weight loss: रोजच्या धकाधकीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीमुळे लोकांचे वजन झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे अत्यंत कमी वयामध्ये वेगवेगळे आजारदेखील निर्माण होत आहेत. जास्त प्रथिनांनी युक्त असलेले अन्न खाणे वजन कमी करण्यासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. शाकाहारी लोक त्यांच्या आहारात उच्च प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करू शकतात. असा आहार केवळ प्रथिनेच नव्हे, तर इतर आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजांनी समृद्ध असतो. सात दिवस उच्च प्रथिनयुक्त आहार घेतल्यास वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.

मात्र, ते दीर्घकाळ टिकणारे नाही. वजन कमी करणे हे तुमच्या सवयीपेक्षा कमी कॅलरी खाण्यावर अवलंबून असते. प्रथिनांमुळे वजन कमी होत नाही; पण त्यात जास्त प्रमाणात असलेला आहार तृप्ततेची हमी देतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते आणि परिणामी तुम्ही कमी खाता, तुमची लालसा कमी होते. या संदर्भात ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

cockroaches how to get rid of cockroaches by using home remedy rice helps to remove cockroaches jugaad
झुरळांचा त्रास आता कायमचा होईल गायब! ‘रात्रीचा भात’ वापरून होईल कमाल, पाहा जुगाडू उपाय
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
Amla kadha benefits
वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आवळ्याचा काढा खरंच फायदेशीर आहे का?
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
A 6-6-6 walking regimen will improve your health Experts
६-६-६ चालण्याचा नियम तुमच्या आरोग्य सुधारेल; तज्ज्ञांनीही सांगितले जबरदस्त फायदे…

रोज रोज प्रथिनयुक्त अन्न खाणे तसे कठीण आहे. आपल्याला चमचमीत खायची सवय असते. अशा वेळी साधे प्रथिनयुक्त अन्न खाताना कठीण जाते. अशा वेळी आपण काही दिवस हे अन्न खातो आणि वजन कमी झाल्यावर पुन्हा आपले रोजचे जेवण जेवतो. आहारातून जास्त प्रथिने घेतल्यामुळे तुमचे मूत्रपिंड खराब होऊ शकते. रक्तातील अतिरिक्त प्रथिने फिल्टर करण्यासाठी मूत्रपिंड जबाबदार असतात. जर तुम्ही जास्त प्रथिने खाल्ली, तर मूत्रपिंडावर परिणाम होऊ शकतो. जास्त काळ प्रथिनांचे सेवन केल्याने पचन आणि हाडांचे विकारही होऊ शकतात. अतिशय सक्रिय जीवनशैली असलेले लोक बैठी जीवनशैली असलेल्या लोकांपेक्षा जास्त प्रमाणात प्रथिने सहन करू शकतात.

प्रथिनयुक्त अन्न हे हळूहळू पचणारे पोषक आहे, यामुळे व्यायाम करणे कठीण होऊ शकते, जे वजन कमी करण्यासाठी महत्वाचे आहे. जास्त प्रमाणात प्रथिने खाल्ल्याने बद्धकोष्ठता, अतिसार आणि गॅस सारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.जास्त प्रथिने खाल्ल्याने निर्जलीकरण होऊ शकते, ज्यामुळे थकवा, चक्कर येणे आणि डोकेदुखी होऊ शकते.

जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे

जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्या आहार आणि जीवनशैलीत बदल करणे महत्त्वाचे आहे. तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी करण्यासाठी वैयक्तिक सल्ला घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांशी किंवा नोंदणीकृत आहारतज्ज्ञांशी बोला. महिलांनी १,२०० ते १,५०० ते १,८०० कॅलरी असलेला आहार घ्यावा. तुमच्या आहाराचे नियोजन करताना तज्ज्ञ तुमच्या शरीराचे वजन बघेल आणि त्यानुसार तुमचा व्यायाम ठरवेल. साधारणपणे, तुम्हाला तुमच्या दैनंदिन गरजेपेक्षा सुमारे ३० टक्के कमी कॅलरी खाण्याची गरज आहे.

हेही वाचा >> Weight Loss: दही की ताक? वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावे, वाचा तज्ज्ञ काय सांगतात

व्यायामाला पर्याय नाही

आहारावर नियंत्रण आवश्यक असताना, व्यायाम हा एक पर्याय आहे; जो तुमचे वाढणारे वजन कमी करू शकतो. तुम्ही आठवड्यातून किमान १५० मिनिटे शारीरिक हालचाली कराव्यात; जसे की वेगाने चालणे. केवळ आहाराद्वारे वजन कमी करण्याची शिफारस करण्यात आलेली नाही. त्यामुळे व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायामाने तुमचा मधुमेह, रक्तदाब व हृदयविकाराचा धोकाही कमी होईल.

Story img Loader