एखाद्या अतिशय गर्दीच्या ठिकाणी आपण गेलो, तर गुदमरून जायला होते आणि मनात भीती निर्माण होते. गम्मत म्हणून जरी कुणी नाक दाबून धरले तरी आपण हात झिडकारून टाकतो. आपला श्वास अर्थातच आपल्या जगण्याला आवश्यक असतो आणि आपल्याला श्वास घेता येत नाही असे वाटले की आपला जीव घाबराघुबरा होतो. त्यामुळे श्वसन आणि मन यांच्यामधील संबंधही आपल्याला गृहीतच आहे.

श्वसनाचे विकार आणि मानसिक विकार यांचेही जवळचे नाते आहे. दमा(asthma), chronic obstructive pulmonary disease(COPD), फुफ्फुसाचा कर्करोग अशा श्वसनाच्या विकारांमध्ये मानसिक विकारांचे प्रमाण बरेच आढळते. तसेच मानसिक ताणतणावांमुळे श्वसनाची लक्षणे दिसून येतात. दमा हा बऱ्याच वेळा लहानपणीच सुरू होतो. दम्यामध्ये श्वासनलिकांना सूज येते. त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. दम लागतो आणि त्यावेळेस जीव घाबराघुबरा होतो. दम्यामध्ये चेतासंस्थेमध्ये, प्रतिकारक्षमतेमध्ये आणि आंतरद्रव्यांमध्ये जे बदल घडतात ते भावना निर्माण करताना होणाऱ्या बदलांप्रमाणे असतात; त्यामुळे बऱ्याचवेळा दम्याबरोबरच डिप्रेशन, चिंता यासारखे मानसिक आजार होतात. लहानपणी दमा असेल तर तरुणपणी चिंतेचे विकार जास्त प्रमाणात होतात. त्या त्या वेळेला असलेल्या ताण तणावांचा दम्याचा त्रास होण्याशी प्रत्यक्ष संबंध असतो. घडलेल्या घटना, कामाचा ताण, नातेसंबंधांमधील संघर्ष, प्रतिकूल परिस्थिती या सगळ्यामुळे दम्याचा अटॅक येऊ शकतो.

Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Health Special Unsafe Environment and Mental Health Hldc
Health Special: असुरक्षित वातावरण आणि मानसिक स्वास्थ्य
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

दम्याचा अटॅक आलेला असताना श्वास घेता येत नसल्यामुळे मनात भीती निर्माण होते, घाम फुटतो, छातीत धडधड वाढते. भीतीने गाळण उडते. आपला जीव जातोय की काय इतकी भीती वाटू शकते. याला panic attack म्हणतात. चिंता, डिप्रेशन यांच्यावर योग्य उपचार केले तर दम्याची तीव्रता सुद्धा कमी होण्यास मदत होते. शिथिलीकरण (Relaxation), श्वसन नियंत्रित करण्याचे प्रशिक्षण, आपल्या विचारांची दिशा बदलून मनावरचा ताण कमी करणे अशा उपायांचा दमा नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

आणखी वाचा: Health Special: सगळं संपवून टाकावं वाटतं तेव्हा काय विचार …

COPD या आजारात श्वासनलिकांची क्षमता कमी होते, त्यास बाधा येते आणि दम लागणे(श्वास जोरजोरात लागणे), विशेषतः चालल्यावर किंवा काही काम केल्यावर, बोलल्यावर दम लागणे आणि सततचा खोकला ही याची पमुख लक्षणे असतात. धूम्रपान आणि बरीच वर्षे उद्योगातील ऍस्बेसटॉस सारख्या गोष्टींच्या संपर्कात राहिल्यामुळे हा आजार होतो. २०%-५०% रुग्णांमध्ये चिंता आणि उदासपणा आढळून येतो. थकवा, गळून जाणे, वजन घटणे, झोपेवर परिणाम, चिडचिड, अस्वस्थता, लक्ष केंद्रित न करता येणे अशी या डिप्रेशनची लक्षणे असतात.

