History of Sexual Health and sex नवरा -बायको, दोघांनीही मनमोकळा श्रृंगार करणे ही उत्क्रांतीची उमज आणि काळाची गरज आहे हे समजून घ्यायला हवे. काही हुशार स्त्रिया आपल्या नवऱ्याला मधुचंद्र काळातील श्रृंगाराची पुन्हा जाणीव करून देण्यासाठी अक्कलहुशारीने म्हणतात, ‘‘खरं म्हणजे तू जरा तसा रोमँटिक वागला असतास तर बरं झालं असतं. पण जाऊ दे तुला वयाप्रमाणं आता तसं जमणं जरा कठीणच वाटतंय!’’ नवरा झक्कत श्रृंगाराकडे लक्ष द्यायला लागतो! एक रशियन म्हण आहे जिचा अर्थ आहे, ‘अस्वल नाच करत असेल तर आश्चर्य हे नाही की, ते किती सुंदर नाचतंय, तर हे असतं की, ते मुळात नाचतंय.’ तसेच ‘सेक्स’ विषयाचं आहे. आश्चर्य हे नाही की, तुम्ही त्या विषयी काय काय चर्चा करताय, पण आश्चर्य हे आहे की, तुम्ही मुळात या विषयी चर्चा करायला लागलात. आणि कुठल्याही विषयातील ‘उत्सुकता’ ही केवळ त्या विषयीची आपली ओढच दाखवत नसते, तर त्या विषयातील आपल्या अज्ञानाचे ते मापही असते. ‘सेक्स’ या विषयाबद्दल हेच म्हणता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा