दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. घरात सुखसमृद्धी नांदावी आणि त्यासाठी दिवे लावून दीपावली साजरी केली जाते. अनेक जण दिवाळीमध्ये पार्ट्या आयोजित करतात. आप्तस्वकीयांना बोलावून मेजवानी साजरी करतात. काही लोक मद्यपानसुद्धा करतात. सणासुदीच्या काळात मद्यपान करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का अतिप्रमाणात मद्यपान केल्यामुळे विषबाधा होऊ शकते? रुबी हॉल क्लिनिकच्या औषध सल्लागार डॉ. सुधा देसाई ‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या एका वृत्तात याविषयी सांगतात, “जेव्हा मद्यपानामुळे विषबाधा होते, तेव्हा श्वास घेण्यास त्रास उदभवतो आणि हृदयाचे आरोग्य, तसेच शरीराच्या तापमानावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“मद्यपानमुळे झालेली विषबाधा ही एक गंभीर आणि जीवघेणी परिस्थिती असते. संपूर्ण शरीरावर याचा विपरीत परिणाम जाणवतो”, असे उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल सांगतात.

वजन अनियंत्रित असल्यामुळे किंवा संपू्र्ण आरोग्य नीट नसल्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता वाढते. सध्या मद्यपानामध्ये ‘बिंज ड्रिंकिंग’ (Binge drinking) नावाचा एक नवा प्रकार समोर आला आहे. जे लोक महिन्यातून एकदाच, पण अतिप्रमाणात दारूचे सेवन करतात; त्यालाच ‘बिंज ड्रिंकिंग’, असे म्हणतात. महिन्यातून एकदा अतिप्रमाणात मद्यपान केल्यामुळे आरोग्यास होणारा धोका आणखी वाढतो.

केअर हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन सल्लागार डॉ. राहुल चिराग सांगतात, “काही लोकांचे बीएसी (Blood Alcohol Concentration) हे ०.०८% किंवा त्यापेक्षा जास्त असते. त्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता वाढते.

मद्यपानामुळे होणाऱ्या विषबाधेची लक्षणे कोणती?

  • वांरवार गोंधळ होणे
  • मेंदूवर परिणाम होणे
  • उलटी होणे
  • श्वास घेण्यास त्रास होणे
  • शरीराचे तापमान कमी होणे
  • चक्कर येणे

हेही वाचा : तुम्हाला मधुमेह आहे, पण गोड खायला आवडते का? वाचा, तज्ज्ञांनी सांगितलेल्या खास डाएट टिप्स

जर कुणाला मद्यपानामुळे विषबाधा झाली असेल, तर त्वरित काय करावे?

  • मद्यपानामुळे विषबाधा झाली असेल, तर लगेच डॉक्टरांना फोन करावा.
  • ज्या व्यक्तीला विषबाधा झाली आहे, त्यांना एकटे सोडू नका.
  • त्यांना जागे ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यांना प्रोत्साहन द्या.
  • ज्या व्यक्तीला विषबाधा झाली आहे, त्यांच्याबरोबर राहा. त्यांना उलटीचा त्रास होऊ शकतो.
  • जर त्यांना चक्कर येत असेल, तर त्यांना मोकळा श्वास घेण्यास मदत करा.

“विषबाधा झालेल्या व्यक्तीला थंड पाण्याने अंघोळ करण्यास, गरम पेय पिण्यास किंवा त्यांच्याभोवती गर्दी करण्यास मनाई केली आहे. त्यामुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते”, असे डॉ. देसाई म्हणाल्या.

याबरोबर चुकूनही कधी करू नये मद्यपान…

अँटीहिस्टामाइन्स (Antihistamines)बरोबर मद्यपान करणे खूप धोकादायक ठरू शकते. अँटीहिस्टामाइन्स हे अॅलर्जीच्या उपचारासाठी घेतले जाते. हेरॉइन (Heroin) सारख्या बेकायदा ड्रग किंवा ऑक्सिकोडोन व मॉर्फिन (Oxycodone and Morphine)सारख्या ओपिओइड पेनकिलरचे मद्यपानाबरोबर सेवन करणे अत्यंत धोकादायक आहे. अल्कोहोलप्रमाणेच हे पदार्थसुद्धा मेंदूवर विपरीत परिणाम करतात. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होण्यासारख्या गंभीर समस्या निर्माण होतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Really drinking too much alcohol during festival season cause alcohol poisoning how alcohol poisoning happen read what expert said ndj
Show comments