Self Medicate Can be Harmful: सेल्फ-मेडिकेशन शारीरिक आजारांनाही कारणीभूत ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे किंवा गैरप्रकाराने औषध वापरणे शरीराच्या अवयवांना हानी पोहोचवू शकते. काही वेळा ही हानी कायमची असते, असे डॉ. चॅटर्जी म्हणाले. स्वतःवर औषधोपचार करण्याचे दिर्घकालीन परिणाम, ज्या त्रासामुळे आपण औषध घेतले, त्यापेक्षा अधिक घातक ठरू शकतात.

जर असंच चालू राहिलं, विशेषतः औषधांबाबत, तर त्यावर अवलंबून राहण्याची शक्यता असते. शिवाय, शरीर त्या औषधांची सवय लावून घेतं आणि नंतर त्याचा परिणाम होण्यासाठी जास्त मात्रा लागते.

डॉ. चॅटर्जी म्हणतात की स्वतः औषध घेण्याची सवय थांबवण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेणं खूप महत्त्वाचं आहे. मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आणि व्यसनतज्ज्ञ अशा लोकांकडून योग्य मार्गदर्शन मिळू शकतं. ते माणसाला त्याच्या त्रासाचं मूळ कारण समजून घेण्यास मदत करतात. ‘कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी’ (CBT) ही एक प्रकारचं उपचारपद्धती आहे, ज्यामध्ये थेरपिस्ट चुकीच्या सवयी ओळखून त्या बदलायला मदत करतो. ही थेरपी व्यसनमुक्त होण्यासाठी खूप उपयोगी ठरते, कारण ती व्यसन निर्माण करणाऱ्या विचारांना आणि वागणुकीला तोडते.

डॉ. चॅटर्जी सांगतात की सपोर्ट सिस्टिम तयार करण खूप महत्त्वाचं आहे. मित्र, कुटुंब आणि मदतीसाठी असलेल्या ग्रुप्सशी संपर्क ठेवणं उपयोगी ठरतं. अशा लोकांकडून मानसिक आधार आणि योग्य सल्ला मिळतो, जो सेल्फ मेडिकेट करण्याची सवय सोडण्यासाठी मदत करतो. असा सपोर्ट असला की आपल्याला कुणीतरी आपलं आहे असं वाटतं आणि भावनिकदृष्ट्या सुरक्षित वाटतं, जे बरे होण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

सेल्फ मेडिकेशनऐवजी आरोग्यदायी पर्याय

औषधांकडे वळण्याऐवजी तणाव आणि मानसिक त्रास कमी करण्यासाठी अनेक चांगले पर्याय आहेत. डॉ. चॅटर्जी सांगतात की स्वतःची काळजी घेणं, म्हणजे ‘सेल्फ-केअर’, खूप उपयुक्त ठरतं. नियमित व्यायाम केल्याने मन शांत राहतं आणि मूड सुधारतो, कारण त्यामुळे शरीरात एंडोर्फिन नावाचे आनंददायक हार्मोन्स तयार होतात. तसंच, ‘माइंडफुलनेस मेडिटेशन’ म्हणजे शांत बसून मन एकाग्र करणं, यामुळेही तणाव कमी होतो आणि औषध घेण्याची गरज वाटत नाही.

मन शांत ठेवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी आपल्याला आवडणाऱ्या छंदात वेळ घालवणं खूप उपयोगी ठरतं. मग ते चित्र काढणं असो, पुस्तक वाचणं असो किंवा बागकाम – अशा गोष्टी तणावापासून लक्ष हटवतात आणि मनाला समाधान देतात. त्याचबरोबर संतुलित आहार घेणं आणि योग्य झोप घेणं मानसिक आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे. जेव्हा शरीराला नीट झोप आणि पोषण मिळतं, तेव्हा ते जीवनातील अडचणींना औषधांशिवायही चांगल्या पद्धतीने सामोरं जाऊ शकतं.