“यशवंतरावांच्या पत्नी गेल्या वर्षी वारल्या. तेव्हापासून अगदी एकटे झाले ते. पण काय करणार? वय झालं की एकटेपण येणारच ना? स्वाभाविकच आहे, की त्यांना आता आमच्याबरोबर फिरायला यावेसे वाटत नाही”. सदाशिवराव सहानुभूतीने सांगत होते.

“अहो, किती उपाय केले, झोप काही येत नाही.” माधवराव म्हणाले. त्यांचे मित्र त्यांची समजूत काढत म्हणाले, “अहो, चालायचंच, वय झालं आता आपलं. झोप कमी व्हायचीच.”

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

सुभाषराव सातव्या डॉक्टरकडे जाऊन आले आज. सतत थकवा जाणवतो म्हणून. सगळे तपास नॉर्मल! शक्तीची औषधे, इंजेक्शने सारे झाले. अनेकजण त्यांना म्हणाले, “अहो वय झाले की पूर्वीची ताकद कशी राहील? आता आराम करण्याचे दिवस!”

आणखी वाचा: Health Special: पावसाळ्यात शरीराचे बल सर्वात कमी!

वय झाले की प्रत्येकाच्या शरीरात, शारीरिक क्षमतांमध्ये अनेक बदल होतात हे खरे, परंतु खूप वेळा वार्धक्यामध्ये होणाऱ्या प्रत्येक गोष्टीला ‘वय झाले’ असे कारण सांगितले जाते. त्यामुळे अनेक वेळा शारीरिक आणि मानसिक लक्षणांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते, किंवा त्या आजारांसाठी मदत घ्यायला उशीर होतो. विशेषतः मानसिक आजारांच्या बाबतीत हे खूप वेळा घडताना आढळते.

जे मानसिक विकार तरुणपणी किंवा प्रौढपणी आढळतात, ते वार्धक्यामध्येही आढळून येतात. डिप्रेशन किंवा उदासीनतेने अनेक वृध्द त्रस्त असतात, परंतु माहिती अभावी उपचार वेळेवर घेतले जात नाहीत आणि त्याचा त्यांच्या शारीरिक आरोग्यावर, नातेसंबंधांवर, एकूणच जीवनाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम होतो.

जवळजवळ १५ ते २०% वृद्धांमध्ये डिप्रेशनची काही ना काही लक्षणे दिसून येतात आणि साधारण ५% वृद्धांना डिप्रेशनचा विकार असतो. वार्धक्यातील डिप्रेशन हे तरुणपणी येणाऱ्या डिप्रेशनपेक्षा काहीसे वेगळे असते. साठीनंतर पहिल्यांदाच उदासपणाचा विकार उद्भवतो, तेव्हा त्याचे ‘वृद्धापकाळातील उदासपणा’ असे निदान केले जाते. बहुतेकदा या रुग्णांमध्ये घरात कुणाला डिप्रेशनचा त्रास झालेला नसतो. वृद्धापकाळात येणाऱ्या उदासीनतेच्या विकाराची लक्षणे वैशिष्ट्यपूर्ण असतात. स्मरणशक्ती आणि वैचारिक क्षमतांवर परिणाम झाल्याची तक्रार बरेच रुग्ण करतात.

आणखी वाचा: Health Special: प्या फुलांचं पाणी, राहा निरोगी

लक्ष केंद्रित करणे कठीण होते, विचार आणि कृतीची प्रक्रिया(processing speed) मंदावल्यासारखी वाटते, आपल्या कार्यकारी क्षमता(executive functions) बिघडल्या आहेत असे जाणवते. तसेच सतत आणि लवकर थकवा, बेचैनी, अस्वस्थता हे प्रामुख्याने दिसते. झोप न लागण्याची तक्रार अनेक जण करतात. उदास वाटण्यापेक्षा, कशातही रस न वाटणे अधिक प्रकर्षाने अनुभवला येते, मन निराश होते. कधी कधी आत्महत्त्येचे विचारही येतात. वृद्धापकाळ अनेक शारीरिक व्याधींनी ग्रस्त असण्याचा काळ असतो. आधीच शारीरिक व्याधींची विविध लक्षणे वृद्ध व्यक्ती अनुभवत असते, त्यातच उदासपणाचा आजार झाला की तो व्यक्त होताना ही अनेक शारीरिक तक्रारींतून होतो. झोप, भूक यांचावर परिणाम होतोच, पण अनेक जण अंगदुखी, डोकेदुखी, पचनाच्या तक्रारी अशा विविध तक्रारी घेऊन येतात. वार्धक्यामध्ये होणारे अनेक शारीरिक बदल, विविध व्याधी यांचा मानसिक स्थितीवर परिणाम होतो.

विशिष्ट प्रकारची जनुके(genes) वृद्ध व्यक्तीला डिप्रेशन येण्याची शक्यता वाढवतात. शरीरातील काही अंतस्रावाचे अन्तःस्रावांचे(cortisol) प्रमाण बराच काळ जास्त राहिले, मेंदूतील रक्तवाहिन्यांवर परिणाम करतील असे विकार उदा. उच्च रक्तदाब, मधुमेह अशा शारीरिक कारणांमुळे डिप्रेशन येते. वय झाले की तोल जाण्याची सतत भीती राहते. शरीर कमजोर, कृश झाल्याचे जाणवत राहते. या बरोबरच अनेक मानसिक बदलांना या वयात सामोरे जावे लागते. कुटुंबीयांमधील नातेसंबंध ताणलेले असतील तर मनावरचा ताण सतत वाढत राहतो. आर्थिक चणचण, परावलंबित्त्वाची भावना, अचानक राहण्याच्या जागेत करावा लागलेला बदल या सगळ्याचा मनावर परिणाम होतो. एकटेपणाची भावना, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू डिप्रेशनचा धोका वाढवतो. जर परिस्थितीला सामोरे जाण्याचे मार्ग चुकीचे असतील, उदा. संकट टाळण्याचा प्रयत्न करणे, किंवा केवळ भावनांच्या आहारी जाणे तर उदासपणा लवकर येतो.

पटकन निराश होण्याचा स्वभाव असेल तरी डिप्रेशन पटकन येते. वृद्ध व्यक्तीला भावनिक आधार देणारे किती आणि कोण कोण आहेत यावरही त्या व्यक्तीला डिप्रेशन येऊ शकते की नाही हे अवलंबून राहते. पुरेसा आधार नसेल तर डिप्रेशनची शक्यता वाढते. प्रत्येक वेळेस डिप्रेशनची सगळी लक्षणे दिसतीलच असे नाही, तर काही काही लक्षणेच दिसून येतील, तरीही अशा वृद्धांना योग्य तपासणीची गरज असते. अनेक वेळा वृद्धापकाळातील डिप्रेशनचे निदान
होत नाही. वृद्ध व्यक्तीच्या लक्षातच येत नाही की आपल्याला होणारा त्रास डिप्रेशनमुळे असू शकतो किंवा तो आपल्या डॉक्टरांना सांगावा. दुसऱ्या बाजूने अनेक डॉक्टरही शारीरिक लक्षणांकडे अधिक लक्ष देतात आणि मानसिक लक्षणे दुर्लक्षित राहू शकतात. डॉक्टर, पेशंट आणि विशेषतः पेशंटच्या जवळच्या व्यक्ती यांनी शारीरिक लक्षणांबरोबरच मानसिक बदलांकडे सजगपणे पहिले पाहिजे. योग्य निदान आणि योग्य उपचार यासाठी हे अत्यावश्यक आहे.