दातांच्या संदर्भातील विकार अगदी टोकाला गेला की, त्यानंतरट बहुतांश रुग्ण हे डॉक्टरकडे धाव घेतात. त्यामुळे त्यांचाच तोटा कसा होतो आणि दातांच्या उपचारांवरील खर्च कसा वाढत जातो हे आपण कालच्या लेखामध्ये पाहिले. आता आपण या लेखात रूट कॅनॉलच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी समजून घेणार आहोत. आरसीटी किंवा रूट कॅनॉल करताना भूल येण्याचे इंजेक्शन सर्वसाधारणपणे द्यावे लागते. परंतु, आज आपण अशाही विषयावर चर्चा करणार आहोत जिथे रूट कॅनॉल करताना इंजेक्शन द्यावे लागत नाही. काहींना हे वाचून आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. परंतु हे खरे आहे की, भूल येण्याचे इंजेक्शन न देता ही रूट कॅनॉल किंवा आरसीटी करता येते.

काहीवेळा रुग्ण आमच्याकडे येतात ते दात बराच खराब झाल्यानंतर. दातांना सूज आल्यानंतर अशा अवस्थेमध्ये पेशंटवर उपचार करणे फार संवेदनशील काम असते. सुजेमुळे काहीवेळा डोळ्यापर्यंत वेदना जातात. खालचा दात असेल तर तोंड उघडणे मुश्किल होते. रुग्णाला तीव्र वेदना असतात त्यातच जिथे सूज असते तिथेच भुल येण्याचे इंजेक्शन देणे जोखमीचे असते. अशावेळी डेंटिस्टने काळजीपूर्वक दात तपासला तर काही गोष्टी लक्षात येऊ शकतात.

Moong vadyachi rassa bhaji recipe in marathi bhaji recipe in marathi
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मुग वड्याची रस्सा भाजी; झक्कास होईल बेत
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Which foods take longer to digest Dont eat these foods for dinner
कोणते अन्नपदार्थ पचायला जास्त वेळ लागतो? डॉक्टरांच्या ‘या’ टिप्स फॉलो करा अन् रात्रीच्या जेवणात ‘हे’ पदार्थ खाणे टाळा
What is the right way to hydrate your body
तुम्ही रोज किती पाणी पिता? तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी राखण्याची योग्य पद्धत जाणून घ्या तज्ज्ञांकडून….
wet sock method t For fever in children and adults
Fever : ताप आलाय? मग ‘हा’ घरगुती उपाय ठरेल जादुई; रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास होईल मदत
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
Modak Recipe Modak without Mold Talniche modak recipe in marathi
बाप्पा तुला गोड गोड मोदक घे! बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटात करा तळणीचे मोदक; कमी वेळात नैवेद्य तयार
cravings can indicate hidden health issues and nutritional deficiencies
Nutritional Deficiencies : तुम्हाला सतत चॉकलेट किंवा चिप्स खाण्याची इच्छा होते? शरीरात ‘या’ पौष्टिक घटकांची असू शकते कमतरता; जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात

हेही वाचा… Health Special: दातांवरचा खर्च कमी करण्यासाठी ‘हे’ न विसरता कराच!

दातांची कीड जर क्रॉनिक म्हणजे खूप दिवसांपासून असेल तर पेशंटकडून तशी केस हिस्ट्री जाणून घ्यावी. शिवाय दातांचे आतपर्यंत निरीक्षण केल्यास व ती कीड मुळापर्यंत गेलेली असल्यास तीही नोंद लक्षात घ्यावी. अश्यावेळी बरेच जण जर पस पिकलेला असेल त्याला छेद देऊन पस काढतात अर्थात यात वेदना होण्याची शक्यता असते. अशावेळी आपण काळजीपूर्वक दातांची कीड काढत जर दातांच्या पस म्हणजे गाभ्यापर्यंत जावू शकलो तर तेथून दातांच्या मुळापर्यंत तुम्हाला १० /१५ मायकॉनची सुई हलक्या हाताने वापरून गाभ्यापासून दातांच्या मुळापर्यंत अलगद पोहचून दातांच्या मुळाच्यावर झालेला पस किंवा पू याला छोटासा रस्ता करून देता येतो. ज्यावाटे सुजेच्या रूपाने जमा झालेला पस / पू त्या वाटेने बाहेर येईल. यामुळे रुग्णाला चांगला आराम मिळतो. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला रुग्णाला इंजेक्शन देण्याची गरज नाही. अर्थात हे काम प्रचंड अनुभवांती शक्य होते. फार कुशल हाताने करावे लागते.

हेही वाचा… Health Special: Algophobia टाळता येतो का?

१०/१५ मायक्रोनची सुई वापरून आपण दाताच्या नसेसोबत प्रयोग करून चालणार नाही; कारण ती नस जर जिवंत असेल किंवा तिच्यात अर्धा जीव असेल तरीही रुग्णाला प्रचंड वेदना होऊ शकतात. त्यामुळे डेंटिस्टने फार तारतम्याने विचारपूर्वक हा निर्णय घ्यायचा असतो. भूल देण्याचे इंजेक्शन न देता आरसीटी करतांना तो दात, त्याची नस पूर्ण मृत झाली आहे, याची खात्री असेल तरच हा उपाय वापरायला पाहिजे. शेवटी तुमचा दृष्टिकोन रुग्णाला कमीत कमी वेदना व्हाव्यात असा असला तरी एखादी चूक रुग्णाचा गैरसमज करून आपल्यावरच वाईट प्रसंग आणणारीही ठरू शकते, हे सतत लक्षात ठेवले पाहिजे. परंतु, त्याचवेळी हे ही शंभर टक्के खरे आहे की इंजेक्शन न देता (भूल येण्याचे ) तुम्ही आरसीटी रूट कॅनॉल ट्रीटमेंट करू शकता. अशा हजारो केसेस मी स्वतः केलेल्या आहेत. अर्थात इंजेक्शन न घेता रुग्णाची दाताची सूज कमी होणे, आरसीटी करून त्याचा दात वाचवणे; यामुळे डॉक्टर म्हणून आपल्याला होणारा आनंद याची तुलना कशाशीही होवू शकत नाही. असा एक रुग्ण तुमच्याकडे शेकडो रुग्ण खात्रूपूर्वक असे सांगून पाठवतो, हे नक्की!

पुढच्या भागात आपण पाहूया आरसीटी मध्ये नक्की करतात काय?