Salt Side Effects: ”आज भाजीमध्ये मीठ नाही टाकलं का?”, ”आज जरा भाजीमध्ये मीठ जास्तचं पडलं”, ही वाक्य घरामध्ये तुमच्या कानावर नेहमीच पडत असतात. मीठ हा आपल्या आहारातील महत्त्वाचा पदार्थ आहे. कोणत्याही पदार्थामध्ये थोडं जरी मीठ कमी जास्त पडलं तर त्याची पूर्ण चव बदलून जाते. सोडियमचे हे कण प्रत्येक भाजीला, प्रत्येक ग्रेव्हीला आणि तुमच्या प्रत्येक आवडत्या पदार्थाला चव देतात. जर मीठ नसेल तर तुमचा आवडता चविष्ट पदार्थ देखील पूर्णपणे बेचव होईल. पण इथे प्रश्न असा आहे की तुमच्या आहारामध्ये मीठ किती जास्त आहे?
प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट आहे आणि मिठाचा अतिरेक देखील वाईट आहे. मीठ जास्त प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यावर विपरित परिणाम होतात. म्हणूनच, आपल्या आहारामध्ये मिठाच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा ते आपल्या अवयवांना हळूवारपणे हानी पोहोचवू शकते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार, एका दिवसात फक्त 5 ग्रॅम मीठ (सुमारे 2 ग्रॅम सोडियम) सेवन केले पाहिजे. जास्त मीठ सेवन केल्याने उच्च रक्तदाब होऊ शकतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
एका दिवसात किती मीठ खाऊ शकतो?
जागतिक आरोग्य संघटने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात जास्त प्रमाणात मिठाचे सेवन मृत्यूचे प्रमुख कारण ठरत आहे, आकडेवारी या वस्तुस्थितीकडे लक्ष वेधत आहे की, बहुतेक लोक निर्धारित मानकांपेक्षा जास्त प्रमाणात सोडियमचे सेवन करत आहेत. प्रक्रिया केलेल्या अन्नातून सुमारे ७५ टक्के मीठ आपल्या शरीरात जात असते.
जास्त मीठ खाणे तुमच्या जीवावर बेतू शकते
अनेक कमी उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये, लोक फिश सॉस किंवा सोया सॉसद्वारे मीठ सेवन करत आहेत. जर आपण मीठाचे सेवन मर्यादित केले तर आपण हृदयविकारापासून स्वतःला वाचवू शकाल. दरवर्षी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकमुळे सुमारे 2.5 दशलक्ष मृत्यू होतात. त्यामुळे मुत्रपिंडाच्या आजाराचा धोकाही निर्माण होतो.
बघताक्षणी ताजे टोमॅटो कसे ओळखाल? कीड किंवा खराब टोमॅटोच्या ‘या’ पाच खुणा नीट ओळखा
जास्त मिठाचे सेवनाटे ५ दुष्परिणाम
उच्च रक्तदाब- जास्त मीठयुक्त आहारामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. जेव्हा मूत्रपिंड अतिरिक्त द्रव बाहेर टाकू शकत नाही, तेव्हा रक्तदाब वाढण्याची शक्यता असते.
हृदयाचा धोका वाढतो- उच्च सोडियम सेवनामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाला स्ट्रोकचा धोका असतो.
ब्लोटिंग- जर तुम्ही जास्त मिठाचा आहार घेत असाल तर पाणी टिकून राहिल्याने तुम्हाला पोट फुगल्यासारखे वाटू शकते. शरीर पाणी आणि सोडियम पातळीचे प्रमाण राखण्याचा प्रयत्न करते. आणि ते राखण्यासाठी, जास्त मीठ जास्त पाणी टिकवून ठेवते. याचा दीर्घकाळापर्यंत किडनीवरही परिणाम होऊ शकतो.
ऑस्टियोपोरोसिस- दीर्घकाळापर्यंत अन्नामध्ये जास्त मीठ घेतल्याने शरीरातील ऊती आणि पेशींमध्ये द्रव जमा होऊ शकतो. हे शरीराला कॅल्शियम उत्सर्जित करण्यास भाग पाडते, ज्यामुळे हाडांची झीज होते आणि ऑस्टिओपोरोसिस होतो
तहान आणि वजन वाढणे – हे असे आहे कारण भरपूर मीठ खाल्ल्याने तुमच्या शरीरात पाण्याची बचत होते. हेल्थलाइन डॉट कॉमच्या अहवालानुसार, मीठ जास्त प्रमाणात घेतल्याने तहान वाढते. तुमचे शरीर अतिरीक्त सोडियम पातळ करण्यासाठी सेवन केलेले अतिरिक्त द्रव वापरते जे ते त्वरीत उत्सर्जित करू शकत नाही पण, तुमच्या लघवीचे प्रमाण बदलत नाही, म्हणजे हा अतिरिक्त द्रव तुमच्या शरीरात राहते. त्यामुळे, सोडियमचे सेवन अचानक वाढल्याने तुमचे वजन द्रव स्वरूपात काही प्रमाणात वाढू शकते.
प्रत्येक दिवशी बिर्याणीचा वार! आजच ट्राय करा झटपट सोया बिर्याणी, ‘ही’ घ्या रेसिपी
या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण असते अधिक
- प्रक्रिया केलेले मांस
- डब्बाबंद मांस
- सॉसेज
- पिझ्झा
- व्हाईट ब्रेड
- खारे दाणे
- कॉटेज चीज
- सॅलड ड्रेसिंग
- बटाट्याचे काप
- हॉट डॉग
- लोणचे
- सोया सॉस
- फिश सॉस
- टोमॅटो सॉस
- गोठवलेले सी फूड
मीठाचे सेवन करणे का आवश्यक आहे?
मीठ आपल्या शरीराचे फक्त नुकसान होते असे आजिबात नाही पण त्याचे योग्य प्रमाणात सेवन आवश्यक आहे. मिठामध्ये सोडियम आणि पोटॅशियम दोन्ही आढळतात, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी योग्य प्रमाणात राहते. त्याच्या मदतीने ऑक्सिजन शरीराच्या सर्व भागांमध्ये पोहोचतो. हे मज्जासंस्था आणि रक्तवहिन्यासंबंधी प्रणालीच्या कार्यामध्ये देखील मदत करते.