Seema Sajdeh Shared Nighttime Skincare Tip : नेटफ्लिक्सच्या ‘फॅब्यूलस लाइव्ह्स वर्सेस बॉलीवूड वाईव्स’ (Fabulous Lives of Bollywood Wives) या सीरिज फेम सीमा सजदेहने (Seema Sajdeh ), ओरहान अवत्रामणी (म्हणजेच ओरी) यांच्यातील संभाषणादरम्यान तिचा डीआयवाय नाईटटाइम स्किनकेअरबद्दल (DIY nighttime skincare) सांगितले होते. हे नाव नवीन वाटत असले तरीही, ‘स्लगिंग’ हायड्रेशन आणि मॉइश्चरायझिंग फायद्यांसाठी स्किनकेअर करणाऱ्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. पण, प्रत्येकासाठी ही योग्य निवड ठरेल का? तर याबद्दल जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांशी संवाद साधला.
स्लगिंग म्हणजे काय?
स्लगिंगमध्ये तुम्ही तुमच्या रात्रीच्या स्किनकेअर रूटीनची अंतिम पायरी, ज्यात तुमच्या त्वचेवर पेट्रोलियम जेलीचा एक पातळ थर किंवा ऑक्लुसिव्ह एजंट लावणे समाविष्ट आहे. ही प्रक्रिया ओलावा लॉक करते, त्वचेचा अडथळा दुरुस्त करण्यात मदत करते आणि तुम्ही झोपत असताना ट्रान्सपीडर्मल वॉटर लॉस (TEWL) प्रतिबंधित करते, असे मुंबईतील स्किन केअर क्लिनिकमधील डर्मेटोलॉजिस्ट डॉक्टर शरीफा चाऊस यांनी स्पष्ट केले आहे.
कोरियन स्किनकेअर दिनचर्येमध्ये लोकप्रिय असलेल्या स्लगिंगला त्याच्या साधेपणा आणि परिणामकारकतेसाठी, विशेषतः कोरडी किंवा सेन्सिटिव्ह त्वचा असलेल्यांसाठी या स्किनकेअरने जागतिक स्तरावर आकर्षण मिळवले आहे. डॉक्टर शरीफा चाऊस म्हणाले की, कोरडी त्वचा असलेल्या लोकांसाठी स्लगिंग विशेषतः फायदेशीर आहे. हे त्वचेवर एक संरक्षण कवच निर्माण करते, तीव्र हायड्रेशन सुनिश्चित करते आणि आधीपासून लावलेल्या सीरम आणि क्रीमचीसुद्धा खात्री करते.
स्लगिंग कोणी टाळावे?
डॉक्टर शरीफा चाऊस म्हणाले की, सुस्त त्वचा असलेल्यांना स्लगिंगचा फायदा होत असला तरीही ते प्रत्येकासाठी योग्य असू शकत नाही.
ॲक्ने-प्रोन आणि ऑईली स्किन टाईप : पेट्रोलियम जेली छिद्र रोखू शकते, ज्यामुळे ब्रेकआउट होऊ शकतात. तेलकट किंवा त्वचेवर पुरळ असणाऱ्या व्यक्तींनी सावधपणे या ट्रेंडकडे जावे किंवा ते पूर्णपणे टाळावे.
सेन्सिटिव्ह स्किन : जर तुमच्या त्वचेला जळजळ होण्याची शक्यता असेल, तर स्किनकेअर करण्यापूर्वी चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण ऑक्लुसिव्ह लेयरमुळे तुमची चिडचिड होऊ शकते.
स्किनकेअर करावे की नाही हे तुमच्या त्वचेच्या प्रकारावर अवलंबून आहे. चमकदार त्वचेचे रहस्य म्हणून स्लगिंगचा वापर करत असला तरीही सगळ्यांसाठी तो योग्य नाही. कोरड्या त्वचेच्या प्रकारांसाठी ते गेम चेंजर असू शकते. पण, जर तुमची त्वचा तेलकट, मुरुम किंवा संवेदनशील असेल तर तुम्ही ट्रेंडकडे वळण्यापूर्वी त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
योग्य मार्गाने स्लगिंग कसे करावे?
त्वचा स्वच्छ ठेवा : पेट्रोलियम जेलीच्या खाली घाण किंवा मेकअप अडकू नये म्हणून तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ असल्याची खात्री करा.
तुमची उत्पादने ठरवा : पेट्रोलियम जेलीच्या आधी तुमची नेहमीची स्किनकेअर उत्पादने, जसे की सीरम आणि मॉइश्चरायझर लावा.
योग्य प्रमाणात वापरा : १. कोरडी त्वचा : थोडासा जेनेरस (generous) थर खोलवर मॉइश्चरायझ करण्यासाठी उत्तम काम करतो.
२. तेलकट त्वचा : जर जर तुम्हाला स्लगिंग करायचे असेल तर छिद्र कमी करण्यासाठी खूप पातळ थर वापरा.
रात्रीची वेळ निवडा : स्लगिंग हे तुमच्या रात्रीच्या स्किनकेअर रूटीनचा भाग म्हणून उत्तम प्रकारे काम करू शकते, कारण यामुळे तुमचा चेहरा चमकदार दिसू शकतो.