गरोदरपणामध्ये महिलेच्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. उदाहरणार्थ, गरोदर महिलांचे कधी पाय सुजतात, कधी त्यांना सकाळी सकाळी थकवा जाणवतो, कधी अचानक त्यांच्या भावना बदलतात, कधी त्यांना अशक्तपणा जाणवतो आणि कधी त्यांना तीव्र वास येतात. गरोदरपणातील या महत्त्वाच्या ९ महिन्यांमध्ये, गरोदर स्त्रिया ज्या गोष्टींचा आनंद घेतात त्या त्यांच्यासाठी ट्रिगर होऊ शकतात. जसे की, जर तुम्ही चित्रपटप्रेमी असाल आणि प्रत्येक नवीन रिलीजचा फर्स्ट-डे फर्स्ट शो पाहण्यासाठी वारंवार थिएटरमध्ये जाणे आवडते, परंतु गरोदरपणात तुम्हाला हे करावे की नाही याबाबत तुमच्या मनात शंका येते आहे का? गरोदर असताना सिनेमागृहात चित्रपट पाहणे योग्य आहे का? कोणत्या प्रकारचे चित्रपट टाळावेत? तुम्हाला घ्यायची काही खबरदारी आहे का? काळजी करू नका, तुमच्या मनातील प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत.
याबाबत कल्याण येथील फोर्टीस हॉस्पिटलमधील, सल्लागार ,प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुषमा तोमर यांनी इंडियन एक्सप्रेससोबत संवाद साधला असून तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर शोधली आहेत. चला तर मग जाणून घेऊ या सविस्तर
गर्भवती महिलांसाठी थिएटरमध्ये चित्रपट पाहणे सुरक्षित आहे का?
पहिल्या तिमाहीत हे सुरक्षित असू शकते परंतु दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत समस्या निर्माण होऊ शकतात. एकंदरीत, हे टाळले पाहिजे कारण थिएटरमध्ये मोठ्या आवाजामुळे तणाव आणि गर्भाची जास्त हालचाल होऊ शकते, जे चांगले नाही. ध्वनी तुमच्या शरीरातून प्रवास करून तुमच्या बाळापर्यंत पोहोचू शकतो.
हेही वाचा : गर्भवती महिलांनी हेअर डाय करणे सुरक्षित आहे का? जाणून घ्या काय सांगतात डॉक्टर
गर्भवती महिला ‘टु डी’ आणि ‘थ्री डी’ चित्रपट पाहू शकतात का?
गरोदर स्त्रिया ‘टु डी’ आणि ‘थ्री डी’ चित्रपट पाहू शकतात, पण आई आणि गर्भाच्या आरोग्यावर चित्रपट पाहण्याचा नेमका परिणाम दर्शविण्यासाठी फारच कमी डेटा उपलब्ध आहे. कमी प्रकाशात किंवा जास्त ब्राइटनेसमध्ये चित्रपट पाहणे आईच्या डोळ्यांसाठी धोकादायक असू शकते, म्हणून ते नेहमी मर्यादेत असले पाहिजे.
हेही वाचा : प्रत्येक महिलेला तिच्या मासिक पाळीच्या कालावधीकडे लक्ष दिले पाहिजे, जाणून घ्या ५ कारणे
लक्षात ठेवण्यासारख्या इतर गोष्टी
थिएटरमध्ये चित्रपट पाहताना, उपलब्ध असलेल्या खाद्य पर्यायांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, एक भयपट चित्रपट किंवा काही विशिष्ट प्रतिमा (शैलीचा विचार न करता) पाहण्यामुळे देखील आईला तणाव आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो. कधीकधी, फ्लॅशलाइटमुळे डोकेदुखी, मळमळ आणि चक्कर येऊ शकते. काही प्रकरणांमध्ये, एपिलेप्सीच्या घटना देखील नोंदवल्या जातात