Boiling or Roasting What Is Better: पूर्वी माणूस कच्ची फळे, कंदमुळे खात होता, कालांतराने आगीचा शोध लागल्यावर माणूस अन्न भाजून शिजवून खाऊ लागला. काही काळाने तेलाचा वापर वाढू लागला आणि मग माणूस अन्न तळून खाऊ लागला. या तळण्याच्या प्रक्रियेने पुढे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण केल्या. अतिवजनाची समस्या वाढून कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, डायबिटीज असेही धोके वाढले. म्हणूनच आता पुन्हा एकदा माणूस भाजून भाज्या- फळे खाण्यास प्राधान्य देत आहे. तुम्हाला माहित आहे का काही असे पदार्थ आहेत जे कच्चे खाण्यापेक्षा किंवा तळण्यापेक्षा भाजूनच जास्त चविष्ट लागू शकतात. यातील तीन मुख्य गोष्टी म्हणजे टोमॅटो, बटाटा व पेरू. थंडीच्या दिवसांमध्ये विशेषतः या तीन गोष्टी भाजून खाल्ल्यास शरीराला बरेच लाभ होऊ शकतात. हे लाभ कोणते चला तर पाहुयात..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अन्न उकळून खावे की भाजून? (Roasted Food benefits)

  • फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी जर्नलच्या माहितीनुसार तुम्ही थेट जेव्हा पदार्थ भाजून खाता तेव्हा त्यातील पोषक तत्वे अबाधित राहतात. तसेच तुम्हाला नैसर्गिक पोषण मिळू शकते, अगदी शरीराला आवश्यक साखरेपासून ते फॅट्स पर्यंत सर्व काही. अन्न भाजताना त्यावर एक कॅरॅमल थर तयार होतो व कुरकुरीतपणा येतो यामुळे तुम्हाला अगदी तळल्यासारखीच चव मिळते आणि कच्चे खाण्याइतकीचे पोषणही लाभू शकते.
  • तुमच्या मेटाबॉलिज्म, मेंदूचे आरोग्य व स्नायूंच्या विकासासाठी व्हिटॅमिन बी महत्त्वाचे असते. जेव्हा अन्न शिजवताना उकळले किंवा तळले जाते तेव्हा हे व्हिटॅमिन बी पदार्थातून बाहेर पडून पाणी व तेलात विरघळते परिणामी आपल्याला पदार्थ खाताना हे सत्व मिळतच नाही.
  • हाडांच्या मजबुतीसह किडनी व पोटाचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून व्हिटॅमिन सी महत्त्वाचे असते. संत्री, अननस, गाजर यांच्यात व्हिटॅमिन सी मुबलक असते. हे पदार्थ भाजून खाताना हे सत्व अबाधित राहते व त्यांच्यातील आंबटपणा सुद्धा कमी होतो.
  • फॅट्स व कॅलरीज वाढण्याचा धोका टळतो.
  • भाजल्याने फळ व भाज्यांवरील नुकसानदायक बॅक्टेरिया दूर होऊन टॉक्सिन्स बाहेर पडतात व अन्नातून विषबाधा होण्याची शक्यता कमी होते.

टोमॅटो भाजून खाल्ल्याचे फायदे

जेव्हा तुम्ही टोमॅटो भाजून खाता तेव्हा त्यातील अँटी ऑक्सिडंट्स सक्रिय होतात व त्याचा शरीराला अधिक लाभ होऊ शकतो. टोमॅटोमधील लाइकोपीन हे सत्व शरीराला पूर्णतः मिळू शकते. वजन कमी करण्यासाठी भाजलेल्या टोमॅटोचे सेवन फायदेशीर मानले जाते.

बटाटा भाजून खाल्ल्याचे फायदे

फूड अँड केमिस्ट्री जर्नलच्या माहितीनुसार, बटाटा जेव्हा भाजून खाल्ला जातो तेव्हा त्यातील फायबर ऍक्टिव्ह होते व पचनप्रक्रिया अधिक वेगाने होते. बटाट्यात असणारा व्हिटॅमिन बी ६ हा भाजल्याने ऍक्टिव्ह होऊन मेटाबॉलिज्म प्रक्रिया सुरळीत होते. जेव्हा तुम्ही बटाटा तळून खाता तेव्हा त्यात बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढू शकते याविरुद्ध जेव्हा तुम्ही बटाटा भाजून खाता तेव्हा हृदय विकारांचा धोका कमी होऊ शकतो.

हे ही वाचा<< एका पोळीत किती कॅलरी असतात? ‘या’ टेस्टी रेसिपीसह चपाती खाल्ल्यास वजन झटपट होऊ शकते कमी

पेरू भाजून खाल्ल्याचे फायदे

फ़ूड केमिस्ट्री जर्नलच्या माहितीनुसार सुक्या खोकल्यावर भाजलेला पेरू उत्तम ठरतो. पेरूतील व्हिटॅमिन सी शरीरातील कफ दूर करण्यास मदत करतो. यामुळे क्षमता सुद्धा वाढू शकते.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे)