Sudden Cardiac Arrest Treatment: अलीकडेच, पुण्यातील एका ५० वर्षीय महिलेला ट्रेक करताना छातीत दुखू लागले. नीट श्वास घेता येत नसल्याने ती थांबली आणि तितक्यात हृदयविकाराच्या झटक्याने जवळपास जमिनीवर कोसळली अशी धक्कादायक माहिती समोर आली होती. सुदैवाने, महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस (MEMS) कर्मचाऱ्यांनी वेळीच या महिलेवर उपचार करून तिचा जीव वाचवला. पण ही अशी परिस्थिती कधी दुर्दैवाने एकट्याने प्रवास करताना किंवा एकटं असताना आली तर? विचारही करायला भीती वाटते, हो ना? पण घाबरायची गरज नाही कारण आज आपण एक असे स्वयंचलित पोर्टेबल उपकरण पाहणार आहोत ज्यामुळे तुम्ही अचानक उद्भवलेल्या कार्डियाक अरेस्ट सारख्या गंभीर स्थितीतही स्वतःचे रक्षण करू शकाल.

एईडी हे तंत्रज्ञान एखाद्याला जीवनदान देऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे जेव्हा अचानक हृदयविकाराचा झटका येतो किंवा हृदयाच्या ठोक्यांच्या लयीत बिघाड होतो तेव्हा पुन्हा हृदयाचे ठोके सामान्य स्थितीत न आल्यास त्यापुढील प्रत्येक मिनिटाला व्यक्तीची जगण्याची शक्यता सात ते १० टक्क्यांनी कमी होते. अशावेळी तात्काळ CPR (कार्डिओ-पल्मोनरी रिसुसिटेशन) आणि AED चा वापर व्यक्तीच्या जगण्याची शक्यता वाढवू शकतो.

10 famous myths about health skin and fitness
उपाशी राहिल्याने खरंच लवकर वजन कमी होते? तज्ज्ञांनी दूर केले १० प्रचलित गैरसमज
How to burn more calories during daily walk here are 9 tips from experts
दररोज चालायला तर जाताय; पण कॅलरीज बर्न होत…
On empty stomach for a while? Neurologist reveals what happens to the brain when you skip meals
रिकाम्या पोटी थोडा वेळ राहिल्यास तुमचंही डोकं दुखतं का? यामागचं कारण ऐकून धक्का बसेल
Health Special, heat winter, health ,
Health Special: हिवाळ्यामध्ये ऊन अंगावर घेताना कोणती काळजी घ्याल?
Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
how many tiny plastic particles plastic-coated paper cups can release when exposed to tea, coffee
प्लास्टिक-लेपित पेपर कपमध्ये चहा -कॉपी पिताय! थांबा, संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
Feeding fruits to dog is okay or not which fruits should be fed to dogs know from experts
तुमच्या पाळीव श्वानांना ‘ही’ फळे खायला देताय? मग वेळीच थांबा! आरोग्यासाठी ठरतील धोकादायक, तज्ज्ञ म्हणतात…
Boiled Eggs Vs omelettes Which is better option
Boiled Eggs Vs Omelettes : उकडलेली अंडी की ऑम्लेट? कोणता पर्याय तुमच्यासाठी बेस्ट; तज्ज्ञ सांगतात की…
how to bring down blood sugar levels in 1 hour
रक्तशर्करा एक तासात कमी करता येऊ शकते? तज्ज्ञांनी सांगितला खास उपाय…

डॉ ज्ञानेश्वर शेळके, BVG-MEMS चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितल्याप्रमाणे, AEDs हे सामान्य लोकांच्या वापरासाठी आहेत. हॉटेल, खेळाचे मैदान, शॉपिंग मॉल्स, इतर सार्वजनिक ठिकाणी याचा वापर करायला हवा. पोलीस, अग्निशामक, फ्लाइट अटेंडंट आणि सुरक्षा रक्षकांना AEDs वापरण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. जगभरात अचानक हृदयविकारामुळे दरवर्षी सुमारे पाच दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. त्यामुळेच ३० आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या नवीन लॅन्सेट आयोगाने अचानक हृदयविकाराचा झटका आणि मृत्यू टाळण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी AEDs चा वापर वाढवण्यावर भर दिला आहे.

कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय? (What Is Cardiac Arrest)

लॅन्सेट कमिशनमधील ३० आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांपैकी पॅरिस सडनमधील एलोई मारिजॉन (अध्यक्ष) आणि कुमार नारायणन (उपसभापती), सांगतात की, SCD (सडन कार्डियाक अरेस्ट) ची सामान्य व्याख्या म्हणजे, हृदयाच्या ठोक्यांची लय अचानक बिघडणे अथवा बंद होणे ज्यामुळे एका तासाच्या आतच संबंधित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. श्वसनात त्रास होऊ लागण्यापासून याची सुरुवात होते .

हृदयविकाराच्या झटक्यामध्ये उपकरणे का महत्त्वाची आहेत?

पोर्टेबल डिफिब्रिलेटर हे हृदयविकाराचा झटका आल्यावर किंवा त्याशिवायही बदलणारी हृदयाची बिघडलेली लय ओळखते. त्यामुळे उपचार वेळेत पूर्ण करणे शक्य होते. अगदी सामान्य माणूस सुद्धा हृदयविकाराच्या परिस्थितीत याचा वापर करू शकतो आणि मशीनद्वारे प्रदान केलेल्या सूचनांचे पालन करून आपका जीव वाचवू शकतात. डॉ शेळके सांगतात, AEDs सर्व सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध करता येऊ शकतात. अगदी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सुद्धा याचा वापर होऊ शकतो.

AED काय व कसे काम करते?

लॅन्सेट आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, स्वयंचलित डिफिब्रिलेटर (AED) हे सोपे सरळ तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आलेले उपकरण आहे. हे उपकरण तुमच्या हृदयाची असामान्य स्थिती क्षणार्धात ओळखून त्यावर उपचार करण्यासाठी सौम्य विद्युत शॉक हृदयापर्यंत पोहोचवते. सार्वजनिक ठिकाणी AEDs आणि त्यांचा वापर करण्यासाठी मूलभूत प्रशिक्षण आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांचे मुख्य अभ्यासक आणि प्रणेते डॉ. प्रसाद राजहंस म्हणतात, सीपीआरचे प्रशिक्षण इयत्ता आठवीपासून शालेय स्तरावर सुरू केले पाहिजे. राजहंस यांनी सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीसह आपत्कालीन वैद्यकीय सेवांमध्ये पदव्युत्तर डिप्लोमा सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. याशिवाय संबंधित प्रशिक्षिण पोलिस, रिक्षा चालकांसह सार्वजनिक ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काही कॉमन व्यक्तींना देणे आवश्यक आहे असेही ते सांगतात.

हे ही वाचा<< मोठी बातमी! जगात पहिल्यांदा कॅन्सरवर अवघ्या सात मिनिटांत उपचार शक्य; ‘या’ ठिकाणी होणार सुरुवात 

इतके फायदे असूनही या AEDs च्या बाबत एक गोष्ट मात्र चिंताजनक आहे ती म्हणजे किंमत! ही उपकरणे महाग आहेत, त्याची किंमत ६०,००० रुपयांच्या वर आहे. शिवाय एकदाच वापरता येणारे AED चेस्ट पॅड महाग आहेत. शिवाय पुरेशी बॅटरी, चेस्ट पॅड्सची एक्स्पायरी, डेटा संग्रहित होण्याची सुविधा नसणे अशाही समस्यांवर सध्या उत्तर शोधणे आवश्यक आहे.

Story img Loader