भाज्यांमध्ये अनेक पौष्टिक तत्व असतात. त्यांच्या सेवनाने अनेक आजारांपासून आराम मिळू शकते. जसे सलगम ही भाजी हिवाळ्याच्या हंगामात मिळते. सलगमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, मॅगनीज आणि सेलेनियम सारखी सूक्ष्म खनिजे असतात. सलगममधील अँटिऑक्सिडेंट आणि जीवनसत्व डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. सलगम प्रमाणेच मुळ्यातही काही औषधी गुण असतात जे काही आजारांना नियंत्रणात ठेवण्यात मदत करू शकतात. मुळा सलाद म्हणून खाता येते. यासह त्याच्या पाणाने भाजी आणि पराठे बनवता येते. मुळा कोणत्या आजारांवर उपयुक्त आहे, याबाबत जाणून घेऊया.
१) पाचन तंत्र सुरळीत ठेवते
मुळ्यात विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. मुळ्यातील फायबर आतड्यांची स्वच्छता करण्यात मदत करते. ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे, त्यांनी मुळ्याचे सेवन केले पाहिजे.
२) रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करते
मुळ्यात पोटॅशियम असते जे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. त्याचबरोबर, मुळा खालल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. मुळ्यातील अँथोसायनिन नावाचे संयुग रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यात मदत करते.
३) मधुमेहात फायदेशीर
मुळ्यातील औषधी गुण मधुमेह नियंत्रणात ठेवण्यात मदत करू शकतात. मुळ्यातील अॅडिपोनेक्टिन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यात मदत करते. म्हणून मुळा हा मधुमेहावर उपयुक्त आहे.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)