Fasting : गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अभ्यासांतून इंटरमिटेन्ट फास्टिंग किंवा विशिष्ट वेळेदरम्यान खाण्याचे फायदे सांगितले आहेत. एका नवीन अभ्यासात लवकर जेवणाचे फायदे सांगितले आहेत. सायंकाळी ५.३० पर्यंत जेवल्यानंतर थेट सकाळी १० वाजता नंतर जेवण करावे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी सुधारते आणि पोटावरील फॅट्स कमी होतात. या अभ्यासात सहभाग घेतलेल्या लोकांनी मेडिटेरेनियन आहार घेतला. हा आहार वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.
नेचर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या स्पॅनिश अभ्यासामध्ये ३० ते ६० वयोगटातील २०० लोकांनी सहभाग घेतला होता; ज्यांचा बॉडी मास इंडेक्स (BMI) ३२ पेक्षा जास्त होता. ते सर्व मेडिटेरेनियन आहार घेत होते आणि उपवास न करणाऱ्या गटांमध्ये विभागले गेले होते.
संशोधकांना असे आढळले की, सर्व उपवास करणाऱ्या गटांमध्ये वेळ ठरवून उपवास न केल्याने वजन कमी होते म्हणजेच सरासरी ३-४ किलो वजन कमी होते. पण, जे सायंकाळी ५.३० पर्यंत जेवण करतात आणि सकाळी १० वाजता जेवण करतात. त्यांच्या पोटावरील फॅट्स कमी झाले आणि शरीरातील ग्लुकोजच्या पातळीत सुधारणा झाली आहे. यावरून असे दिसून आले की, शरीराच्या नैसर्गिक शारीरिक वेळापत्रकानुसार जेवण करणे फायदेशीर आहे.
गुरुग्राम येथील मेदांताच्या अँडोक्रायनोलॉजी व मधुमेह विभागाचे सहायक संचालक डॉ. परजीत कौर सांगतात, “दिवस संपायच्या आधी तुम्ही जेवण करीत असाल, तर ते रक्तातील साखर आणि शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. सकाळी १० ते सायंकाळी ५.३० दरम्यान तुम्ही जेवण करीत असाल, तर ‘या’ विशिष्ट आठ तासांचा तुमच्या वैयक्तिक जीवनशैलीवर परिणाम दिसून येतो.”
रक्तातील साखर आणि पोटावरील फॅट्स कमी करण्यासाठी १६:८ दिनचर्या सर्वांत प्रभावी का ठरते?
दिवसभर आठ तासांदरम्यान खाल्यानंतर १६:८ पद्धत पोटावरील फॅट्स कमी करण्यासाठी आणि ग्लुकोज नियंत्रणासाठी प्रभावी ठरते. कारण- यामुळे दीर्घ उपवास करता येतो. उपवासादरम्यान शरीर नैसर्गिकरीत्या इन्सुलिनचे उत्पादन कमी करते, जे खाण्याच्या कालावधीत प्रभावीपणे इन्सुलिन वापरण्याची क्षमता सुधारू शकते.
त्यामुळे हे इन्सुलिन रेझिस्टन्स सुधारते आणि शेवटी रक्तातील साखरेच्या पातळीत सुधारणा दिसून येते. कमी इन्सुलिनसह शरीरात साठवलेल्या ग्लुकोजचा उपयोग होतो; ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी आणि कॅलरी नियंत्रित करण्यात मदत होते. उपवासादरम्यान शरीर नैसर्गिकरीत्या कमी कॅलरीज वापरते, जे वजन नियंत्रणात फायदेशीर ठरू शकते.
जेवणाची वेळ महत्त्वाची आहे का?
जेवणाची वेळ महत्त्वाची आहे. त्यामुळे शरीराची चयापचय क्रिया सुधारते. खाण्याची वेळ आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. ही वेळ आठ तासांपर्यंत मर्यादित करून, तुम्ही कमी कॅलरीज वापरू शकता. इन्सुलिनची पातळी कमी होत असताना, शरीर ऊर्जेसाठी साठवलेल्या फॅट्सचा उपयोग करते; ज्यामुळे पोटाभोवती असलेले फॅट्स कमी होतात. काहीही न खाल्यामुळे भुकेसाठी ओळखले जाणारे घ्रेलिन हार्मोन (ghrelin) आणि लेप्टिन (leptin) हार्मोन्सचे कार्य सुधारते; ज्यामुळे भूक लागत नाही.
ठरावीक वेळेत आहार घेतल्याने वजन कमी करण्याच्या इतर पद्धतींच्या तुलनेत कमी कालावधीत फायदे दिसून येते; पण दीर्घकालीन फायदे जाणून घेण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे.