Sabudana During Fasts : उपवास म्हटलं की, आपण साबुदाणा, वरईसारखे निवडक पदार्थ किंवा फळे खातो. बहुतांश लोकांना उपवासाला साबुदाणा खिचडी खायला आवडते. जर तुम्हालाही आवडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. उपवासाला साबुदाणा खावा का? साबुदाण्यामध्ये कोणते पौष्टिक घटक असतात? याविषयी आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सविस्तर माहिती दिली.

साबुदाणा कशापासून बनतो?

साबुदाणा कंदमुळापासून बनतो. त्यामुळे पारंपरिक उपवासाच्या पदार्थांमध्ये साबुदाण्याचा समावेश करण्यात आला आहे. खरे तर नवरात्रीच्या उपवासामध्ये जेवढे तुम्ही कमी खाल, तेवढे चांगले आहे.

A glass of milk a day could help keep bowel cancer away
Milk: रोज एक ग्लास दूध प्यायल्याने आतड्यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो का? वाचा काय सांगतात डॉक्टर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
Health tips diet advice from social media influencers can be harmful
तुम्हीही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सचा डाएट सल्ला ऐकत असाल तर सावध व्हा; शरीरावर होऊ शकतो घातक परिणाम
What happens to your body if you eat raw onions every day
तुम्ही रोज कच्चा कांदा खाल्ला तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात…
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
Vegetarian diet for dogs
आता तुमचे पाळीव प्राणीही घेऊ शकतात शाकाहारी आणि वीगन आहार? तज्ज्ञ काय सांगतात…
ating eggs with cholesterol
दररोज अंडी खाल्ल्यास शरीरावर नेमका काय परिणाम होतो? बॅड कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणात होते वाढ? वाचा डॉक्टर काय सांगतात

आहारतज्ज्ञ पल्लवी सावंत नवरात्रीच्या उपवासाविषयी बोलताना सांगतात, “ज्या वेळी तुम्ही नवरात्रीचे उपवास करता त्यावेळी खूप चविष्ट साबुदाण्याची खिचडी खावी, हा मुद्दा येता कामा नये. कारण- तुमच्या जिभेवरचा संयम हे नवरात्रीच्या उपवासाचं खूप मोठं फलित असणार आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही फक्त साबुदाण्याची खिचडी खात असाल, तर त्याचं प्रमाणदेखील लक्षात घेणं आवश्यक आहे. उपवासाला त्वरित ऊर्जा देणारा पदार्थ म्हणून आपण साबुदाण्याचा एक पर्याय म्हणून वापर करू शकतो.”

हेही वाचा : Multigrain Rotis : मिश्र धान्यांची पोळी खाणे आरोग्यासाठी चांगले आहे का? वाचा, आहारतज्ज्ञ काय सांगतात

फायदे

साबुदाणा खाल्ल्यामुळे लगेच ऊर्जा मिळते. साबुदाण्यामध्ये कार्ब्सचे प्रमाण चांगले असते आणि त्यात रेजिस्टन्स स्टार्च असतो. हा एक स्टार्चचा प्रकार आहे; जो पचायला हलका आहे. त्यामुळे उपवासाच्या पदार्थांमध्ये साबुदाण्याला अधिक महत्त्व आहे.

साबुदाणा खिचडीच्या रेसिपीमध्ये आपण शेंगदाण्याचे कूट, तूप इत्यादी गोष्टींचा समावेश करतो. त्यामुळे साबुदाण्याची खिचडी ही उत्तम कार्ब्स आणि फॅट्सयुक्त होते, जी तुम्हाला एकदा खाल्ली की, पुरेशी वाटते.

तोटे

साबुदाण्यामध्ये प्रोटिन्सचे प्रमाण खूप कमी आहे. त्यामुळे साबुदाण्याबरोबर दूध किंवा दही खावे.

साबुदाण्याला पर्यायी पौष्टिक पदार्थ

वरई किंवा भगर, राजगिरा, शिंगाड्याच्या पिठाचे थालीपीठ खाऊ शकता. साबुदाण्याचे थालीपीठ करताना, त्यात शिंगाड्याचे पीठ मिसळावे. त्यामुळे तुम्हाला त्यातून प्रोटिन मिळू शकते.

हेही वाचा : शरीराची ठेवण योग्य नसेल तर तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम होऊ शकतो का? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

उपवास करताना…

खूप जास्त प्रमाणात न खाणे हेही तितकेच आवश्यक आहे. दिवसभर आपण खात असतो, चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेतो. जसजसे तापमान बदलते तसतसा तुमच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम होतो. तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुमच्या पचनसंस्थेला चांगला आराम देणे आणि त्यानंतर खाणे हा उपवास करतानाचा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे.
नवरात्रीदरम्यान आपण थेट ऑक्टोबरमधून डिसेंबरमध्ये जातो. यादरम्यान साथीचे आजार खूप पसरतात. जर तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तर उपवासाच्या दिवशी नुसते खात राहण्याऐवजी तुम्ही साधे जेवण करावे. जिभेचे चोचले कमी करून आवश्यक तेवढाच कमीत कमी आहार घेऊन स्वत:शी जुळवून घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही गर्भवती असाल, तुम्हाला मधुमेह असेल अथवा जर तुम्ही स्तनपान करणारी आई असाल, तर तुम्ही उपवास करू नये.

साबुदाण्यामध्ये कोणते घटक आढळतात?

साबुदाणा ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. आतड्यांच्या आरोग्यासाठी यात चांगले कार्ब्स असतात. ज्यांना पचनाशी संबंधित आजार आहे, त्यांच्यासाठी हे चांगले आहे. सगळ्या वयोगटासाठी साबुदाणा उपयुक्त आहे. साबुदाण्यामध्ये कोलेस्ट्रॉल नसल्यामुळे खाण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.

साबुदाणा कसा खावा?

जर तुम्ही साबुदाणा एखाद्या पदार्थामध्ये मिसळून खात असाल, तर चांगले आहे; पण साबुदाण्यामध्ये स्टार्च असल्यामुळे लगेच ऊर्जा मिळते. त्यामुळे दिवसभरातील शरीरातील प्रोटिन्सचे स्वरूप बदलत असते.
शरीराला व्यवस्थित प्रोटिन्स मिळावेत यासाठी साबुदाण्याबरोबर एक वाटी दही किंवा दूध घेणे आवश्यक आहे.
असे म्हणतात की, साबुदाणा पचायला जड असतो. जेव्हा साबुदाण्यामध्ये साखर किंवा मीठ किंवा जास्तीची प्रक्रिया केली जाते, तेव्हा तो पचायला जड जातो. फ्राइड साबुदाणा खाण्यापेक्षा वाफेवर तळून खाल्लेला साबुदाणा अधिक चांगला असतो. वजन वाढवण्यासाठीसुद्धा साबुदाणा उत्तम पर्याय आहे.
अनेक लोक खिचडी, साबुदाणा वडा, थालीपीठ करून खातात. साबुदाणा वड्यापेक्षा खिचडी आणि थालीपीठ खाणे अधिक चांगले आहे.

उपवासाला साबुदाणा खावा की नाही, ही तुमची वैयक्तिक निवड असू शकते; पण कोणताही पदार्थ खाताना संतुलित आहार घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. उपवासादरम्यान योग्य पद्धतीने साबुदाणा खाणेही महत्त्वाचे आहे.

Story img Loader