शकिरा (Shakira) ही दक्षिण अमेरिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री व पॉप स्टार आहे. सौंदर्य आणि संगीत यांच्या जोरावर ती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करताना दिसतेय. तिचे प्रत्येक गाणे सुपरहिट ठरत असते. शकिराच्या चार्ट-बस्टिंग ‘हिप्स डोन्ट लाय’ गाण्यावर (Hips Don’t Lie) डान्स करायला, कंबर हलवायला कोणाला आवडत नाही? जर तुम्हीसुद्धा त्यापैकी एक असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हे गाणे तुम्हाला एखाद्याचा जीव वाचविण्यास मदत करू शकते. होय… तुम्ही अगदी बरोबर वाचत आहात. कारण- ही कोणतीही थट्टा, मस्करी नाही.

अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, शकिराच्या चार्ट-बस्टिंग ‘हिप्स डोन्ट लाय’ गाण्यात १०० बीट्स प्रतिमिनीट आहेत; जे हँड्स-ओनली सीपीआरसाठी (Hands-only CPR) योग्य आहे. तर या संबंधित अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने नवी दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटल्सचे कार्डिओथोरॅसिक आणि हृदय, फुफ्फुस यांची शस्त्रक्रिया करणाऱ्या वरिष्ठ सल्लागार डॉक्टर मुकेश गोयल यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सांगितले की, हँड्स-ओन्ली सीपीआर (Hands-only CPR) ज्याला कॉम्प्रेशन-ओन्ली सीपीआर (Compression-only CPR) देखील म्हणतात. म्हणजेच अचानक हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तीच्या छातीवर सतत दाब देणे होय.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shakira hips dont lie is saving lives the song has 100 beats per minute which is the right tempo for hands only cpr here is how asp
First published on: 21-06-2024 at 13:29 IST