लंडन : दिवसाच्या २४ तासांपैकी १० तासांमध्येच अन्नपदार्थ खावे आणि उरलेल्या १४ तासांमध्ये उपवास करावा. असा उपवास केल्याने मूड, झोप, भूक यांमध्ये सुधारणा होते, असे ब्रिटिश वैद्यकीय तज्ज्ञांनी नव्या संशोधनानुसार दाखवून दिले आहे. तुमचे दररोजचे खाण्याचे वेळापत्रक दहा तासांपर्यंतच मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. त्याचे आरोग्यासंबंधी सकारात्मक फायदे होतात, असे या संशोधकांनी सांगितले. किंग्ज कॉलेज ऑफ लंडनच्या संशोधकांनी युरोपीयन आहार पोषण परिषदेत हा संशोधन अहवाल सादर केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> तुम्ही रोज तूप खाल्ले तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? डॉक्टरांकडून जाणून घ्या….

असंतत उपवास किंवा तुमच्या जेवणाचा वापर एका विशिष्ट वेळेपर्यंत मर्यादित ठेवणे ही वजन कमी करण्याची लोकप्रिय पद्धत आहे. या पद्धतीनुसार तुमचे दैनंदिन खाण्याचे वेळापत्रक १० तासांपर्यंत मर्यादित ठेवता येते आणि उर्वरित १४ तास उपवास करावा लागतो. उदाहरणार्थ जर तुम्ही सकाळी ९ वाजता पहिला घास घेतला असेल, तर संध्याकाळी सात वाजता त्या दिवसांतील अखेरचा घास तुम्हाला घ्यावा लागेल. त्यानंतर १४ तास काहीही खाणे टाळावे लागेल. या पद्धतीमुळे वजन कमी होते. मात्र ब्रिटिश संशोधकांच्या अहवालानुसार या पद्धतीमुळे मूड, झोप, भूक यांमध्येही लक्षणीय सुधारणा होते.