Early Dinner & Better Sleep : तुम्ही अनेकदा ऐकले किंवा वाचले असेल की, रात्रीचे जेवण उशिरा करू नये. रात्री लवकर जेवण करण्याचे अनेक फायदे आहेत. लवकर जेवल्यामुळे वजन नियंत्रण आणि पचनक्रिया सुरळीत राहते; पण त्याबरोबरच चांगली झोपसुद्धा येते, ज्यामुळे तुमची एनर्जी लेव्हल सुधारू शकते. रात्री उशिरा अनेकांना स्नॅक्स किंवा आईस्क्रीम खायला आवडते, पण तुमच्या आरोग्यासाठी या गोष्टी चांगल्या नाही.

रात्री लवकर जेवण केल्यामुळे तुमची झोप कशी सुधारू शकते, याविषयी न्यूट्रिशनिस्ट राशी चौधरी सांगतात, “जेव्हा तुम्ही रात्रीचे जेवण लवकर करता, तेव्हा मेलाटोनिन हार्मोन रक्तप्रवाहात सोडायला पुरेसा वेळ मिळतो, ज्यामुळे शरीरातील एन्झाइम सुधारतात आणि तुम्हाला सकाळी उत्साही आणि ताजेतवाने वाटते.

Sanjay singh
Sanjay Singh: आपचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय सिंह म्हणतात, “हम ना बटेंगे ना कटेंगे; हम भाजप को लपेटेंगे”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Arjun Kapoor confirming breakup with Malaika Arora and told about importance of emotional freedom
मलायका अरोराबरोबर ब्रेकअपनंतर अर्जुन कपूरने सांगितले, भावनिक स्वातंत्र्य का महत्त्वाचे? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात
Ajit Pawar on Amit Shah
‘देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री?’, अमित शाहांच्या त्या विधानावर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “निवडणूक झाल्यावर…”
Loksatta chaturang Along with sensible profound partner family
इतिश्री: समंजस, प्रगल्भ सोबत
Pankaj Tripathi shares recipe for his ‘special’ masala chai
पंकज त्रिपाठी मसाला चहामध्ये टाकतात तमालपत्र! चहामध्ये तमालपत्र घालावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे

रात्री लवकर जेवण केल्यामुळे झोप कशी सुधारते?

हैद्राबाद येथील केअर हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉ. जी. सुषमा यांनी ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना चौधरी यांच्या मतावर सहमत असल्याचे सांगितले. त्यांनी रात्री लवकर जेवणाचे फायदे सांगितले आहेत.

पचनक्रिया सुधारते

रात्रीचे जेवण लवकर केल्यामुळे शरीराला झोपण्यापूर्वी अन्न पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. यामुळे अपचनासारख्या समस्या टाळता येतात. जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर पचनक्रिया बिघडू शकते, त्यामुळे रात्री लवकर जेवण करावे.

हेही वाचा : बाळाच्या शांत झोपेसाठी स्तनपान कसं फायदेशीर आहे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात

चांगली झोप

रात्रीचे जेवण लवकर केल्याने चांगली झोप येते. जेव्हा तुम्ही जेवण करता आणि लगेच झोप घेता त्यामुळे तुम्ही अन्न पचवू शकत नाही आणि अनेकदा झोपताना त्रास जाणवू शकतो; पण रात्रीचे जेवण लवकर केल्याने शांत झोप येऊ शकते.

वजन नियंत्रण

जेवण लवकर केल्यामुळे वजन नियंत्रणात राहू शकते. अनेकदा उशिरा जेवल्यानंतर लगेच झोप येते, त्यामुळे पचनक्रिया सुरळीत होत नाही आणि वजन वाढू शकते. रात्रीचे जेवण लवकर केल्यामुळे रात्री उशिरा स्नॅक खाणे आपण टाळू शकतो, ज्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे अधिक सोपे जाते.

रक्तातील साखरेची पातळी

रात्रीचे जेवण लवकर केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवता येते. जेव्हा तुम्ही लवकर जेवण करता तेव्हा अन्नपचन चांगल्याप्रकारे होते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि शरीराचे मेटाबॉलिजम सुधारते.

हेही वाचा : अ‍ॅनिमियासाठी ‘हा’ आहे बेस्ट डाएट प्लॅन, जेवण करताना चहा आणि कॉफी पिऊ नका, जाणून घ्या यामागची कारणे

एनर्जी

जेव्हा तुम्ही रात्रीचे जेवण लवकर करता, तेव्हा तुमच्या शरीराला अन्न पचवण्यासाठी आणि पोषक तत्वे शरीरात शोषून घेण्यासाठी अधिक वेळ मिळतो. यामुळे शरीराला एनर्जी मिळते आणि व्यक्तीचा मूड सुधारतो.

रात्रीचे लवकर जेवण पचनक्रिया आणि वजन नियंत्रणासाठी फायदेशीर

वजन वाढ ही दिवसेंदिवस वाढत असलेली एक गंभीर समस्या आहे.
वजन कमी करण्यासाठी सर्वात आधी आहारात बदल करणे गरजेचे आहे. कोणता आहार घ्यावा आणि आहार घेण्याची वेळ, या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.

मणिपाल हॉस्पिटलचे जनरल लॅपरोस्कोपिक डॉ. सुमित तलवार म्हणतात, “जेवणाच्या वेळेबाबत अनेक प्रचलित गोष्टी आहेत आणि या गोष्टी तितक्याच प्रभावशालीसुद्धा आहे. उपवास करताना काहीही न खाणे, रात्रीचे लवकर जेवण करणे आणि इंटरमिटंट उपवास करणे इत्यादी गोष्टींचा त्यात समावेश आहे.”
इंटरमिटंट उपवास ही एक वजन कमी करण्याची चांगली पद्धत आहे. ही एक आहार घेण्याची पद्धत आहे. यामध्ये दिवसाच्या दोन कालावधीत विभाजन केले जाते. एका कालावधीत जेवण करायचे आणि दुसऱ्या कालावधीत उपवास करायचा.
याशिवाय डॉ. सुमित तलवार सांगतात, “रात्री लवकर जेवण केल्यामुळे झोप सुधारते आणि चांगल्या झोपेमुळे आरोग्यही उत्तम राहते.”

हेही वाचा : व्यक्तीच्या वयापेक्षा त्याच्या हृदयाचे वय जास्त असेल तर येऊ शकतो हार्ट अटॅक? कसे जाणून घ्यायचे हृदयाचे वय? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात …

मुंबईच्या नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ आणि न्यूट्रिशनिस्ट उषाकिरण सिसोदिया सांगतात, “रात्री लवकर जेवणाचे भरपूर फायदे आहेत. झोपण्याच्या दोन तासाआधी रात्रीचे जेवण करावे, यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि इन्सुलिनच्या सेन्सिटिव्हिटीमुळे टाइप २ मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. याशिवाय शरीराला अन्न पचण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि पचनक्रिया सुधारते. यामुळे जीईआरडी (GERD) (पचनाशी संबंधित दीर्घकालीन आजार) सारख्या आजाराचा धोका कमी होतो.”