मासिक पाळीदरम्यान माहिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. या काळात शरीराला कर्बोदकांची आवश्यकता असताना महिलांनी उपवास केला पाहिजे का, या प्रश्नाचे उत्तर शोधताना दी इंडियन एक्स्प्रेसने इंटिग्रेटिव्ह न्युट्रिशनिस्ट पूजा अज्वानी यांच्याशी संवाद साधला. पुजा सांगतात की, मासिक पाळी येण्याच्या एक आठवडा आधी नैसर्गिकरीत्या शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढते आणि अनेक महिलांना मूडमध्ये काही बदल जाणवतात. कर्बोदके चांगले आणि आनंदी ठेवणारे हार्मोन्स शरीरात सोडतात, जे तुम्हाला तृप्तता जाणवते आणि शांत झोप लागण्यास मदत होते. जर तुम्ही मासिक पाळी येण्याच्या एक आठवडा आधी भात आणि पोळी खाणे बंद केले, तर तुमचा मूड बदलतो आणि भावनिक अस्थिरता येते.

हे सत्य आहे का?

मासिक पाळी दरम्यान एक आठवडा आधी शरीराला कर्बोदकांची गरज असते. याबाबत तज्ज्ञदेखील सहमती दर्शवितात. पुण्यातील खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलच्या सल्लागार, डायटीशिअन व न्युट्रिशनिस्ट वर्षा कृष्णा गाडे यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “मासिक पाळीदरम्यान उपवासा करण्याऐवजी संतुलित आहाराची आवश्यकता असते. मासिक पाळीमध्ये उपवास केल्यास तुम्हाला भूक लागू शकते. शरीरातील साखरेची पातळी वाढू शकते आणि तुम्ही गरजेपेक्षा जास्त अन्न खाऊ शकता; ज्यामुळे तुमचे वजन वाढू शकते. तुम्हाला आणखी कर्बोदकेयुक्त आहार खाण्याची इच्छा होऊ शकते. कारण- त्यामुळे तृप्त झाल्यासारखे वाटते आणि शांत झोप लागते.”

पुढे गाडे यांनी सांगितले, “महिलांनी मासिक पाळीदरम्यान उपवास करणे टाळले पाहिजे आणि सर्व आवश्यक पोषक घटक असलेले संतुलित जेवण घेणे आवश्यक आहे. “तुमची मासिक पाळी जवळ येत असताना तुम्ही आहारावर प्रयोग करू नका. त्याऐवजी कोशिंबीर, डाळ, चपाती, भाजी आणि थोडासा भात, असा नियमित आहार घ्या.”

हेही वाचा – तुळशीचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे वाचा; सर्वाधिक फायद्यांसाठी कसे करावे सेवन? वाचा आहारतज्ज्ञांचा स्पष्ट सल्ला

महिलांनी उपवास कधी करावा?

बंगळुरू येथील स्पर्श हॉस्पिटलमध्ये सल्लागार प्रसूती आणि स्त्रीरोग, स्त्रीरोग लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया व प्रजनन विशेषज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिथा एन. यांनी उपवास कधी करावा याबाबत सांगितले आहे.

०-१४ दिवस : मासिक पाळी चक्राच्या पहिल्या १४ दिवसांमध्ये इस्ट्रोजेनची पातळी वाढते आणि त्यामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढू शकते. या १४ दिवसांमधील उपवास वजन कमी करण्यासाठी आणि चयापचय आरोग्यासाठी अधिक प्रभावी असू शकतो.

१५-२८ दिवस : या दिवसांमध्ये उपवासाची तीव्रता कमी करण्याचा सल्ला दिला जातो. कारण- ओव्ह्युलेशननंतर प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते. त्यामुळे भूक आणि इन्सुलिन प्रतिरोध वाढू शकतो. या मासिक पाळीच्या चक्रादरम्यान अधूनमधून उपवास केला जाऊ शकतो, असेही डॉ. अनिथा यांनी सांगितले.

हेही वाचा – “आला पावसाळा, आरोग्य सांभाळा!” मान्सूनमध्ये ‘या’ सात पदार्थांचे सेवन करून संसर्ग टाळा

मासिक पाळीनुसार उपवास केल्याने ऊर्जेतील चढ-उतार नियंत्रित करण्यात मदत होऊ शकते.

“डॉ. अनिथा सांगतात की, उपवासामुळे काही महिलांना पोट फुगणे, तणाव व अन्नाची लालसा यांसारख्या प्रीमेन्स्ट्रुअल सिंड्रोम (पीएमएस) लक्षणे नियंत्रित करण्यास मदत मिळू शकते, तसेच अधिक उत्साही आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या चांगले कार्य करण्यास मदत करते.

हेही वाचा –ईशान किशनला प्रवास केल्यानंतर थकवा का जाणवतो; Travel Fatigue ची लक्षणे आणि त्यावरील उपाय काय हे जाणून घ्या

काय लक्षात घ्यावे?

लक्षात ठेवा, प्रत्येक स्त्रीचे शरीर भिन्न आहे. त्यामुळे जी बाब एका महिलेसाठी फायदेशीर ठरते, ती दुसऱ्या स्त्रीसाठी फायदेशीर ठरू शकेलच असे नाही.) डॉ. गाडे यांच्या मते, निष्काळजीपणे उपवास केल्याने एखाद्याच्या मनःस्थितीवर व ऊर्जेवरही परिणाम होऊ शकतो आणि मासिक पाळीदरम्यान सुस्ती येऊ शकते. “मासिक पाळीच्या वेळी खाण्याच्या चांगल्या सवयी असणे चांगले आहे आणि त्यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. कारण- खाण्याच्या चांगल्या सवयींमुळे तुमची ऊर्जा पातळी जास्त असेल आणि तुम्हाला सक्रिय वाटेल,” असे डॉ. गाडे यांनी स्पष्ट केले.