तुम्ही तरुण असताना सहज दुर्लक्ष करू शकता अशा निरोगी सवयी तुम्ही वाढत्या वयानुसार स्वीकारल्या पाहिजेत. आपल्या सर्वांना चांगला आहार आणि नियमित व्यायामाचे महत्त्व माहीत आहे. परंतु, काही तज्ज्ञांच्या मते आपण सामान्य दुधाऐवजी पाणी मिसळलेले दूध (diluted milk) पिण्याचा विचार केला पाहिजे, हे तुम्हाला माहिती आहे का?

पोषणतज्ज्ञ आणि आहारतज्ज्ञ, अदीबा इक्कराम सैय्यद यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात नमूद केले आहे की, “२० किंवा २५ वर्षे वयापर्यंत दूध प्या. त्यानंतर दूध पिऊ नका, त्यात पाणी मिसळून मग प्यायले पाहिजे.”

आता प्रश्न असा पडतो की, हे योग्य आहे का?

याबाबत द इंडियन एक्स्प्रेला सविस्तर माहिती देताना इंसिड्स फार्म येथील मार्केटिंगचे व्हीपी, तमल चॅटर्जी म्हणाले, “आहारच्या सवयी, जीवनशैली आणि अनेक स्त्रोतांकडून पोषण आहार घेतल्याने दुधावरील अवलंबित्व कमी होऊ शकते. दूधात पाणी मिसळल्याने संवेदनशीलता असलेल्यांना पचायला सोपे जाते.

दूधात पाणी मिसळल्याने त्याच्या पौष्टिक मूल्यावर कसा परिणाम होतो?

दूधात पाणी मिसळल्याने प्रामुख्याने कॅलरी, फॅट्स, प्रथिने आणि कॅल्शियम प्रति सर्व्हिंगच्या प्रमाणावर परिणाम होतो. स्निग्ध पदार्थांचे प्रमाण कमी झाल्यास काही जीवनसत्त्वांच्या सेवनावर पाणी मिसळण्याचा थोडासा परिणाम होऊ शकतो, परंतु दुधाच्या पौष्टिक मूल्यावर एकंदरीत परिणाम साधारणपणे माफक असतो”, असे चॅटर्जी यांनी स्पष्ट केले.

दुधामध्ये पाणी मिसळल्यानंतरही व्यक्ती संतुलित आहार घेऊन त्यांच्या पौष्टिक गरजा पूर्ण करत आहेत हे सुनिश्चित करणे अत्यावश्यक आहे”, असे चॅटर्जी यांनी सांगितले आहे.

दुधात पाणी मिसळल्याने कॅल्शियमचे शोषण आणि हाडांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?

दुधात पाणी मिसळल्याने कॅल्शियमचे शोषण थेट बिघडत नाही, त्यामुळे कॅल्शियमचे सेवन कमी होऊ शकते. चॅटर्जी यांनी सुचविले की, हाडांच्या आरोग्यास समर्थन देण्यासाठी व्यक्तींनी त्यांच्या कॅल्शियमच्या गरजा संतुलित आहाराद्वारे पूर्ण केल्या आहेत याची खात्री करणे आवश्यक आहे; ज्यात कॅल्शियम समृद्ध अन्नाचे इतर स्त्रोत समाविष्ट आहेत, जसे की, हिरव्या भाज्या आणि आवश्यक असल्यास पूरक आहार घेऊ शकता.

हेही वाचा – शांत झोपेसाठी मॅग्नेशियमपूरक आहार फायदेशीर ठरेल का? दररोज किती प्रमाणात करावे सेवन? जाणून घ्या तज्ज्ञांकडून…

दीर्घकालीन आरोग्य स्थिती असलेल्या व्यक्तींच्या आहारात पाणी मिसळलेले दूध कसे फायदेशीर ठरते?

“मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार यांसारख्या दीर्घकालीन स्थिती असलेल्या व्यक्तींसाठी पाणी मिसळलेले दूध त्यांच्या आहारातील गरजा पूर्ण करण्यासाठी कमी-कॅलरी, कमी-सोडियम आणि कमी-सॅच्युरेटेड फॅट्सचा पर्याय देऊ शकते,” असे चॅटर्जी यांनी नमूद केले.

चॅटर्जी म्हणाले की, कमी फॅट्सयुक्त निवडा आणि त्यात पाणी मिसळल्याने कॅल्शियम आणि पोटॅशियमसारख्या आवश्यक पोषक तत्वांचा पुरवठा करताना रक्तातील साखर, रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते. पण, पाणी मिसळलेले दूध त्यांच्या एकूण आहार योजनेत उपयुक्त ठरते का याची खात्री करण्यासाठी व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा – मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने पाठदुखीचा त्रास खरंच कमी होतो का? वाचा डॉक्टर काय सांगतात

जे लोक पाणी मिसळलेले दूध पिण्यास प्राधान्य देतात, त्यांनी हे लक्षात ठेवा?

एखाद्याला एक भाग पाणी ते एक भाग दूध यासारख्या पुराणमतवादी सौम्यता गुणोत्तराने सुरुवात करून चव आणि पौष्टिक गरजांवर निश्चत करू शकता. काहींना दुधाची चव आवडते, तर काहींना पाणी मिसळल्यानंतर सौम्य झालेली दुधाची चव आवडते. एखाद्याचे शरीर कसे प्रतिक्रिया देत आहे याकडे लक्ष देणे आणि सुरक्षिततेसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणेदेखील महत्त्वाचे आहे, अशी शिफारस चॅटर्जी यांनी केली आहे.