Red Wine and Heart Health: आजकाल अनेक जण वाईन पिण्याचे शौकीन असल्याचं दिसून येतं. लाल रंगाचं हे पेय अनेक जणांच्या पसंतीस उतरलेलं आहे. अनेक लोकांना रेड वाईन पिणे अतिशय आवडते. कुठलेही सेलिब्रेशन करायचे असेल तर अगदी आवडीने लोकं वाईन पितात. किंबहुना ते आजच्या काळातील पेय बनले आहे. गेल्या काही वर्षांपासून वाईन ही आरोग्यासाठी चांगली असते, अशी समज सर्वमान्य झाल्याचं पाहायला मिळतं. त्यातही विशेषतः रेड वाईन. याचा संबंध दीर्घायुष्य आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्याशी जोडला जातो. पण, खरंच रेड वाईन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? रेड वाईन प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो का, याच विषयावर अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.

डॉक्टर म्हणतात, बऱ्याच काळापासून रेड वाईन लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. रेड वाईन द्राक्षांपासून तयार करण्यात येणारं एक पेय आहे. रेड वाईन काळ्या रंगाच्या द्राक्षांपासून बनविली जाते. यासाठी काळ्या रंगाची द्राक्षं सालीसह आंबवली जातात. वाईन हे एक पारंपरिक युरोपियन पेय आहे, परंतु आता जगाच्या इतर भागांतदेखील वाईन उद्योगाचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. कामावरून आल्यानंतर थकवा दूर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकं वाईन पितात. वाईन पिणं आरोग्यासाठी चांगलं असतं, असं अनेकांना वाटते. पण, याविषयी डॉक्टर काय सांगतात तेही पाहा.

Can Influenza Flu Increase the Risk of Heart Attack
Influenza flu & Heart attack : व्हायरल फ्लूमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
milk with salt being harmful for health is this true
Milk With Salt : दुधात चिमूटभर मीठ टाकून प्यायल्यास चेहऱ्याला खाज सुटते का? हा दावा खरा की खोटा? तज्ज्ञांकडून जाणून घ्या…
hindu names of hijackers controversy
भावना दुखावून घेण्याची साथ आली आहे का? आयसी-८१४ वरील वाद हे त्याचंच लक्षण…
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Pune, respiratory disorders, humidity, asthma, allergies, fungal growth, health experts, Sassoon Hospital, health news
पावसाळ्यातील ओलसर हवेमुळे आजारांना निमंत्रण! जाणून घ्या कशी घ्यावी काळजी…

डॉक्टर म्हणतात, “रेड वाईनमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आढळतात. याशिवाय रेड वाईनमध्ये प्रोअँथोसायनिडिन, रेझवेराट्रोल, कॅटेचिन आणि एपिकेटचिन नावाचे घटक असतात. त्यामुळेच रेड वाईन जास्त प्रमाणात प्यायल्याने हृदयविकाराचा धोका होऊ शकत नाही, असं अनेकांना वाटतं; पण खरंतर रेड वाईन जास्त प्रमाणात प्यायल्यास त्याचे आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात रेड वाईन प्यायल्याने हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो. “

(हे ही वाचा : गर्भनिरोधक गोळ्यांमुळे १६ वर्षीय मुलीचा मृत्यू; या गोळ्या वाढवतायत हार्ट अटॅक, स्ट्रोकचा धोका? डॉक्टर सांगतात…)

“वाईन ही हृदयरोगांपासून संरक्षण करते असे म्हटले जाते. पण, एका अभ्यासात ही गोष्ट पूर्णपणे चुकीची असल्याचे सिद्ध होत आहे. युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, वाईन दररोज प्यायल्याने हृदयविकाराचा धोका १६ टक्क्यांनी वाढू शकतो असं म्हटलं आहे. मध्यम प्रमाणात वाईन प्यायल्याने रक्तदाब कमी होतो, असेही मानले जाते. पण, हे उलट असून उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, हे समोर आलं आहे.”

नियमित मद्यपान केल्याने यकृताचे खूप नुकसान होते. अल्कोहोलयुक्त फॅटी लिव्हरची स्थिती सर्वप्रथम अल्कोहोलच्या सेवनामुळे उद्भवते. त्यानंतर उपचार न केल्यास त्याचे रूपांतर सोरायसिसमध्ये होते. यामुळे यकृतालाही नुकसान होते. रेड वाईनसह अल्कोहोलचे सेवन यकृतावर विपरित परिणाम करू शकते, ज्यामुळे फॅटी लिव्हर रोग, जळजळ होणेसारख्या समस्या उद्भवू शकतात.

अल्कोहोलचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी नुकसानदायक असते. मध्यम अल्कोहोल सेवनाने फायद्यांपेक्षा जास्त धोका असू शकतो. म्हणूनच महिलांनी एकापेक्षा जास्त पेये आणि पुरुषांनी दररोज दोनपेक्षा जास्त पेये पिऊ नयेत. आपले आरोग्य जपण्यासाठी आपल्या हृदयाचे रक्षण करण्यासाठी मद्यपान न करता नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि फळे, भाज्या आणि संपूर्ण धान्य समृद्ध आहार घेणे हृदयाच्या आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकते, असेही डॉक्टर नमूद करतात.