COPD मध्ये लक्ष केंद्रित करणे, कार्यकारी क्षमता(executive functions),स्मरणशक्ती अशा बौद्धिक कार्यांवर परिणाम होतो. ऑक्सिजन थेरपी मुळे मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो आणि ही लक्षणे कमी व्हयला मदत होते. या आजारातही डिप्रेशन आणि चिंता या विकारांचा उपचार योग्य पद्धतीने झाला नाही तर रुग्णाच्या जगण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. COPD साठी दिली जाणारी औषधे न घेणे, उपाय अर्धवट सोडून देणे, त्यामुळे रुग्णालयात अॅडमिट होण्याचे प्रमाण वाढते. या आजारात पुनर्वसनासाठी फ़िसिओथेरपी करणे विविध श्वासांचे व्यायाम करणे अतिशय उपयोगी ठरते.

आणखी वाचा: Health Special: पचनसंस्था आणि मन यांचं कनेक्शन

श्वसनाच्या विकारांमध्ये बऱ्याच वेळा corticosteroids उपचारार्थ दिली जातात. त्यांचा मनःस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. भावनांमधील आंदोलने, डिप्रेशन, मेनिया असे विकार होऊ शकतात. स्टेरॉइड्स बंद केली की ही लक्षणे नाहीशी होतात. परंतु अशा मनोविकारांवरही उपचार करणे आवश्यक असते.
फुफ्फुसाच्या कर्करोगामध्येही निराशा, जीवनाची व्यर्थता जाणवणे, आत्महत्त्येचे विचार अनेक रुग्णांमध्ये दिसून येतात. औषधांबरोबरच मानसोपचाराचाही उपयोग केला तर मनातली निराशा दूर होण्यास मदत होते. तसेच असलेले आयुष्य समाधानात व्यतीत करणे शक्य होते.

श्वसनाच्या विकारांमध्ये काही वेळेस delirium ही अवस्था दिसून येते. ऑक्सिजनची कमतरता, ताप येणे, काही औषधांचे दुष्परिणाम या सगळ्यामुळे रुग्ण भान विसरतो, दिवस रात्रीचे भान राहत नाही, नातेवाईकांना ओळखेनासा होतो, कधी कधी भास होऊ लागतात, रात्री झोप लागत नाही आणि दिवसा डोळ्यावर झापड राहते, लघवीवरचा ताबा सुटतो. वर्तणुकीच्या नियंत्रणासाठी औषधे द्यावी लागतातच, त्या बरोबर या अवस्थेचे कारण शोधून काढण्यासाठी विविध तपास करावे लागतात आणि योग्य उपय करावे लागतात.

श्वसनाच्या विकारांचा मानसिक विकारांशी संबंध आहेच, पण मानसिक संघर्ष व्यक्त होण्याचा एक मार्ग म्हणूनही श्वसनाच्या संबंधी लक्षणे रुग्णांमध्ये आढळून येतात. जोरजोरात श्वास लागणे(Hyperventilation) आणि मानसिक कारणांमुळे निर्माण झालेला खोकला अशी ही दिसून येणारी लक्षणे. मानसिक ताण तणाव, परिस्थितीला सामोरे जाण्याची क्षमता नसणे किंवा त्याचे मार्ग योग्य नसणे उदा. केवळ भावनिक होणे, प्रत्यक्ष उपाय शोधण्याचा प्रयत्न न करणे, अशा कारणामुळे ही लक्षणे निर्माण होतात. त्या बरोबर डिप्रेशन, चिंता असल्यास त्यांचे निदान होणे, उपचार होणे आवश्यक असते. बरोबर मानसोपचार, प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याचे मार्ग शिकवणे, या सगळ्याचा उपयोग होतो. मन आणि श्वसन दोन्हीचे आरोग्य हातात हात घालून असते. दोन्हीकडे लक्ष देणे आवश्यक.