Risk of cancer reduced by fasting: कर्करोग या आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. जरी या आजारावर तितकेसे प्रभावी उपचार आले असले तरी हा आजार अनेकदा उशिरा कळल्याने यातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या तितकीच कमी असते. कर्करोगाविरोधात लढण्यासाठी औषधोपचाराबरोबरच रुग्ण विविध प्रकारचे उपाय करून बघत असतात. परंतु, अलीकडे झालेल्या एका संशोधनात कर्करोगाशी लढण्यासाठी महत्त्वाचा असा एक उपाय समोर आला आहे आणि तो म्हणजे उपवास.

मेमोरियल स्लोन केटरिंग कॅन्सर सेंटरच्या (Memorial Sloan Kettering Cancer Center) संशोधकांनी उपवासामुळे कर्करोगाच्या पेशींवर कसा परिणाम होतो ते पाहण्यासाठी उंदरांवर प्रयोग केले होते. त्या महत्त्वपूर्ण अभ्यासात असे आढळून आले की, उपवासामुळे कर्करोगाविरुद्ध लढण्याची शरीराची बचावात्मक शक्ती वाढते.

attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…
Robotic Bariatric Surgery, Obesity, Robotic Bariatric,
‘रोबोटिक बॅरिएट्रिक’ शस्त्रक्रियेद्वारे लठ्ठपणाला कात्री! अधिक अचूकपणे, कमी वेळेत होणाऱ्या प्रक्रियेविषयी जाणून घ्या…
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

उपवास नैसर्गिक किलर (NK) पेशींचे कार्य वाढवतो हा रोगप्रतिकारक प्रणालीचा एक महत्त्वाचा घटक आहे; जो कर्करोगाच्या (cancer) पेशींवर हल्ला करण्याचे काम करतो.

संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, उपवासामुळे नैसर्गिक मारक (NK) पेशी ऊर्जेसाठी साखरेऐवजी फॅट्सवर अवलंबून असतात. त्यांचे हे स्थलांतरण कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणे आणि त्या पेशी काढून टाकणे यांसाठी अधिक प्रभावीपणे कार्य करते. त्यामुळे ट्युमर झालेल्या भागात नैसर्गिक मारक पेशी अधिक सक्षम होतात आणि उपवासामुळे त्यांची कर्करोगाशी (Cancer) लढण्याची क्षमता सुधारते.

डॉ. राजेश शिंदे, सल्लागार एचपीबी आणि गॅस्ट्रोइंटेस्टायनल ऑन्कोलॉजी, रोबोटिक सर्जरी, अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबई यांनी स्पष्ट केलं की, या नवीन अभ्यासापूर्वी संशोधनात असं समोर आलं आहे की, उपवास कर्करोगाशी लढण्यासाठी उपयुक्त आहे. २०१२ रोजी झालेल्या उंदरांवरील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अल्पकालीन उपवास केमोथेरपी औषधांच्या हानिकारक दुष्परिणामांपासून निरोगी पेशींचे संरक्षण करू शकतात.त्याचप्रमाणे, त्याचप्रमाणे २०१६ मधील उंदरांवरील अभ्यासातून असे कळले की, केमोथेरपी घेण्यापूर्वी अल्पकालीन उपवास केल्याने केमोथेरपी घेतल्यानंतरच्या दुष्परिणामांची तीव्रता कमी होऊ शकते.

जर्मन कॅन्सर रिसर्च सेंटरच्या दुसऱ्या अभ्यासाने अधूनमधून उपवास करण्याचे परिणाम यकृत आणि कर्करोगावर कसे होतात हे शोधून काढले. उंदरांवर केलेल्या चाचणीमधून असा निष्कर्ष काढण्यात आला आहे की, अधूनमधून उपवास केल्याने (पाच दिवस नियमित खाणे व त्यानंतर दोन दिवस मर्यादित कॅलरीज घेणे) फॅटी यकृत रोग, यकृताची जळजळ आणि अगदी यकृत कर्करोगाचाही धोका कमी होऊ शकतो.

असेच परिणाम मानवी शरीरातदेखील अपेक्षित आहेत का?

डॉ. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार, उपवासामुळे कर्करोगाचा (Risk of cancer) धोका कमी होण्याचे आश्वासन मिळू शकते. उच्च इन्सुलिन पातळी कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस चालना देण्याशी जोडलेली आहे. उपवास हा इन्सुलिनची पातळी कमी करून, कर्करोगाच्या पेशींच्या वाढीसाठी कमी अनुकूल वातावरण निर्माण करू शकतो. त्याशिवाय खराब झालेल्या पेशी काढून टाकणारी प्रक्रिया सुरू करण्यास उपवास मदत करतो.

उपवासाच्या या प्रक्रियेमुळे कर्करोगाच्या पेशी वाढण्यापूर्वीच काढून टाकणे शक्य होते, असे सांगून डॉ. शिंदे पुढे असेही म्हणाले की, उपवासामुळे शरीरातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स वाढतात आणि त्यामुळे इतर पेशींना कर्करोगाची हानी पोहोचण्यापासून संरक्षण मिळते.

तथापि, या सगळ्यात वैयक्तिक परिस्थितींचा विचार करणेही महत्त्वाचे आहे. कर्करोग किंवा त्याच्या उपचारांमुळे आधीच वजन कमी झालेल्या रुग्णांसाठी आहारातील निर्बंध आव्हानात्मक असू शकतात.

महत्त्वाचे विचार आणि पुढील मार्ग

जरी हा अभ्यास आशादायी असला, तरी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ही चाचणी उंदरांवर केली गेली होती. या निष्कर्षांवर शिक्कामोर्तब होण्यासाठी मानवामध्ये पुढील संशोधन केले जाणे महत्त्वाचे आहे, असे डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.

त्याव्यतिरिक्त उंदरांवर केलेल्या अभ्यासामुळे दोन विशिष्ट प्रथिनांचे महत्त्व स्पष्ट झाले आहेत; जी उपवासाच्या संरक्षणात्मक प्रभावांमध्ये भूमिका बजावतात. त्यांचे कार्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्यास नवीन कर्करोग उपचार धोरणांच्या विकासाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.