६० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि ज्यांना आधीपासून हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची कोणतीही लक्षणे नाहीत किंवा ते टाळण्यासाठी उपाय म्हणून त्यांना ॲस्पिरिन देऊ नये.

बेबी ॲस्पिरिन म्हणजे काय आणि डॉक्टर ते का देतात?

रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्यास रक्तातील प्लेटलेट्सच्या गुठळ्या कारणीभूत ठरतात. हे टाळण्यासाठी सुरुवातीच्या काळात ॲस्पिरिन ३५० मिलिग्राम ते ६०० मिलिग्रामच्या गोळ्या म्हणून उपलब्ध होत्या. रक्तातील या गुठळ्या हे हार्ट अटॅक व स्ट्रोकचे प्रमुख कारण आहे. जेव्हा प्लेक (धमनीच्या भिंतींवर कोलेस्टेरॉल आणि इतर पदार्थांचा साठा) फुटतो आणि प्लगच्या (plug) रूपात गुठळी तयार करून तुमचे शरीर सावरण्याचा प्रयत्न करते, तेव्हा रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. जेव्हा रक्तवाहिन्या आधीच प्लेकमुळे अरुंद झालेल्या असतात, तेव्हा ही गुठळी रक्तवाहिनीला आणखी बंद करू शकते आणि मेंदू किंवा हृदयाकडे जाणारा रक्तप्रवाह थांबवू शकते. त्यानंतर ॲस्पिरिनचा नियमित डोस आवश्यक ठरतो. कारण- ते रक्ताची गुठळ्या होण्याची आणि घट्ट होण्याची क्षमता कमी करते.

त्यानंतर प्रोटोकॉलमध्ये सुधारणा करण्यात आली; ज्यानुसार, ॲस्पिरिनचे ८१ ते १०० मिग्रॅ.दरम्यान प्रमाण निश्चित करण्यात आले. याला बेबी ॲस्पिरिन डोस म्हणतात. उदाहणार्थ, डिस्प्रिनमध्ये ३०० मिग्रॅ. ते ६०० मिग्रॅ.दरम्यान ॲस्पिरिनचे प्रमाण जास्त असते. म्हणूनच डॉक्टर नेहमी सांगतात की, प्रिस्क्रिप्शन विकत घेतल्यास आणि वेदनाशामक म्हणून वापरल्यास ते धोकादायक ठरू शकते. इकोस्प्रिन ७५ हा बेबी ॲस्पिरिन डोस आहे.

हेही वाचा – मेटाबॉलिजम कशामुळे प्रभावित होते? डॉक्टरांकडून जाणून घ्या तुम्ही काय केले पाहिजे?

ॲस्पिरिनचे दुष्परिणाम काय आहेत?

हे तुमच्या पोटाचे अस्तर संवेदनशील बनवते आणि जठरासंबंधी इतर आजार होऊ शकतात. जळजळ होणे, अल्सर येणे, तसेच रक्तस्राव होऊ शकतो. तसेच, रुग्णांनी रक्त पातळ करणारी औषधे घेण्याबाबत नियमितता बाळगणे आवश्यक आहे.

त्यामुळे ‘यूएस प्रिव्हेंटिव्ह सर्व्हिसेस टास्क फोर्स’च्या मागील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये जोपर्यंत तुम्हाला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोकचा धोका जास्त नसेल तोपर्यंत हार्टसंबंधित आजार टाळण्यासाठी प्राथमिक उपाय म्हणून ॲस्पिरिन घेण्याबाबत सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: ज्यांना पुढील १० वर्षांत हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची १० टक्के किंवा जास्त शक्यता होती अशा ५० ते ६९ वर्षे वयोगटातील जास्त धोका असलेल्या स्ट्रोक प्रकरणांसाठीच फक्त ॲस्पिरिनची शिफारस केली जाते
काही संशोधकांनी बऱ्याच कालवधीसाठी बेबी ॲस्पिरिन वापरणाऱ्या स्त्रियांबाबतही अभ्यास केला होता आणि असे आढळले की, त्यामुळे त्यांच्या हार्ट अॅटॅकचा धोका कमी झाला नाही; परंतु रक्तस्राव होण्याचा धोका वाढला. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये याचा थोडा फायदा दिसून आला .

ॲस्पिरिन कसे दिले जाते?

नेहमी लक्षात ठेवा की, एकदा तुम्हाला हार्ट अटॅक आणि स्ट्रोक आला किंवा स्टेंटिंग आणि बायपाससारखी प्रक्रिया झाली असेल त्यानंतर लगेच ब्लॉकेज कमी करण्यासाठी तुम्हाला ॲस्पिरिनचा जास्तीचा डोस दिला जाईल. हा डोस नंतर टप्प्याटप्प्याने कमी केला जातो आणि आयुष्यभर घ्यावा लागतो. या सर्वांचा अर्थ तुमच्या हृदयरोगतज्ज्ञाने तुमच्या अवयवाच्या कार्यक्षमतेनुसार हा निर्णय घेणे अपेक्षित आहे.

हेही वाचा – हाताच्या कोपराला दुखापत झाल्यानंतर इतक्या वेदना का होतात? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

तुम्‍हाला आतापर्यंत हृदयाच्या आजारासंबंधी कोणतीही लक्षणे दिसून आली नसतील, तर तो टाळण्यासाठी स्वत:हून ॲस्पिरिन घेऊ नका. त्याऐवजी आपल्या इतर आजारासंबंधी काळजी घ्या. काही वेळा ज्या रुग्णांच्या धमन्यांमध्ये लक्षणीय प्रमाणात प्लेक जमा होण्याचा मोठा धोका असतो, तो इतरांपेक्षा आगामी १० वर्षांमध्ये हार्ट अटॅकचा धोका येणाचा १० टक्के जास्त असतो किंवा अनेक इतर आजार जसे की, मधुमेह आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते, त्यांच्यासाठी हृदयरोगतज्ज्ञ निवडक बेबी ॲस्पिरिननच्या वापराचा निर्णय घेतात. पण, ज्यांना या आजारांचा धोका कमी आहे अशा व्यक्तींमध्ये ॲस्पिरिनच्या वापराचे तोटे फायद्यांपेक्षा जास्त आहेत.

(या लेखातील माहिती डॉ. निशिथ चंद्र यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली आहे.)

Story img Loader