Sara Ali Khan : सारा अली खान नेहमी तिच्या फिटनेसमुळे चर्चेत राहते. अलीकडेच पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या सकाळच्या दिनचर्येविषयी सांगितले आहे. ती म्हणाली, “मी सकाळी दूध, साखर आणि कार्बोहायड्रेट घेत नाही. जेवणाच्या बाबतीत बोलायचं तर माझं आयुष्य दुःखी आहे.” ती सकाळी हळद, पालक आणि गरम पाणी पिते.
आज आपण हळद आणि पालकाच्या पाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. तसेच जेव्हा आपण कार्बोहायड्रेटचे सेवन करत नाही तेव्हा नेमकं काय घडते, याविषयीसुद्धा जाणून घेणार आहोत.

आहारतज्ज्ञ कनिक्का मल्होत्रा (Kanikka Malhotra) सांगतात, “हळद आणि पालकाचे पाणी प्यायल्याने त्यातील पौष्टिक गुणधर्मामुळे आरोग्यास भरपूर फायदे मिळतात. हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे अँटिऑक्सिडंट्स असतात जे पेशींचे नुकसान होण्यापासून वाचवतात, तसेच हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.”
याशिवाय पालकामध्ये आवश्यक व्हिटॅमिन्स ए, सी आणि के तसेच कॅल्शियमसारखे मिनरल्स असतात, जे शरीराला पोषक घटक पुरवतात. यामध्ये असलेले ल्युटीन आणि झेक्सॅान्थिन डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. यात असलेल्या फायबरमुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यामध्ये व्हिटॅमिन केचे प्रमाण जास्त असल्याने हाडांचे आरोग्यसुद्धा सुधारते.

पालकामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. हळद आणि पालक मिळून पौष्टिक पेय तयार करता येते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. पालकाचे पाणी दैनंदिन दिनचर्यामध्ये एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय म्हणून कार्य करते, असे मल्होत्रा सांगतात.

पालक बारीक करण्यापूर्वी किंवा पालकाचे पाणी पिण्याआधी पालक नीट स्वच्छ धुवून घ्या.

साखर नसलेला आहार अनेक आजारांचा धोका कमी करण्यात मदत करतो, ज्यामुळे निरोगी जीवन जगता येते. जास्त साखरेच्या सेवनामुळे लठ्ठपणा, टाइप २ मधुमेह, हृदयरोगाशी संबंधित समस्या वाढतात. मल्होत्रा सांगतात, “साखरेचे प्रमाण कमी केल्याने तसेच कॅलरीचे सेवन कमी केल्याने वजन कमी होऊ शकते, ज्यामुळे अनेकदा आरोग्याच्या चांगल्या सवयी निर्माण होतात”, असे मल्होत्रा सांगतात.

त्या पुढे सांगतात, कार्बोहायड्रेट पूर्णपणे टाळण्यापेक्षा योग्य प्रमाणात आरोग्यास फायदेशीर असे योग्य कार्बोहायड्रेट घेणे गरजेचे आहे. कार्बोहायड्रेटमध्ये भरपूर प्रमाणात ऊर्जा असतात. वय, दैनंदिन क्रिया आणि आरोग्य स्थिती यांसारख्या घटकांवरून कार्बोहायड्रेटच्या वैयक्तिक गरजा बदलतात. मल्होत्रा यांच्या मते प्रौढांना नियमित ऊर्जेसाठी दररोज कमीत कमी १३० ग्रॅम कार्बोहायड्रेट्सचे सेवन करणे महत्त्वाचे आहे.
कार्बोहायड्रेट्सची गुणवत्ता महत्त्वाची आहे. आहारातील कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आवश्यक पोषक आणि फायबर पुरवतात, तर रिफाइन साखरेचे अतिसेवन केल्याने आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.

याशिवाय प्रोटिन्स, फॅट्ससह कार्बोहायड्रेटचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी सुधारू शकते. कार्बोहायड्रेटचे सेवन केल्याने व्यक्तीला त्याच्या जीवनशैलीनुसार पुरेशा प्रमाणात पोषक घटक मिळतात, जे संपूर्ण आरोग्यास मदत क

Story img Loader