Erectile Dysfunction Sexual Desire, Diabetes Connect: मॅक्स हेल्थकेअरच्या एंडोक्राइनोलॉजी आणि मधुमेह विभागाचे अध्यक्ष डॉ. अंबरिश मिथल यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार आज आपण डायबिटीज व लैंगिक दुर्बलतेचा संबंध व उपाय जाणून घेणार आहोत. पुरुषांच्या शरीरातील रक्तवाहिन्या, नसा आणि सेक्स हार्मोन टेस्टोस्टेरॉन या तिघांचा थेट संबंध हा लैंगिक क्षमतेशी असतो. शरीरातील अनियंत्रित अतिरिक्त साखर या तिन्ही घटकांवर विपरीत परिणाम करू शकते. मधुमेह, उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते. तसेच वाढते वय आणि धूम्रपान यांमुळे शिश्नामध्ये रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. मधुमेह न्यूरोपॅथीमुळे मज्जातंतूंचे नुकसान करून मज्जातंतूंच्या प्रतिसादांना क्षीण करू शकते जे इरेक्शनसाठी आवश्यक असते. परिणामी इरेक्शनची क्षमता सुद्धा कमी होते.

मधुमेह हा लिंगाच्या स्नायूंना कमजोर करू शकतो ज्यामुळे इरेक्टाइल डिसफंक्शन (ED) नावाची स्थिती उद्भवते. काही वेळा, उच्च रक्तदाब (जसे की बीटा ब्लॉकर्स) उपचार करण्यासाठी वापरली जाणारी औषधे देखील ED ची वारंवारता वाढवू शकतात.

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती?…
home voting nashik
नाशिक: गृह मतदानापासून हजारो ज्येष्ठ मतदार, अपंग वंचित; यंत्रणेच्या अनास्थेमुळे ८५ हजार पैकी केवळ २४४९ मतदारांना लाभ
Viral video of disabled swiggy delivery boy doing food delivery by riding a cycle
परिश्रमाशिवाय पर्याय नाही! दिव्यांग असूनही करतोय फूड डिलिव्हरी, VIDEO पाहून वाटेल अभिमान
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे

टेस्टोस्टेरॉन हे आपल्या शरीरातील मुख्य हार्मोन आहे आणि ते वृषणाद्वारे स्रावित होते. या हार्मोनचा प्रभाव माणसाच्या कामवासनेवर (सेक्श्युअल डिझायर) होत असतो. टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे लैंगिक इच्छा आणि शुक्राणूंची निर्मिती कमी होते. टेस्टोस्टेरॉनच्या कमी पातळीमुळे हाडांचे वस्तुमान (ऑस्टिओपोरोसिस), स्नायूंचे वजन आणि ताकद कमी होऊ शकते. शिवाय, सतत मूड स्विंग होणे, नैराश्य आणि सुस्ती येणे हे सुद्धा कमी टेस्टरॉनचे परिणाम आहेत.

टेस्टोस्टेरॉनवर मधुमेहाचा प्रभाव कसा मोजायचा?

टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेचे निदान हार्मोनची रक्त पातळी (एकूण टेस्टोस्टेरॉन) तपासून केले जाते. दिवसभरात पातळी कमी होऊ शकते. त्यामुळे अशा चाचणीसाठी रक्ताचा नमुना सकाळी ८ च्या सुमारास द्यायला हवा. LCMS/MS (लिक्विड क्रोमॅटोग्राफी आणि टँडम मास स्पेक्ट्रोमेट्री) सारख्या अचूक पद्धतीने चाचणी केली पाहिजे. टेस्टरॉनची 250 ng/dl च्या खाली ही कमी पातळी 300 ng/dl (किंवा 320 ng/dl) वरील पातळी सामान्य मानली जाते.

यावर उपचार म्हणून टेस्टोस्टेरॉन त्वचेवर इंजेक्शन किंवा दररोज जेल म्हणून प्रशासित केले जाऊ शकते पण यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक आहे.

ज्यांना टेस्टोस्टेरॉनची कमतरता नाही पण ED आहे त्यांच्यासाठी उपाय काय?

आपण तिसरी शक्यता म्हणजे पुरुषांच्या शरीरात टेस्टरॉनचे प्रमाण योग्य आहे पण तरीही ED चा त्रास होत असल्यास काय करावे हे सुद्धा पाहूया. ED साठी सर्वात लोकप्रिय आणि यशस्वी उपचार म्हणजे फॉस्फोडीस्टेरेस इनहिबिटर (PDE5I) नावाच्या औषधांच्या वर्गाचा वापर. सिल्डेनाफिल (वियाग्रा) मुळे ईडीच्या उपचारात क्रांती झाली. टाल्डाफिल हा जास्त काळ सेक्श्युअल क्षमता टिकवून ठेवणारा सर्वात लोकप्रिय उपचार आहे. नायट्रिक ऑक्साईड / सीजीएमपी मार्गाद्वारे, ही औषधे लिंगांमधील स्नायू शिथिलता निर्माण करतात आणि दीर्घ कालावधीसाठी इरेक्शन राखण्यास मदत करतात. याचा अत्यंत कमी डोस (2.5 ते 5 mg) अधूनमधून किंवा दररोज वापरला जाऊ शकतो. आम्ही पुन्हा हेच अधोरेखित करून इच्छितो की हे पर्याय परस्पर वापरण्याची चूक करू नका. तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

हे ही वाचा<< मासे खाऊन ऐश्वर्या रायसारखे तुमचेही डोळे सुंदर होणार का? मंत्री विजय गावितांच्या विधानानंतर डॉक्टरांचं मत वाचा

काळजी घेण्याचे आणखी एक कारण म्हणजे ज्यांना हृदयरोग आहेत त्यांनी सावध राहणे आवश्यक आहे. या औषधांचा भडीमार करण्याचा एक दुर्मिळ दुष्परिणाम म्हणजे प्रियापिझम. यामध्ये लैंगिक उत्तेजनाशिवाय लिंगाची सतत वेदनादायक उभारणी होते. इतर सर्व काही अयशस्वी झाल्यास ED असलेल्या मधुमेही पुरुषांसाठी पेनाइल प्रोस्थेसिस हा एक प्रभावी पर्याय आहे. सर्वोत्तम परिणामांसाठी प्रक्रिया करण्यापूर्वी मधुमेहावर चांगले नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. ED साठी अलीकडे कमी-तीव्रता शॉक वेव्ह थेरपी (LiESWT) सुद्धा चर्चेत आहे परंतु याचा अभ्यास आवश्यक आहे.