Salt substitute can reduce risk of high blood pressure : मीठ हा आहारातील एक अविभाज्य घटक आहे. मिठामुळे अन्नाची चव वाढत असल्याने बहुतेक पदार्थांमध्ये ते वापरले जाते. त्याशिवाय शरीरालाही योग्य प्रमाणातील मिठाची आवश्यकता असते. पण, मीठ कितीही चांगले असले तरी त्याचे प्रमाणापेक्षा जास्त सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी घातक असते. परंतु, एका संशोधनात मिठासाठी असलेल्या विविध पर्यायांच्या सेवनाने उच्च रक्तदाबाचा त्रास नियंत्रणात ठेवण्यास मदत होत असल्याचे समोर आले आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अलीकडील अभ्यासात असे आढळून आले आहे की, मिठाच्या जागी त्याला असलेल्या पर्यायांचा वापर केल्यास हायपोटेन्शन (कमी रक्तदाब)चे प्रमाण न वाढता, उच्च रक्तदाबाचे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी होत आहे.

मिठाच्या पर्यायांमध्ये २५ टक्के पोटॅशियम क्लोराईड असते, जे रक्तदाबाचे प्रमाण वाढवत नाही. १२ टक्के सुकवलेले खाद्यपदार्थ जसे की, मशरूम, लिंबू, सीव्हीड, हॉथॉर्न व वाइल्ड जुजुब.

Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी वैद्य खडिवालेंनी सांगितलेलं सोपे पथ्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
seven ways to ensure you boost your water intake
Water Intake In Winter Season: हळदीच्या दुधात एक चिमूटभर काळी मिरी घातल्याने काय फायदा होतो? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ
Hundreds of poor patients are receiving free dialysis services at health department hospitals
दुर्गम भागातील रुग्णांसाठी आरोग्य विभागाची ‘टेलीमेडिसिन’ सेवा ठरतेय संजीवनी! सव्वा लाख रुग्णांना झाला फायदा…
Naturopathic Medical Treatment know Ayurvedic Herbal Natural remedies at home
औषधं, गोळ्या घेऊन कंटाळला आहात? जाणून घ्या घरच्या घरी औषधाविना आयुर्वेदिक उपचार कसे कराल?
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
Redesign of Pune-Nashik railway line
‘जीएमआरटी’चे स्थलांतर नाही… पुणे-नाशिक रेल्वेमार्गाची नव्याने आखणी
nashik Dialysis center service
नाशिक महानगरपालिकेच्या दोन रुग्णालयात आता डायलिसीस केंद्र

या निष्कर्षांचे स्पष्टीकरण देताना द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ सल्लागार, कार्डियाक इलेक्ट्रो फिजिओलॉजिस्ट व इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. वनिता अरोरा म्हणाल्या की, मिठाला असलेले अनेक पर्याय आहारातील सोडियम कमी करू शकतात; परंतु तेदेखील माफक प्रमाणात वापरणे आवश्यक आहे.

मिठाला काय पर्याय आहेत आणि ते सामान्य मिठापेक्षा कसे वेगळे आहेत?

मिठाला पर्याय म्हणजे विविध प्रकारचे मसाले. तुम्ही रोजच्या जेवणात मिठाऐवजी विविध प्रकारचे मसाले वापरू शकता. सर्वांत सामान्य चव पर्याय म्हणजे पोटॅशियम क्लोराईड. पण काही ब्रॅण्ड त्याऐवजी पोटॅशियम बायकार्बोनेट, पोटॅशियम सायट्रेट किंवा पोटॅशियम लॅक्टेट वापरतात. सोडियम रक्ताचे प्रमाण आणि रक्तदाब वाढवते; तर पोटॅशियम रक्तदाब कमी करण्यास आणि नियंत्रित करण्यास मदत करते. त्यामुळे सोडियम हायपरटेन्सिव्ह प्रभाव रोखते किंवा प्रतिकार करते. औषधी वनस्पती, मसाले, लसूण व लिंबूवर्गीय फळे यांसारख्या घटकांचा वापर करून मिठाला काही नवीन प्रकारचे पर्याय उपलब्ध केले जात आहेत.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी मीठ प्रभावी ठरते? त्यात काही जोखीम घटक आहेत का?

होय. अभ्यासातून दर्शविण्यात आले की, सोडियमचे सेवन कमी केल्याने आणि त्याच वेळी पोटॅशियमचे सेवन वाढल्याने उच्च रक्तदाब प्रभावीपणे कमी होतो. विशेषत: सोडियम संवेदनशील असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर आहे.

परंतु मूत्रपिंडाशी संबंधित आजारांनी ग्रस्त असलेल्या किंवा विशिष्ट प्रकारची औषधे घेत असलेल्या लोकांसाठी मीठ फायदेशीर ठरू शकत नाही. कारण- जास्त पोटॅशियम त्यांच्यासाठी धोकादायक असू शकते.

त्याशिवाय उच्च रक्तदाब व्यवस्थापन योजनेचा एक भाग म्हणून मिठाचे सेवन करणाऱ्या व्यक्तीने व्यायाम करणे, वजन कमी करणे व संतुलित आहार घेणे यांसारख्या जीवनशैलीतील बदलांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पण, प्रत्येक व्यक्तीनुसार याचे परिणाम भिन्न असतात. म्हणून आहारात मिठाच्या पर्यायांचा समावेश करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

मिठाचे सेवन कोणी करावे? कोणी करू नये?

उच्च रक्तदाब असलेल्या सुमारे ७५ टक्के व्यक्ती म्हणजे सोडियम-संवेदनशील व्यक्ती ५५ वयापेक्षा जास्त आहेत. उच्च रक्तदाबाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या ५० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना उच्च रक्तदाब होण्याची शक्यता कमी करण्यासाठी मिठाचे सेवन हा चांगला पर्याय असू शकतो. वयोवृद्ध (वय ६५+) हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीची अनारोग्य परिस्थिती टाळण्यासाठी त्यांचा वापर करू शकतात.

निरोगी आणि पौगंडावस्थेतील मुलांनी मिठाच्या विविध पर्यायांचा वापर करणे आवश्यक नसते किंवा त्यांची शिफारसदेखील केली जात नाही. कारण- त्यांना वाढ आणि विकासासाठी मिठाची आवश्यकता असते. तसेच सामान्य रक्तदाब असलेल्या लोकांना पर्याय निवडण्याची आवश्यकता नाही. सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांनुसार, निरोगी प्रौढ व्यक्तीसाठी डब्ल्यूएचओने शिफारस केल्यानुसार एका व्यक्तीने दररोज पाच ग्रॅम म्हणजे फक्त एका चमचा इतके मीठ वापरणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे. त्यापेक्षा जास्त मीठ शरीरासाठी धोकादायक ठरते.

हायपर टेन्शनचा त्रास असल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यासाठी मिठाच्या पर्यायाचे सेवन सुरू करावे का?

हायपर टेन्शनचा त्रास असलेल्या व्यक्तीने डॉक्टरांशी सल्ला न घेता, स्वतःच्या मनाने मिठाला असलेल्या विविध पर्यायांचे सेवन करणे चुकीचे आहे.

Story img Loader