Shalini Passi Share Sleep Routine And Remedy : शालिनी पासी (Shalini Passi) ही दिल्लीची लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. शालिनी पासीला ‘फेब्युलस लाईव्हज ऑफ बॉलीवूड वाइव्हज’ या शोमधून प्रेक्षकांमध्ये एक नवीन प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली. तिने बिग बॉस १८ मध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणूनसुद्धा प्रवेश केला होता, तर प्रत्येक मुलाखतीत शालिनी पासी स्वतःबद्दल काहीतरी नवीन गोष्टी शेअर करत असते. यावेळी तिने तिची झोपेची दिनचर्या आणि तिच्या जीवनशैलीमधील काही अनोखे उपाय सांगितले आहेत.
शालिनी पासी (Shalini Passi) रात्री आठ तास झोपते, पण घड्याळानुसार नाही; तर कधी काही कामामुळे ती अचानक झोपेतून उठली तरीही दुसऱ्या दिवशी ती तिचे काम लवकर उरकून तिची झोप पूर्ण करते. शालिनी पासी नियोजन कमीत कमी करते आणि जास्तीत जास्त त्याची अंमलबजावणी करते.
तर कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत, ४९ वर्षीय शालिनी पासीने (Shalini Passi) सांगितले की, ‘चांगल्या झोपेसाठी ती जायफळाची मदत घेते. म्हणजेच जायफळ बारीक करून अर्धा चमचा कोमट पाण्यात मिक्स करून, तर कधी कॅमोमाइलचा चहासुद्धा पिते; तर हे दोन्ही उपाय खूप चांगले आहेत असे शालिनी पासीचे म्हणणे आहे.
पण, हा उपाय खरंच कामी येतो का ? (Does this remedy work)
तर याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने, मुंबईच्या नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या नोंदणीकृत आहारतज्ज्ञ आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर उषाकिरण सिसोदिया यांच्याशी चर्चा केली. चहामध्ये हर्बल घटकांचा समावेश केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारू पाहणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे कामाच्या दबावामुळे आणि इतर तणावामुळे निद्रानाश कमी करण्यासाठी अनेक लोक नैसर्गिक उपायांकडे वळत आहेत, असे डॉटर उषाकिरण सिसोदिया म्हणाल्या आहेत.
तसेच याबद्दल सेलिब्रिटी आणि न्यूट्रिशनिस्ट शिखा गुप्ता यांनीसुद्धा त्यांचे मत मांडले आहे. चांगली झोप येण्यासाठी मेलाटोनिनचे (melatonin) प्रमाण जास्त असलेल्या पदार्थांवर जास्त लक्ष केंद्रित केले जाते, पण पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम यांसारख्या कमतरतेमुळे झोपदेखील येऊ शकते. तसेच जास्त तणाव (high-stress levels) म्हणजे उच्च कोर्टिसोल. हा एक अज्ञात घटक आहे, ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. जायफळ, त्याच्या खमंग आणि किंचित गोड चवीसाठी आणि चिंता-संबंधित निद्रानाश दूर करण्यासाठी ओळखला जातो. पण, याचा वापर संयमाने केला पाहिजे, कारण काहींसाठी हे तीव्रसुद्धा असू शकते आणि तिखट पदार्थ न खाणाऱ्या व्यक्तींना त्या शोभणार नाहीत, असे डॉक्टर सिसोदिया म्हणाल्या आहेत.
त्यामुळे सुरक्षित राहण्यासाठी, ताण-तणाव हाताळण्यासाठी आणि चांगली झोप घेण्यासाठी वारंवार व्यायाम आणि संतुलित आहाराचा समावेश असलेल्या निरोगी जीवनशैलीचे पालन करा, असा तज्ज्ञांचा आग्रह आहे. श्वासोच्छ्वासाचे व्यायाम आणि इतर सोप्या विश्रांती पद्धतीदेखील उपयुक्त ठरू शकतात,” असे सेलिब्रिटी आणि न्यूट्रिशनिस्ट शिखा गुप्ता यांनी सांगितले आहे.