सध्या टेलिग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्क्रीनशॉट फसवणुकीचे प्रकार अतिशय तेजीत आहेत. त्याला स्क्रीनशॉट हॅक्स म्हटलं जातं. टेलिग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही याच प्रमाण वाढतं आहे. अधिक पैसे तेही विना कष्ट मिळवण्याचा मोह अनेक सायबर गुन्ह्यांना जन्म देतो. घरच्या घरी, कमी वेळात आणि खूप पैसे असं गणित असणारे कुठलेही मेसेज, कॉल्स हे फेक असतात, फसवे असतात हे कायमच लक्षात घेतलं पाहिजे. आणि तरीही झटपट पैसे कमावण्याचा मोह लोकांना होतो आणि त्यात आहे ती पुंजीही सायबर गुन्हेगार लंपास करतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फसवणुकीचा हा प्रकार घडतो कसा?

यात टेलिग्रामवरूनच किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरून एक मेसेज येतो, ज्यात झटपट पैसे कमावण्याच्या स्किम्स असतात. समोरच्या गुन्हेगारांच्या संपर्कात तुम्ही आलात की ते तुम्हाला रिव्ह्यू किंवा अ‍ॅक्टिव्हिटी ऑनलाईन करायला सांगतात. रिव्ह्यू दिल्याचा, अ‍ॅक्टिव्हिटी केल्याचा स्क्रीनशॉट शेअर करायला सांगतात. प्रत्येक स्क्रीनशॉटला ठराविक रक्कम तुम्हाला देऊ असे सांगितले जाते. आणि सदर रक्कम तुमच्या खात्यात जमाही होते. त्यामुळे जे काही सुरु आहे ते खरं आहे आपली फसवणूक होत नाहीये असं वाटतं. मग तुम्हाला एका टेलिग्राम ग्रुपमध्ये अ‍ॅड केलं जातं. तिथे अनेक अनोळखी माणसं अमुक तमुक हजार, लाख रुपये मिळाल्याचे स्क्रीनशॉट्स टाकत असतात. आपल्याला सगळं खरंखरं वाटावं अशीच रचना असते. हे अनेक अनोळखी लोक गुन्हेगारांनीच पेरलेले असतात. त्यामुळे जे काही सुरु आहे ते खरं आहे असं वाटायला लागतं. विश्वास निर्माण होतो, शिवाय झटपट पैसेही मिळालेले असतात. मग अ‍ॅडमिनकडून एक लिंक येते, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, सुरुवातीला त्यांनी तुमच्या खात्यात पैसे टाकलेले आहेत, याचा अर्थ त्यांच्याकडे तुमचे बँक डिटेल्स आणि इतरही महत्त्वाची वैयक्तिक माहिती आहे. तर एक लिंक दिली जाते. त्यावर क्लिक करा असं सांगितलं जातं. अनेकदा न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्ये पैशांची गुंतवणूक, दुप्पट पैसे इत्यादी आमिषंही असतात. आमिष दाखवण्याचे मुद्दे वेगवेगळे असू शकतात. प्लॅनही सतत बदलत राहणारा असू शकतो. लिंक दिली जाते. त्यावर क्लिक केलं की झालं. तुमच्या खात्यातून पैसे गायब. गुन्हेगारांची कार्यपद्धती साधारण अशा स्वरुपाची असते.

हेही वाचा – संत्री खाल्ल्याने सर्दी बरी होते? ‘व्हिटॅमिन सी’मुळे सर्दी पडसे झटपट थांबते का, तज्ज्ञांनी सांगितला गोळ्यांचा पर्याय

इथे काय काळजी घेतली पाहिजे?

१) जगात कुठलीही गोष्ट उगीचच स्वस्त, फुकट आणि सहज नसते. पैसे झटपट मिळत नाहीत, कष्टाला पर्याय नसतो हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. कुणीही सांगत असले विनासायास पैसे कमवा, घर बसल्या ऑनलाईन पैसे कमवा तर तिथे जाळं टाकलेलं आहे हे समजून घ्या.

२) अमुक तमुकने हे कमावलं तर मलाही मिळतील याला अर्थ नाही. अमुक तमुक कोण असतो हे आपल्याला नक्की माहिती नसतं. मित्राचा एक ओळखीचा, अमुक नातेवाईंकांच्या ऑफिसमधला याला काहीही अर्थ नाही. अशा अफवा रोज ऑनलाईन जगाच्या बाजारात पिकत असतात. त्यामुळे घरच्या घरी, ऑनलाईन, विनाकष्ट झटपट पैसे हे शब्दच धोक्याचे आहेत आणि असे शब्द दिसले की तिथे क्लिक करायचं नाही हे कायम लक्षात ठेवा.

हेही वाचा – रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी जेवणानंतर बीट का खाल्ले पाहिजे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

३) कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करायचं नाही. अनोळखी व्यक्तीला बँक डिटेल्स, आधार-पॅन डिटेल्स कधीही देऊ नका.

४) रिव्ह्यू द्या, स्क्रीनशॉट द्या आणि पैसे मिळवा यात मोठ्या प्रमाणावर फसवणूकच असते हे लक्षात असू द्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Screenshot fraud are quite rampant on some social media platforms it is called a screenshot hack can screenshots fool you hldc ssb
Show comments