Is sattu really a protein powerhouse : सातू (Sattu) एक पारंपरिक भारतीय पदार्थ आहे, जो सामान्यतः प्रथिनेयुक्त (Protein Powerhouse Sattu) सुपरफूड म्हणून ओळखला जातो. जर सातूच्या नुट्रीशनल प्रोफाइलबद्दल अगदी डिटेलमध्ये अभ्यास केला तर याची पोषणात्मक माहिती थोडी जास्त जटिल आहे. तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने, डायट एक्सपर्ट्सच्या सीईओ, मुख्य आहारतज्ज्ञ सिमरत कथुरिया यांच्याशी संवाद साधला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सातूमधील प्रोटीन कंटेन्ट :

आहारतज्ज्ञ सिमरत कथुरिया म्हणाल्या की, सातूच्या प्रथिनांचा स्तर (प्रोटीन कंटेन्ट) त्याच्या उत्पादनाची पद्धत, भौगोलिक स्थान आणि त्यात वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट धान्यांवर अवलंबून असतो. सातू चण्याच्या पीठापासून तर गहू, ज्वारी, बाजरी किंवा रागीच्या पीठापासूनही तयार केला जातो; तर गव्हाच्या पीठापासून तयार केलेल्या सातूमध्ये प्रति १०० ग्रॅम अंदाजे १२ ते १५ ग्रॅम प्रथिने असतात, तर चण्याच्या पीठापासून तयार केलेल्या सातूमध्ये प्रति १०० ग्रॅम अंदाजे २० ते २५ ग्रॅम प्रथिने (Protein Powerhouse Sattu) असतात. याव्यतिरिक्त माती, हवामान, पारंपरिक प्रक्रिया तंत्र यांसारखे प्रादेशिक घटकदेखील त्याच्या पोषक रचनेवर प्रभाव टाकतात.

सातू प्रोटीन सोर्स :

सिमरत कथुरिया यांनी प्रथिने स्रोत म्हणून सातूच्या सेवनाचे प्रमाण आणि स्थानिक पाककृती पद्धतींचे मूल्यांकन केले. कारण सातू विविध भारतीय पदार्थांमध्ये वापरला जातो, ज्याचे सर्वसाधारण प्रमाण २० ते ५० ग्रॅमपर्यंत असते. म्हणजेच प्रत्येक सर्व्हिंगमध्ये फक्त ४ ते १२ ग्रॅम प्रथिने तुमच्या शरीराला मिळतात. सातू खाण्यामुळे शाकाहारी खाणाऱ्यांना प्रथिने मिळू शकतात, त्यामुळे सातू आपल्या आहारात समाविष्ट करणे फायदेशीर आहे. खास करून त्या ठिकाणी, जिथे सातूचे नियमितपणे सेवन केले जाऊ शकते. बिहार आणि झारखंडसारख्या ठिकाणी, जिथे सातू हा मुख्य आहाराचा भाग (Protein Powerhouse Sattu) आहे, तिथे पराठासारखे पदार्थ प्रथिनांची मात्रा वाढवण्यात मदत करतात.

हेही वाचा…Stop Throwing Out Banana Strings : केळे खा; पण स्ट्रिंग्स काढून फेकू नका; ‘या’ तीन आरोग्य समस्यांसाठी ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात

सातूचा जेव्हा आपण मसूर, सोयाबीन यांसारख्या वनस्पतीआधारित स्त्रोतांच्या प्रथिने गुणवत्तेची (Protein Powerhouse Sattu) तुलना करतो तेव्हा त्याच्या काही मर्यादा समोर येतात. म्हणजेच सातूमध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ल प्रोफाइल लायसिनसुद्धा कमी असतो. त्यामुळे या गोष्टीचा समतोल (संतुलित मात्रा) अमायनो ॲसिडचे सेवन सुनिश्चित करण्यासाठी सातूला इतर प्रथिनेयुक्त पदार्थांबरोबर खाल्ल्याने तुम्हाला अधिक पोषण मिळेल, असे सिमरत कथुरिया म्हणतात.

सातू आणि रक्तातील साखर:

सातूचा कार्बोहायड्रेट्सच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होतो का हेसुद्धा सिमरत कथुरिया यांनी स्पष्ट केले. सातूमध्ये मुख्यतः जटिल कार्बोहायड्रेट्स (Protein Powerhouse Sattu) असतात, जे हळूहळू ग्लुकोज सोडण्यास प्रोत्साहन देऊन रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत करतात. पण, प्रत्येक व्यक्तीची प्रतिक्रिया वेगळी असू शकते; त्यामुळे काही लोकांना सातू खाल्ल्यावर रक्तातील साखरेमध्ये बदल दिसू शकतो.

मधुमेह असलेल्या व्यक्तींनी किंवा रक्तातील साखरेची पातळी व्यवस्थापित करणाऱ्यांनी सातू खाण्याचे प्रमाण नियंत्रित करणे आणि सातूला कमी ग्लायसेमिक फूड्ससह खाणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर वैयक्तिक आहार सल्ल्यासाठी आरोग्यतज्ज्ञ किंवा आहारतज्ज्ञाशी संपर्क साधणे आवश्यक आहे, ज्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याच्या गरजेनुसार योग्य मार्गदर्शन मिळेल. त्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यात मदत होईल, असे सिमरत कथुरिया म्हणतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Protein powerhouse sattu his protein content varies significantly depending on its production method geographical origin and the specific grains used in its preparation asp