Diabetes Patient : मधुमेहाच्या रुग्णांनी योग्य आहार घेणे आवश्यक आहे. काय खावे आणि काय खाऊ नये याविषयी डॉक्टर नेहमी त्यांना सल्ला देतात. आंबवलेले पदार्थ जसे की इडली, डोसा खायला अनेकांना आवडतो. असे आंबवलेले पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठीसुद्धा फायदेशीर आहेत. याविषयी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना अपोलो हॉस्पिटलच्या न्युट्रिशनिस्ट डॉ. प्रियंका रोहतगी यांनी सविस्तर माहिती दिली.

डॉ. प्रियंका रोहतगी सांगतात, “इडली, डोसा, दही यांसारख्या आंबवलेल्या पदार्थांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आंबवणे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे. त्यामध्ये बॅक्टेरिया, यीस्ट व बुरशी यांसारखे सूक्ष्म जीव कार्बोहायड्रेटला अल्कोहोलमध्ये रूपांतरीत करतात. अनेक दिवस पदार्थांची चव टिकवण्यासाठी ही अत्यंत फायदेशीर प्रक्रिया आहे. आंबवलेले पदार्थ खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

Is it necessary to constantly change the toothbrush
सतत टूथब्रश बदलणं गरजेचं आहे का? काय सांगतात आरोग्य तज्ज्ञ..
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
amla and dates as powerful alternatives to beetroots and pomegranates for anemia treatment
तुम्हाला ॲनिमिया आहे अन् बीटरुट व डाळिंब खायला आवडत नाही? मग तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ दोन फळे खा
Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान
is petroleum jelly safe to consume know expert advice petroleum jelly uses and effects
तुम्ही पेट्रोलियम जेली खाताय? चेहऱ्यालादेखील लावताय? पण यामुळे उद्भवू शकतात आरोग्याचे अनेक धोके; जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Bananas and Curd
केळी आणि दह्याचे एकत्रित सेवन लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
iit bombay researchers discover with help of robots how animals find their way back home
IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमानवाच्या सहाय्याने आयआयटी मुंबईचे संशोधन

आंबवलेले पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी कसे फायदेशीर आहेत?

१. आंबवलेल्या पदार्थांमध्ये प्रो-बायोटिक्स असल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राखण्यास मदत होते. टाईप २ चा मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आंबवलेले पदार्थ आवर्जून खावेत.

२. आंबवलेले पदार्थ आतड्यांमध्ये असलेल्या मायक्रोबायोमला प्रोत्साहन देते. मायक्रोबायोम चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते.

३. टाईप-२ चा मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी लठ्ठपणा चांगला नाही. काही अभ्यासांवरून असे लक्षात आलेय की, आंबवलेल्या पदार्थांत कॅलरीज कमी असतात. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

४. आंबवलेल्या पदार्थांपासून आपल्या शरीराला चांगली पोषक तत्त्वे मिळू शकतात. दह्यासारख्या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम व मॅग्नेशियम यांसारखे पोषक घटक असतात; जे आपल्या हाडांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आवश्यक असतात.

हेही वाचा : Puberty : किशोरवयात येण्यापूर्वी मुलींनी चांगल्या हार्मोनल आरोग्यासाठी ‘हे’ पदार्थ खावेत; वाचा तज्ज्ञ काय सांगतात….

कोणते आंबवलेले पदार्थ मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगले आहेत?

दही : दह्यामध्ये प्रो-बायोटिक्स असतात; ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

केफिर : दुधापासून बनविलेल्या केफिरमध्ये प्रो-बायोटिक्स असतात; जे आतड्यांचे आरोग्य सुदृढ ठेवण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

घरी बनवलेले लोणचे : आपल्यापैकी अनेकांना लोणचे खूप आवडते. पण, तुम्हाला माहीत आहे का की कच्च्या कैरीच्या किंवा मिक्स भाजीच्या लोणच्यामध्ये प्रो-बायोटिक्स असतात. त्यामुळे असे लोणचे मधुमेहाच्या रुग्णांनी आवर्जून खावे.

घरी बनवलेला डोसा आणि इडली : आंबवलेले तांदूळ, नाचणी व धान्यांमध्ये प्रोटिन्स आणि फायबरची मात्रा अधिक असते. त्यात कोलेस्ट्रॉल किंवा फॅट्स नसतात आणि ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो; ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

कोणते आंबवलेले पदार्थ कमी प्रमाणात खावेत?

साउरक्रोट किंवा आंबवलेल्या कोबीमध्ये सोडियमची मात्रा जास्त असते; ज्यामुळे रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. आंबवलेले पदार्थ खाताना सोडियमची मात्रा नेहमी कमी असावी.
आंबवलेल्या पदार्थांचे आहारात सेवन करणे मधुमेह असणाऱ्या रुग्णांच्या आरोग्यासाठी चांगले आहे; पण मधुमेह असणाऱ्या लोकांनी त्यांच्या आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.