Diabetes and X-rays : आरोग्य क्षेत्रात एक्स-रे या प्रणालीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एक्स-रेमुळे रुग्णाच्या शरीरात डोकावून पाहता येते. एक्स-रेचे अनेक प्रकार आहेत जसे की, रेडिओग्राफी, सिटी स्कॅन, फ्लूरोस्कोपी, मेमोग्राफी इत्यादी. उपचारांच्या गरजेनुसार हे वेगवेगळे प्रकार वापरले जातात.
कोणतीही क्षुल्लक तक्रार असेल तरी अनेकदा डॉक्टर रुग्णाला छातीचा एक्स-रे काढायला लावतात. छातीच्या एक्स-रेमुळे आरोग्याविषयी अधिक माहिती जाणून घेता येते. त्यात फुप्फुसावरून कोणता आजार असू शकतो, हे समजून घेणे सोपे जाते. पण, छातीच्या एक्स-रेमुळे तुम्हाला मधुमेहाचा वाढता धोका जाणून घेता येऊ शकतो का?

२०१० ते २०२१ दरम्यान २.७ लाखांपेक्षा जास्त छातीच्या एक्स-रे काढण्यात आले. १५,००० एक्स-रेंच्या एका ग्रुपवर याची चाचणी केली असता, असे आढळून आले की, या लोकांना मधुमेहाचा धोका असू शकतो. ज्यांनी नियमित एक्स-रे चाचणी केली नाही, त्यांना मधुमेहाचा धोका आहे की नाही, हे जाणून घेणे कठीण आहे.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Alcohol Addiction and Treatment in marathi
अभिनेत्री पूजा भट्टप्रमाणे तुम्हालाही दारूचं व्यसन सोडवायचंय? डॉक्टरांचे ‘हे’ उपाय करून पाहा, पुन्हा दारूकडे ढुंकूनही बघणार नाही
How Cold Weather Impacts Men's Sexual Health
हिवाळ्यात पुरुषाच्या लैंगिक आरोग्यावर कसा परिणाम होतो? तज्ज्ञांनी सांगितले, कशी घ्यावी काळजी?
Consume nutritious snacks to keep weight under control
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पौष्टिक स्नॅक्सचे करा सेवन; आहारतज्ज्ञांनी सांगितले बेस्ट ऑप्शन
minister nitesh rane put on onion garland by the farmer
नाशिक : नितेश राणे यांच्या गळ्यात कांद्याची माळ; शेतकरी ताब्यात
how to make natural lip balm at home
Home Made Lip Balm : थंडीने ओठ फाटलेत? मग १० मिनिटांत बीटापासून बनवा लिप बाम; वाचा, सोपी पद्धत

हेही वाचा : तुम्ही खूप पटकन भावूक होता का? असं का होतं अन् यावर उपाय काय? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….

मॅक्स हेल्थकेअरच्या एंडोक्रायनोलॉजी आणि डायबिटीजचे चेअरमन डॉ. अंबरीश मिथल सांगतात, “छातीच्या एक्स-रेमुळे आरोग्याच्या इतर समस्यांचेही निदान होऊ शकते; पण मधुमेहाचे निदान होऊ शकते का, हे जाणून घेणे खूप मनोरंजक आहे. मुळात रक्त तपासणी ही छातीच्या एक्स-रेपेक्षा सोपी असते. पण, इतर आजारांचे निदान करणाऱ्या छातीच्या एक्स-रेचा उपयोग आपण मधुमेहाचे निदान करण्यासाठीही करू शकतो.”

एआय मॉडेलने मधुमेहाचा धोका जाणून घेण्यासाठी शरीरातील फॅटी टिश्यूजची तपासणी केली. फॅटी टिश्यू इन्सुलिन रेझिस्टन्सशी संबंधित आहे; ज्यामुळे मधुमेह होण्याचा धोका असतो. मधुमेह ओळखण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी जाणून घेणे गरजेचे आहे. मात्र, संशोधकांना असे दिसून आले की, एआय टूल्सद्वारे देण्यात आलेल्या लाल सिग्नलमुळे लोक निदान होण्याआधी मधुमेह आहे की नाही, हे जाणून घेऊ शकतात. जर मधुमेहाचे असे लवकर निदान करण्यात आले, तर डॉक्टरांना त्याची मदतच होईल. त्यांना रुग्णांच्या जीवनशैलीत बदल करता येईल आणि औषधांच्या मदतीने रुग्णांच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीमध्ये समतोल राखता येईल. त्यामुळे हृदयविकार, किडनीचे आजार, मधुमेह व स्ट्रोकचा धोका कमी करता येऊ शकतो.

