हिवाळ्यात अनेकांना घसा खवखवणे, खोकला, घसा बसणे यांसारख्या समस्या जाणवतात. यावर अनेकजण घरगुती उपाय करून पाहतात, पण म्हणावा तसा फरक पडत नाही. अशावेळी अनेकदा आपल्याला मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो. हा सोपा आणि जुना घरगुती उपाय आहे. पण, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे खरच फायदेशीर ठरते का? याविषयी नोएडामधील शारदा हॉस्पिटलचे एमडी (इंटर्नल मेडिसिन) डॉ. श्रेय श्रीवास्तव यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. श्रेय श्रीवास्तव यांच्या मते, मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे हा एक सोपा, सुरक्षित घरगुती उपाय आहे . बहुतेकदा घसा खवखवणे, सायनस, व्हायरल इन्फेक्शन किंवा श्वसनासंबंधित आजारांवर उपाय म्हणून मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर मानले जाते, ज्यामुळे घशातील दुखणे आणि जळजळ कमी होण्यास मदत होते.

यावर दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पिटलमधील मधुमेह, लठ्ठपणा आणि इंटर्नल मेडिसिन विभागाचे प्रमुख सल्लागार डॉ. त्रिभुवन गुलाटी यांच्या मते, मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा तोंड आणि घशासंबंधित विविध आजारांसाठी प्रभावी उपाय आहे.
हे खारट पाणी विषाणूंना असुरक्षित वातावरण तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे घसा खवखवणे आणि जळजळ कमी करण्यासाठी मदत होते.

मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने घशामधील सूजलेल्या ऊतींमधील अतिरिक्त द्रव काढून टाकण्यास, वेदना कमी करण्यास आणि घशाच्या आजारांपासून लवकरात लवकर बरे होण्यास मदत होते, असेही डॉ. गुलाटी म्हणाले.

दातांची स्वच्छता आणि निरोगी आरोग्यासाठी नियमितपणे मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा एक प्रभावी उपाय आहे.

डॉ. श्रीवास्तव यांनी सांगितले की, मीठ तोंडातील ऊतींमधून पाणी बाहेर काढण्यास मदत करते, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. यामुळे मिठाचे पाणी विषाणू आणि बॅक्टेरियासारख्या हानिकारक रोगजंतूंना आत येण्यापासून रोखते. त्यामुळे मिठाचे पाणी हा घशाच्या आजारांना रोखण्याचा एक प्रभावी उपाय आहे. यामुळे तोंड आणि घशासंबंधित आजार होण्याची शक्यता कमी होते आणि काही प्रकरणांमध्ये जळजळ होण्यापासून आराम मिळतो.

याशिवाय मिठाचा ऑस्मोटिक प्रभाव श्लेष्मा विघटन करण्यास आणि घशातील रक्तसंचय कमी करण्यास मदत करू शकतो. मिठाचे सौम्य अँटीसेप्टिक गुण धोकादायक जंतू काढून टाकण्यास मदत करतात, आजारांची वाढ थांबवतात. हा सोपा पण प्रभावी उपचार सर्दी, फ्लू आणि इतर श्वसनाच्या आजारांची लक्षणे कमी करण्यासाठी योग्य ठरत आहे, असेही डॉ. गुलाटी म्हणाले.

घसा खवखवणे , सर्दी, फ्लू, सायनस आणि श्वसन संक्रमण, ॲलर्जी, दातांच्या समस्या (जिंगिव्हायटिस, पीरियडॉन्टायटिस आणि कॅविटीज्) आणि अल्सरच्या समस्येवर मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे फायदेशीर ठरते.

यासाठी प्रत्येक २५० मिली कोमट पाण्यात सुमारे १/४ ते १/२ चमचे मीठ मिसळा आणि दिवसातून एकदा किंवा दोनदा गुळण्या करा, असेही डॉ. श्रीवास्तव म्हणाले.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salt water gargle benefits how is gargling with salt water effective sjr
Show comments