wet sock method to reduce fever in children and adults : सध्या हवामानात सतत बदल होत असल्यामुळे ताप, सर्दी, खोकला यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रात्री अचानक ताप आल्यावर आपल्यातील अनेक जण ‘थंड पट्ट्या’ डोक्यावर ठेवतात. आपल्यातील बरेच जण वर्षानुवर्षे हा उपाय करत आले आहेत. पण, आज ताप कमी करण्यासाठी आम्ही यासारखाच पण, थोडा ट्विस्ट असणारा एक उपाय घेऊन आलो आहोत. त्या उपायाचे नाव आहे ‘ओले मोजे’ (wet sock method). ही पद्धत इन्स्टाग्रामवर एका कन्टेन्ट क्रिएटरने सांगितली आहे.

कन्टेन्ट क्रिएटरच्या मते, ताप आल्यावर मुलांना थंड, ओले मोजे घालायला लावणे आणि नंतर कोरडे, लोकरीचे मोजे घालणे ही कृती ताप (Fever) कमी करण्यास मदत करू शकते. “थंड मोजे रक्ताभिसरणाला चालना देतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. तुमच्या शरीरातील तापाच्या उष्णतेमुळे थंड मोजे गरम होतात. त्याद्वारे शरीरातील रक्तप्रवाह चांगल्या प्रमाणात वाढतो आणि नैसर्गिकरीत्या ताप कमी होण्यास मदत मिळते”, असे त्या कन्टेन्ट क्रिएटरचे म्हणणे आहे.त्याचबरोबर या पोस्टमध्ये लिहिण्यात आले होते की, हा उपाय सुरक्षितरीत्या नैसर्गिक ताप (Fever) कमी करून, रोगप्रतिकारासाठी शरीराचा प्रतिसाद अन् रक्ताभिसरण वाढवतो. त्यामुळे आजारपणात चांगली झोप येण्यास मदत होते. तसेच हा उपाय केल्यावर इतर औषधोपचारांची गरज भासत नाही, असेदेखील त्यांनी नमूद केले आहे.

Health Infectious Diseases Climate Change Health news
आरोग्य: भय इथले संपत नाही…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
water intake in different forms
पाण्याला ‘सिद्धजल’ करण्याची का आवश्यकता आहे?
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
diy mosquito repellent
आता विसरा डासांचा त्रास! दिवसेंदिवस वाढणाऱ्या डासांचा ‘या’ सोप्या आणि स्वस्त घरगुती उपायांनी करा नायनाट
No bird flu death reported in Dhule but 27 Rapid Response Teams activated precaution
धुळ्यात ‘बर्ड फ्लू’ प्रादूर्भावापूर्वीच २७ पथके तैनात, कुक्कुट व्यावसायिकांना सूचना
niv test reveals the root cause of rare guillain barre syndrome disorder
‘एनआयव्ही’च्या तपासणीतून अखेर दुर्मीळ ‘जीबीएस’ विकाराचे मूळ कारण उघड; कशामुळे धोका जाणून घ्या…
Palghar bird flu updates in marathi
पालघरमध्ये बर्ड फ्लू चा शिरकाव नाही; पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांची केली अंमलबजावणी

त्याचप्रमाणे ‘वैज्ञानिक आधार’ (scientific basis) अभ्यास हे सुचवतो की, हायड्रोथेरपी ही रक्तप्रवाह सुधारून आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवून ताप (Fever) नियंत्रित करू शकते. ही निसर्गोपचाराच्या तत्त्वांमध्ये रुजलेली एक पद्धत आहे, जी शरीराच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेस समर्थन देते. त्यात असेही नमूद करण्यात आले आहे की, तापाच्या औषधांप्रमाणे, हा उपाय नैसर्गिक आहे आणि त्याचे शरीरावर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. ही पद्धत फार्मास्युटिकल्सवर अवलंबून न राहता, आजारपणाचे व्यवस्थापन करण्यासाठी शरीराला प्रोत्साहन देते. तसेच ही पद्धत करताना तुम्ही पाण्यात लिंबू, आले, हर्बल टी सुद्धा घालू शकता. जर मुलाचे वय एक वर्षापेक्षा जास्त असेल, तर तुम्ही पाण्यात मध सुद्धा घालू शकता.

हेही वाचा…Immunity boosting drink : गरम पाण्यात फक्त ‘या’ तीन गोष्टी करा मिक्स; रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रियांका चोप्राचा जुगाड; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

या उपचार व जुगाडाबद्दल विचारले जाणारे प्रश्न पुढीलप्रमाणे…

प्रश्न – लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत आपण ओल्या मोज्यांच्या या जुगाडाचा उपयोग आपण करू शकतो का?
उत्तर – हो. हा उपाय सगळ्यांसाठी बेस्ट ठरेल.

प्रश्न – मी किती वेळा ओले मोजे उपचार म्हणून वापरू शकतो?
उत्तर – ताप (Fever) कमी होईपर्यंत हा उपाय केला जाऊ शकतो.

प्रश्न – ओले मोजे घातल्यावर लोकरीचे मोजे वापरणे आवश्यक आहे का?
उत्तर – होय, लोकरीचे मोजे उबदारपणा टिकवून ठेवण्यास आणि उपचारांची प्रभावीता वाढवण्यास मदत करतात.

तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने हैदराबादमधील लकडी का पुल, ग्लेनेगल हॉस्पिटल्स येथील एचओडी इंटरनल मेडिसिन, वरिष्ठ सल्लागार फिजिशियन डॉक्टर हरिचरण यांच्याशी संवाद साधला. तेसुद्धा असे म्हणाले की, ओले मोजे वापरण्याची पद्धत हा घरगुती उपाय आहे; जे काही लोक ताप कमी करण्यासाठी वापरतात. या पद्धतीमध्ये कॉटनचे पातळ मोजे थंड पाण्यात भिजवून, नंतर ते पिळून पायांत घातले जातात. त्यानंतर कोरड्या लोकरीचे मोजे ओल्या मोजांवर ठेवले जातात आणि ती व्यक्ती झोपायला जाते. डॉक्टरांचा असा दावा आहे की, हे उपचार ताप (Fever) कमी करण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि शरीराच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेस उत्तेजन देऊन रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यास मदत करू शकतात. पण, ताप कमी करण्यासाठी ओले मोजे वापरणे या उपायाला समर्थन देणारे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, असे डॉक्टर हरिचरण यांनी सांगितले.

डॉक्टर हरिचरण यांनी नमूद केले की, हा उपचार केल्यावर तुम्हाला थंडीदेखील वाजू शकते; पण त्यामुळे व्यक्तीला आरामसुद्धा वाटू शकतो. पण, हा ताप कमी करण्याचा एकमेव उपाय नाही.ओले मोजे हा घरगुती उपचार तुम्हाला तात्पुरता आराम देऊ शकतात; परंतु ते वैद्यकीय उपचारांची जागा घेऊ शकत नाहीत. त्यामुळे तापाचे बारकाईने निरीक्षण करून, लहान मुलांवर हा उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Story img Loader