Rakul Preet Singh Injury: गंभीर दुखापतीमुळे अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या बेड रेस्टवर आहे. एएनआयने वृत्त दिले आहे की, “८० किलोच्या डेडलिफ्टदरम्यान पाठीत दुखल्यामुळे ही दुखापत झाली आहे.” अभिनेत्रीने याबाबत तिच्या चाहत्यांसह इन्स्टाग्रामवर एक अपडेट शेअर केलं आहे, जिथे तिने तिच्यासमोरील आव्हाने शेअर केली आणि आपल्या शरीराचे ऐका असं सांगण्यावर जोर दिला.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रकुलने तिच्या दुखापतीबद्दल स्पष्टपणे सांगितले: “हाय, आज मी हेल्थ अपडेट देणार आहे. मी खूप मूर्खपणा केला आणि माझ्या शरीराचे ऐकले नाही. मला स्पाझम (spasm- स्नायूंना आलेला आकुंचनाचा झटका) झाला होता आणि मी तरीही शरीराला आराम दिला नाही आणि ही दुखापत मोठ्या दुखापतीत बदलली. गेले सहा दिवस मी बेडवर आहे. मला वाटते की मला पूर्णपणे बरे होण्यासाठी आणखी एक आठवडा लागेल. मला खरोखर आशा आहे की मी त्याआधीच बरी होईन, कारण माझ्यासाठी हार मानणे आणि विश्रांती घेणे सोपे नाही. परंतु, हा मी एक धडा शिकले आहे की, कृपया तुमचे शरीर जेव्हा तुम्हाला सिग्नल देते तेव्हा त्याचे ऐका. स्वत:ला अधिक त्रास करून घेऊ नका. मला वाटले की, माझे मन माझ्या शरीरापेक्षा मजबूत आहे. पण, अशी समज नेहमीच योग्य ठरत नाही. तुमच्या सर्व शुभेच्छांबद्दल खूप खूप धन्यवाद, विशेषत: ज्या लोकांना माझी आठवण येते; मी आणखी स्ट्रॉंग कमबॅक करेन.”

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
In her Instagram video, Rakul preet singh spoke about her injury (Source: Rakulpreet/Instagram)

दिल्लीच्या सीके बिर्ला हॉस्पिटलमधील फिजिओथेरपी विभागाचे प्रमुख डॉ. सुरेंदर पाल सिंग यांनी, विशेषत: डेडलिफ्टसारख्या व्यायामादरम्यान, वर्कआउटसंबंधित पाठीच्या दुखापतींच्या कारणांवर जोर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, चुकीची पद्धत (improper form) आणि सुरक्षा साधनांची कमी, जसे की बेल्ट, यामुळे दुखापत होऊ शकते. डेडलिफ्ट्स करत असताना त्याची पद्धत महत्त्वाची असते. चुकीची पोझिशन किंवा क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलल्याने पाठीच्या खालच्या स्नायूंवर प्रचंड ताण पडतो, ज्यामुळे स्पाझम किंवा अधिक गंभीर दुखापत होऊ शकते.

हेही वाचा… ‘या’ आयड्रॉपचा वापर कराल तर चष्मा विसरून जाल? किंमत फक्त ३५० रुपये, तज्ज्ञ सांगतात ‘असा’ होईल फायदा

डॉ. सिंह यांनी वजन उचलण्यापूर्वी योग्य वॉर्मअप रुटीनचे महत्त्व अधोरेखित केले. वार्म-अप न करता स्नायू पुढल्या वर्क-आऊटसाठी तयार होत नाहीत, ज्यामुळे ताण येण्याचा धोका वाढतो. याशिवाय, चांगल्या प्रकारचे उपकरण वापरणे आणि आपल्या क्षमतेच्या आत वजन उचलल्याने या दुखापती टाळता येऊ शकतात.

हेही वाचा… नवरात्रीत कतरिना कैफच्या हातावर दिसला काळा पॅच, याचा कोणत्या आजाराशी आहे संबंध? तज्ज्ञांनी केला खुलासा

व्यायामाच्या दुखापती टाळण्यासाठी मुख्य मुद्दे

१. वॉर्मअप : कोणतेही जड वजन उचलण्यापूर्वी, स्नायू आणि सांधे यांना आणखी येणाऱ्या ताणासाठी तयार करण्यासाठी योग्यरित्या वॉर्मअप करणे महत्त्वाचे आहे.

२. योग्य उपकरण वापरा : तुमच्या पाठीच्या खालच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी डेडलिफ्टसारखे व्यायाम करताना नेहमी सपोर्ट बेल्ट घाला.

३. तुमची पद्धत पाहा : वजन उचलताना योग्य पोझिशन आणि अंगभूत पद्धत (angulation) महत्त्वाची आहे. फिटनेस प्रशिक्षक तुमची पद्धत योग्य आहे का ते पाहू शकतो.

४. तुमच्या शरीराचे ऐका : जर तुम्हाला काही अस्वस्थता वाटली, तर ताबडतोब थांबा. वेदना सहन केल्याने दुखापत वाढू शकते.

५. हळूहळू प्रगती करा : तुम्ही उचललेले वजन हळूहळू वाढवा. एकदम जास्त वजन उचलल्याने गंभीर दुखापत होऊ शकते.

(टीप : हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे. आपल्या दिनचर्येत कोणताही बदल करण्यापूर्वी नेहमी आपल्या आरोग्य चिकित्सकाचा सल्ला घ्या.)