Ghee Benefits In Cold, Cough : घरातील एखादी व्यक्ती आजारी पडली असेल, तर अनेक कुटुंबे पिढ्यान् पिढ्या घरगुती उपायांचा अवलंब करण्याला प्राधान्य देतात; विशेषत: जेव्हा मुलांच्या आरोग्याचा प्रश्न येतो. अशातच हिवाळ्यातील एक लोकप्रिय घरगुती उपाय म्हणजे (Remedy For Cold Cough) ऋतू बदलताच ‘नाकपुड्यांवर देशी तूप लावणे’. स्तुती अग्रवाल या एक आई असून, त्यांना ब्लॉग करण्याची खूप आवड आहे. तर या मॉम ब्लॉगरने (mom blogger) दावा केला की, नाकपुड्यांवर देशी तुपाचे फक्त दोन थेंब टाकल्याने सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांशी लढण्यास मदत होते.
स्तुती अग्रवाल अनुभव शेअर करीत म्हणाल्या, “माझ्या मुलाला सतत सर्दी आणि खोकला होत असतो. विशेषत: जेव्हा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) खराब असतो. आम्ही औषधांवर काम करीत असताना, मी ईएनटी डॉक्टर प्रबोध कर्णिक यांच्याकडे गेले. त्यांनी मला रोज नाकपुडीत थोडे देशी तूप लावण्यास सांगितले. मी त्यांच्या म्हणण्याचा आदर केला. पण, जोपर्यंत माझे बालरोगतज्ज्ञ @drpriyapradhan हा उपाय सुचवत नाहीत तोपर्यंत मी त्या उपायाचा फारसा विचार केला नाही. पण, जेव्हा मी आईला त्याबद्दल सांगितले तेव्हा तिने मला सांगितले की, हा एक जुना उपाय आहे” (Remedy For Cold Cough).
हा उपाय नक्की कसा करायचा? (Remedy For Cold Cough)
देशी तूप थोडेसे गरम (खूप गरम नाही ना याची खात्री करून घ्या) करा आणि स्वच्छ बोटाने किंवा कापसाचा वापर करून, ते प्रत्येक नाकपुडीच्या अगदी सुरुवातीला (प्रवेशद्वारावर) थोडेसे लावा. हे दिवसातून एकदा किंवा दोनदा करा; असे अग्रवाल यांनी सुचवले.
हेही वाचा…Indian Dals : मूग, मसूर, उडीद डाळ, कोणत्या डाळीतून किती मिळते प्रोटीन? जाणून घ्या तज्ज्ञांकडून
हा उपाय फायदेशीर करतो का? (Remedy For Cold Cough)
तर याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने, दिल्ली येथील सी. के. बिर्ला हॉस्पिटलमधील इंटर्नल मेडिसिनचे प्रमुख सल्लागार डॉक्टर नरेंद्र सिंगला (Narendra Singhla) यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले की, नाकपुड्यांवर देशी तूप लावणे ही पारंपरिक आयुर्वेदिक प्रथा आहे; जी ‘नस्य’ (Nasya) म्हणून ओळखली जाते, ज्यामध्ये हर्बल तेल किंवा तूप घालणे समाविष्ट असते, जे आरोग्यासाठी चांगले असते. हा उपाय त्याच्या संभाव्य फायद्यांमुळे अलीकडच्या काळात लोकप्रिय झाला आहे. देशी तूप हे त्याच्या दाहकविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर अनुनासिक रक्तसंचय, खाज सुटणे यांसारख्या ॲलर्जीची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते, ज्यामुळे ॲलर्जीचा त्रास असलेल्यांसाठी हा उपाय उपयुक्त ठरेल.
डॉक्टर नरेंद्र सिंगला यांच्या मते, देशी तूप त्याच्या प्रतिजैविक गुणधर्म संक्रमणाशी लढा देऊन श्वासोच्छ्वासास प्रोत्साहन देते. त्यामुळे श्वसनाच्या आरोग्यासही मदत मिळू शकते. त्याव्यतिरिक्त, देशी तूप नैसर्गिक मॉइश्चरायझिंग गुण अनुनासिक पॅसेजचा कोरडेपणा व अस्वस्थता कमी करण्यास मदत करते. त्यामुळे जळजळ होण्यापासून त्वरित आराम मिळतो.
तर तुम्ही कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ? (Remedy For Cold Cough)
१. अशुद्धता आणि ॲडिटिव्हपासून मुक्त असे शुद्ध, उच्च दर्जाचे तूप वापरा, यावर डॉक्टर सिंगला यांनी भर दिला.
२. तूप वापरण्यापूर्वी ते हलक्या हाताने कोमट करा आणि प्रत्येक नाकपुडीमध्ये दोन ते तीन थेंब टाकण्यासाठी ड्रॉपर वापरा. तूप अनुनासिक पॅसेजला लागण्यासाठी हळुवारपणे शिंका, असे डॉक्टर नरेंद्र सिंगला म्हणाले आहेत.
३. जरी ही पद्धत विविध फायदे देत असली तरीही हा उपाय सुरू करण्यापूर्वी व्यावसायिक आरोग्य देखभालकर्त्याचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. विशेषत: जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असेल तर…, असे डॉक्टर नरेंद्र सिंगला यांनी स्पष्ट केले.