संशोधकांच्या मते, श्वसनाशी संबंधित आजार असलेल्या लोकांचा छातीचा एक्स-रे काढल्यानंतर मधुमेहाचा धोका तपासता येतो. लिनॉएस शिकागो विद्यापीठातील सहायक प्राध्यापक डॉ. आयस पायरोस सांगतात, “आम्हाला माहिती आहे की, एक्स-रे काढल्यानंतर भरपूर माहिती मिळते; पण आम्ही ही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. अतिरिक्त खर्च टाळून मेहनत न घेता, आपण एक्स-रेद्वारे मधुमेहाचा धोका जाणून घेऊ शकतो.”

हेही वाचा : Sleepwalking : झोपेत चालणे नेमका काय प्रकार आहे, वाचा या आजाराची कारणे, लक्षणे आणि त्यावरील उपाय 

संशोधकांच्या मते, भारतीयांना एक्स-रेद्वारे मधुमेहाचा धोका लवकर ओळखता येऊ शकतो कारण- त्यांची चरबी खूप बारीक असते. बॉडी मास इंडेक्स (BMI)द्वारे जाणून घेता येणारा लठ्ठपणा हा मधुमेह तपासणीसाठी अधिक फायदेशीर ठरतो. भारताचा विचार केला, तर २५ पेक्षा कमी बीएमआय असलेले अनेक लोकांचे वजन कमी मानले जाते. पण, त्यांच्या पोटाभोवती चरबी असू शकते; ज्यामुळे त्यांना मधुमेहाचाही धोका असू शकतो.

संशोधकांना असे आढळून आले की, एआय मॉडेल हे यूएसमधील सध्याच्या स्क्रीनिंगपेक्षा लठ्ठ व्यक्तींमधील मधुमेहाचा धोका जाणून घेण्यासाठी फायदेशीर आहे. संशोधकांच्या मते, ३५ ते ७० वर्षे वयोगटातील जास्त वजन असलेल्या लोकांनी मधुमेहाची तपासणी करणे गरजेचे आहे. भारतीय लोकांची चरबी फक्त बारीक नसते; तर त्यांना कमी वयात मधुमेह होण्याचाही धोका असतो. त्यामुळे स्क्रीनिंग केले की, अनेकदा अंदाज चुकू शकतो.

सुदैवाने भारतातील डॉक्टरांना या गोष्टीची जाणीव आहे. डॉ मिथल पुढे सांगतात, “मधुमेह आणि लठ्ठपणा असलेल्या कुटुंबातील व्यक्तींची मी अगदी २० वर्षांच्या वयापासून स्क्रीनिंग सुरू करणार. कारण- तरुण लोकांमध्येही मधुमेहाचे प्रमाण जास्त दिसून येत आहे.”

हेही वाचा : Oversleeping : वीकेंडला तुम्हाला जास्त झोपण्याची सवय आहे? आताच थांबवा; वाचा, तज्ज्ञ काय म्हणतात… 

भारत हा मधुमेहाच्या बाबतीत जगातील अव्वल देश आहे. एका अभ्यासानुसार भारतात मधुमेह असलेल्या लोकांची संख्या १०१ दशलक्ष आहे. या अभ्यासातून असेही समोर आले आहे की १३६ दशलक्ष लोक ‘प्री-डायबिटीज’ श्रेणीत येतात; ज्यांना लवकरच मधुमेह होऊ शकतो.
“इतर कारणांसाठी वापरल्या जाणार्‍या एक्स-रेमधून मधुमेहासंबंधीची माहिती मिळवणे, हा रुग्णांसाठी एआयचा हा रोमांचक व सकारात्मक प्रयोग आहे” ,असे एमोरी विद्यापीठातील रेडिओलॉजी व इमेजिंग सायन्सचे प्राध्यापक डॉ. जुडी वाविरा गिचोया म्हणतात.

Story img Loader