समांथा रुथ प्रभू ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. समांथाने इंडोनेशियामध्ये तिची ट्रिप एन्जॉय करीत असताना ती प्रवास, फिटनेस आणि निरोगीपणाची इतरांना प्रेरणा देत आहे. खरे तर, समांथा मागील एक वर्षाहून अधिक काळ ‘ऑटोइम्युन कंडिशन मायोसिटिस’ नावाच्या आजाराचा सामना करत आहे. अशातच ती आता इंडोनेशियातील बालीच्या हिरव्यागार बेटावर अधिक वेळ घालवताना दिसत आहे.
समांथा इंडोनेशियातील ट्रिपमधील अनेक फोटो व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अपलोड करीत आहे. यावेळी तिने इंडोनेशियामध्ये ४ अंश तापमान असलेल्या बर्फाच्या बाथमध्ये सलग सहा मिनिटे अंघोळ केल्याची स्टोरी टाकली होती. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने, ‘#आईसबाथ. ४अंश. ६ मिनिटं’ असे लिहिले होते. ही स्टोरी पाहून नैसर्गिकरीत्या, बर्फाची अंघोळ आपल्या शरीरावर काय परिणाम करते याबाबतची माहिती आम्ही आज तुम्हाला देणार आहोत.
डॉ. प्रियंका रोहतगी (अपोलो हॉस्पिटल्स, बंगळुरूच्या मुख्य क्लिनिकल आहारतज्ज्ञ) यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, पुराव्यानिशी असे दिसून आले आहे की, थंड पाण्याची अंघोळ लोकांची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, नैराश्याचा सामना करण्यासाठी, स्थानिक वेदना, जळजळ आणि कोणत्याही प्रकारच्या स्नायूंचे दुखणे कमी करण्यासाठी उत्तम आहे. जेव्हा तुम्ही गरम किंवा थंड पाण्याने आलटून-पालटून अंघोळ करता, तेव्हाही अगदी थोड्या कालावधीसाठी का होईना ती अंघोळ आपले व्हायरस प्रसारित होण्यापासून संरक्षण करते. व्यायामामुळे होणार्या दुखापतीसाठी ते चांगले आहे. कारण- ते रक्तवाहिन्यांचा विस्तार करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यासाठी थंड अंघोळ मदत करते.
हेही वाचा- ‘Eye Flu’ची तीव्रता कशी समजून घ्यावी आणि त्यानुसार कोणते औषध घ्यावे? वाचा, नेत्रतज्ज्ञ काय सांगतात…
तज्ज्ञांचा असा आग्रह आहे की, थंड पाण्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात; ज्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो आणि दीर्घ काळ धावल्यानंतर किंवा अशा व्यायामानंतर स्नायूंना जी सूज येते आणि वेदना होतात त्या कमी करण्यास मदत करते. “शिवाय काहीही न करता केवळ थंड पाण्यात शरीर बुडवण्याचेही खूप फायदे शोधून काढले आहेत; ज्यामध्ये बर्फाच्या अंघोळीमुळे स्नायूचं दुखणं सुमारे २० टक्क्यांनी कमी झाल्याचं समोर आलं आहे. आईस बाथचा सर्वात स्पष्ट फायदा म्हणजे ते शरीराला चांगला फील देते,” असं डॉ. आशीष सिंघल (पारस हॉस्पिटल, उदयपूर) यांनी सांगितलं.
तर डॉ. संजीथ ससीधरन (सल्लागार व प्रमुख क्रिटिकल केअर, SL रहेजा हॉस्पिटल, माहीम-ए फोर्टिस असोसिएट) यांच्या मते, आईस बाथ व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक तणावाचा सामना करण्यास चांगल्या प्रकारे मदत करते; तसेच पुनर्प्राप्ती प्रक्रियेला गती देते आणि दर्जेदार झोपेसाठीही मदत करते. “हे घटक व्यक्तीला पुढील व्यायामासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार होण्यास मदत करतात,” असंही ससीधरन म्हणाले.
हेही वाचा- पुरुषांपेक्षा स्त्रियांना दारू लवकर का चढते? काय आहेत त्यामागची कारणं आणि धोका
आईस बाथ मॅन्युअली वाहिन्या संकुचित करतात आणि उघडतात, ज्यामुळे लिम्फ नोड द्रव संपूर्ण शरीरात अधिक हळूहळू फिरू शकतो. “तुमच्या शरीराला बरे होण्यासाठी, वाढलेला रक्तप्रवाह तुमच्या पेशींना पोषक आणि ऑक्सिजनने भरतो,” असं डॉ. सिंघल म्हणाले. तसेच हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि व्यास कमी करतात, ज्याला व्हॅसोकॉन्स्ट्रक्शन म्हणतात; ज्यामुळे हृदयरोगी आणि शरीरात कुठेही रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असलेल्या रुग्णांना हानी पोहोचू शकते. “अशा रुग्णांनी बर्फाचे स्नान टाळावे, जरी या प्रक्रियेचे फायदे निश्चितपणे मोजण्यासाठी या क्षेत्रात संशोधन चालू असले तरी,” असंही डॉ. ससीधरन म्हणाले.