What To Do To Stay Fit And Healthy : न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर सोशल मीडियावर आरोग्यासंबंधित नवनवीन व्हिडीओ शेअर करत असतात, ज्यामध्ये वजन कमी करण्याच्या टिप्स, चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी काय करावे, अगदी जेवल्यानंतर झोप येत असेल तर काय करावे आदी बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. करीना, करिश्मा कपूर, आलिया भट्ट, कतरिना कैफ आणि वरुण धवन हे बॉलिवूड सेलिब्रिटी सुद्धा स्वतःचे वजन कमी करण्याच्या ध्येयांसाठी ऋजुता दिवेकरवर यांच्यावर विश्वास ठेवतात. ट्विक इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवर अभिनेता अहसास चन्ना यांच्याशी अलीकडेच झालेल्या संभाषणात ऋजुता दिवेकर यांनी बाजारात उपलब्ध असलेल्या ‘निरोगी पदार्थां’ (हेल्दी फूड्स) बद्दल सांगितले आणि ते आपल्या शरीरासाठी चांगले का नसतात याबद्दल तिचे मत व्हिडीओद्वारे शेअर केले.

सोशल मीडियावर किंवा मित्रांकडून ऐकलेले सगळेच सल्ले तुमच्यासाठी चांगले आहेत की नाही हे तुम्ही कसे ठरवता?

तर ऋजुता दिवेकर यांनी दोन महत्त्वाच्या चाचण्या सांगितल्या आहेत, त्यापैकी एक म्हणजे भाषा चाचणी (language test). तुमच्यासाठी चांगल्या असलेल्या पदार्थाचे किंवा अन्नाचे नाव तुमच्या स्थानिक भाषेत किंवा प्रादेशिक भाषेत असले पाहिजे. आपण हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीच्या काळात जगत आहोत आणि आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की, आपले अन्न पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील आहे का? त्यामुळे आपल्या पर्यावरणीय परिस्थितीत आपण जेवणाचे सेवन करायला हवे, म्हणून जर एखाद्या अन्नाचे नाव फक्त इंग्रजीत असेल तर ते तुमच्यासाठी चांगले नाही असे ऋजुता दिवेकर म्हणाल्या आहेत.

स्थानिक अन्न खाणे हा तंदुरुस्त आणि निरोगी राहण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे का? (Eating Local Food Is The Best Way To Stay Fit And Healthy)

याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने प्रॅग्मॅटिक न्यूट्रिशनच्या मुख्य पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, जेव्हा आपण स्थानिक अन्न निवडतो तेव्हा आपण आपला कार्बन फूटप्रिंट कमी करतो, स्थानिक शेतकऱ्यांना पाठिंबा देतो आणि आपल्या जनुकांना (जीन्स) अधिक अनुकूल असलेल्या अन्नाने स्वतःचे पोषण करतो.

आपल्या आतड्यातील सूक्ष्मजीव – आपल्या पचनसंस्थेत राहणारे अब्जावधी सूक्ष्मजीव भूगोल आणि आहाराद्वारेदेखील आकार घेतात. म्हणजेच एखाद्या प्रदेशातील हवामान, माती, आणि उपलब्ध संसाधने यांवर तेथील लोकांच्या आहारावर परिणाम करतात. कालांतराने, हे सूक्ष्मजीव आपण खाल्लेल्या अन्नावर आधारित विकसित होतात, म्हणूनच वेगवेगळ्या देशांमधील लोकसंख्येनुसार आतड्यातील सूक्ष्मजीव बदलतात,” असे बालाजी म्हणाल्या.

स्थानिक अन्नाचे सेवन केल्यामुळे आपल्याला ऋतूंचे पालन करण्यास मदत होते. उदाहरणार्थ, उन्हाळ्यात आपण नैसर्गिकरित्या कैरीचे पन्हे, नारळपाणी किंवा ताक यांसारखे थंड पेये घेतो, तर हिवाळ्यात आपण सूप आणि बाजरीसारख्या उबदार, ऊर्जा देणारे पदार्थ खातो; जे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास आणि आराम देण्यास मदत करतात.

पण, बघायला गेलं तर आपण हळूहळू पारंपरिक फळे, भाज्या आणि आपल्या आजी-आजोबांनी बनवलेल्या पाककृती बनवणे सोडून देत चाललो आहोत. तर याचा परिणाम केवळ आपल्या आरोग्यावर होत नाही तर जैवविविधता आणि पर्यावरणीय संतुलनावरही होतो; असे पोषणतज्ज्ञ मीनू बालाजी म्हणाल्या आहेत.

तर ऋजुता दिवेकर यांच्या विधानात काही तथ्य आहे का?

एखाद्या अन्नाला स्थानिक नाव असले तरीही ते खरोखरच स्थानिक असते का, हासुद्धा प्रश्न उभा राहतो; कारण कोबी आणि फ्लॉवरसारख्या अनेक भाज्यांना आज स्थानिक नावे आहेत. पण, त्या १४ व्या ते १८ व्या शतकात युरोपियन लोकांनी भारतात आणल्या; तर जागतिकीकरणामुळे, विदेशी पदार्थ पूर्वीपेक्षा अधिक सुलभ झाले आहेत. तसेच बिर्याणीसारखे पदार्थ अरब किंवा पर्शियन संस्कृतीतून उद्भवले असले तरीही भारतीय पाककृती परंपरांमध्ये सुंदरपणे रूपांतरित झाले आहेत, हे लक्षात घेणे मनोरंजक आहे.

तर सर्वोत्तम मार्ग कोणता आहे?

तर तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी पारंपरिक पदार्थांचा आधार म्हणून वापर करण्याचा, विविधता आणि अतिरिक्त पोषणासाठी क्विनोआ किंवा ॲव्होकॅडोसारखे जागतिक घटक वापरण्याचा सल्ला दिला आहे.