Red Wine and Heart Health: आजकाल अनेक जण वाईन पिण्याचे शौकीन असल्याचं दिसून येतं. लाल रंगाचं हे पेय अनेक जणांच्या पसंतीस उतरलेलं आहे. अनेक लोकांना रेड वाईन पिणे अतिशय आवडते. कुठलेही सेलिब्रेशन करायचे असेल तर अगदी आवडीने लोकं वाईन पितात. किंबहुना ते आजच्या काळातील पेय बनले आहे. गेल्या काही वर्षांपासून वाईन ही आरोग्यासाठी चांगली असते, अशी समज सर्वमान्य झाल्याचं पाहायला मिळतं. त्यातही विशेषतः रेड वाईन. याचा संबंध दीर्घायुष्य आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्याशी जोडला जातो. पण, खरंच रेड वाईन आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? रेड वाईन प्यायल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो का, याच विषयावर अपोलो हॉस्पिटल्सच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी माहिती दिली असल्याचे वृत्त द इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे. त्यासंबंधी सविस्तर माहिती जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा